Petrol Diesel Price Today : राज्यातील सर्वात महाग पेट्रोल परभणीत, मुंबई, पुण्यात पेट्रोल-डिझेलचे नवे दर काय?

येत्या काही दिवसात इंधनाचे दर कमी होणार असल्याचे बोलल जात आहे. (Petrol Diesel Price Today)

Petrol Diesel Price Today : राज्यातील सर्वात महाग पेट्रोल परभणीत, मुंबई, पुण्यात पेट्रोल-डिझेलचे नवे दर काय?
पेट्रोल आणि डिझेल
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 8:10 AM

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दररोज सातत्याने चढ-उतार होत असतात. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल हे 95 रुपयांच्या पुढे विकले जात आहे. मात्र गेल्या दोन दिवसात राज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे पाहायला मिळत आहे. या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच येत्या काही दिवसात इंधनाचे दर कमी होणार असल्याचे बोलल जात आहे. (Petrol Diesel Price Today on 02 April 2021 latest price Update fuel rates)

दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते. आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत काहीही बदल झालेला नाही. या दोन्हींचे दर कालच्या प्रमाणेच स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील सर्वात महाग पेट्रोल कुठे?

महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे परभणीत पाहायला मिळत आहे. परभणीमध्ये पेट्रोलचा दर हा 99.10 इतका आहे. त्यापाठोपाठ नांदेडमध्ये 98.66 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय परभणीत डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. परभणी शहरात डिझेलचा दर 88.66 रुपये इतका आहे. (Petrol Diesel Price Today on 02 April 2021 latest price Update fuel rates)

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर 

क्रमांक शहरे पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)
1 अहमदनगर ₹ 97.11 ₹ 87.11
2 अकोला ₹ 96.85 ₹ 86.53
3 अमरावती ₹ 98.34 ₹ 87.86
4 औरंगाबाद ₹ 98.14 ₹ 89.12
5 भंडारा ₹ 97.51 ₹ 87.16
6 बीड ₹ 97.17 ₹ 86.81
7 बुलडाणा ₹ 97.52 ₹ 87.17
8 चंद्रपूर ₹ 97.23 ₹ 86.90
9 धुळे ₹ 97.39 ₹ 87.03
10 गडचिरोली ₹ 98.72 ₹ 88.33
11 गोंदिया ₹ 98.11 ₹ 87.74
12 मुंबई उपनगर ₹ 96.99 ₹ 87.97
13 हिंगोली ₹ 97.89 ₹ 87.53
14 जळगाव ₹ 97.94 ₹ 87.58
15 जालना ₹ 98.14 ₹ 87.74
16 कोल्हापूर ₹ 97.11 ₹ 86.77
17 लातूर ₹ 97.84 ₹ 87.46
18 मुंबई शहर ₹ 96.98 ₹ 87.96
19 नागपूर ₹ 96.98 ₹ 86.65
20 नांदेड ₹ 98.66 ₹ 88.25
21 नंदूरबार ₹ 97.66 ₹ 87.29
22 नाशिक ₹ 97.32 ₹ 86.95
23 उस्मानाबाद ₹ 97.81 ₹ 87.44
24 पालघर ₹ 96.74 ₹ 86.36
25 परभणी ₹ 99.10 ₹ 88.66
26 पुणे ₹ 97.34 ₹ 86.96
27 रायगड ₹ 96.86 ₹ 86.48
28 रत्नागिरी ₹ 97.70 ₹ 87.28
29 सांगली ₹ 97.18 ₹ 86.84
30 सातारा ₹ 97.62 ₹ 87.26
31 सिंधुदुर्ग ₹ 98.35 ₹ 87.97
32 सोलापूर ₹ 96.88 ₹ 86.55
33 ठाणे ₹ 96.67 ₹ 86.30
34 वर्धा ₹ 97.25 ₹ 86.91
35 वाशिम ₹ 97.57 ₹ 87.22
36 यवतमाळ ₹ 97.58 ₹ 87.23

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 90.56 रुपये प्रतिलीटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today) : 96.98 रुपये प्रतिलीटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 90.77 रुपये प्रतिलीटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 92.58 रुपये प्रतिलीटर

नोएडा (Noida Petrol Price Today) : 88.91 रुपये प्रतिलीटर

देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 80.87 रुपये प्रतिलीटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 87.96 रुपये प्रतिलीटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 83.75 रुपये प्रतिलीटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) : 85.88 रुपये प्रतिलीटर

नोएडा (Noida Diesel Price Today) : 81.33 रुपये प्रतिलीटर

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (Petrol Diesel Price Today on 02 April 2021 latest price Update fuel rates)

संबंधित बातम्या : 

RBI चे माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल आता बिस्किट बनवणाऱ्या कंपनीची जबाबदारी सांभाळणार

नोकरदारांसाठी मोठी बातमी! आजपासून 10 नियम बदलले; जाणून घ्या सर्वकाही

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.