Petrol Diesel Rate Today | पेट्रोल-डिझेलची पुन्हा शंभरी, महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल कुठे?

| Updated on: Mar 21, 2021 | 8:10 AM

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. (Petrol Diesel Price)

Petrol Diesel Rate Today | पेट्रोल-डिझेलची पुन्हा शंभरी, महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल कुठे?
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. अनेक दिवस 95 ते 98 रुपयांच्या आसपास असलेलं पेट्रोलने आज शंभरी गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते. (Petrol Diesel Price Today Update)

दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते.

राज्यातील सर्वात महाग पेट्रोल कुठे?

महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे परभणीत पाहायला मिळत आहे. परभणीमध्ये पेट्रोलचा दराने शंभरी गाठली आहे. परभणीत पेट्रोलचा दर हा 100.06 रुपये इतका आहे. त्यापाठोपाठ नांदेडमध्ये 99.63 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय परभणीत डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. परभणी शहरात डिझेलचा दर 89.64 रुपये इतका आहे. (Petrol Diesel Price Today Update)

महाराष्ट्रातील काही शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर 

क्रमांक शहरे पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)
1 अहमदनगर ₹ 98.07 ₹ 87.74
2 अकोला ₹ 97.52 ₹ 87.23
3 अमरावती ₹ 98.30 ₹ 87.99
4 औरंगाबाद ₹ 97.87 ₹ 87.54
5 भंडारा ₹ 98.07 ₹ 87.76
6 बीड ₹ 98.67 ₹ 88.33
7 बुलडाणा ₹ 97.85 ₹ 87.55
8 चंद्रपूर ₹ 98.36 ₹ 88.04
9 धुळे ₹ 97.94 ₹ 87.62
10 गडचिरोली ₹ 98.60 ₹ 88.27
11 गोंदिया ₹ 98.61 ₹ 88.27
12 मुंबई उपनगर ₹ 97.71 ₹ 88.74
13 हिंगोली ₹ 98.44 ₹ 88.12
14 जळगाव ₹ 98.27 ₹ 87.94
15 जालना ₹ 98.88 ₹ 88.51
16 कोल्हापूर ₹ 97.69 ₹ 87.39
17 लातूर ₹ 98.67 ₹ 88.33
18 मुंबई शहर ₹ 97.57 ₹ 88.60
19 नागपूर ₹ 97.40 ₹ 87.11
20 नांदेड ₹ 99.63 ₹ 89.25
21 नंदूरबार ₹ 98.55 ₹ 88.21
22 नाशिक ₹ 97.65 ₹ 87.32
23 उस्मानाबाद ₹ 98 ₹ 87.68
24 पालघर ₹ 97.23 ₹ 86.89
25 परभणी ₹ 100.06 ₹ 89.64
26 पुणे ₹ 97.70 ₹ 87.37
27 रायगड ₹ 97.08 ₹ 86.75
28 रत्नागिरी ₹ 99.09 ₹ 88.71
29 सांगली ₹ 97.49 ₹ 87.20
30 सातारा ₹ 98.04 ₹ 87.73
31 सिंधुदुर्ग ₹ 98.94 ₹ 88.59
32 सोलापूर ₹ 97.61 ₹ 87.31
33 ठाणे ₹ 97.28 ₹ 86.94
34 वर्धा ₹ 97.82 ₹ 87.52
35 वाशिम ₹ 97.93 ₹ 87.62
36 यवतमाळ ₹ 98.50 ₹ 88.17

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (Petrol Diesel Price Today Update)

संबंधित बातम्या : 

Health Insurance । आरोग्य विमा खरेदी करणार असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा

करदात्यांसाठी अलर्ट! आजच करा ‘हे’ काम नाहीतर भरावा लागेल मोठा दंड

आताच खरेदी करा सोनं! रेकॉर्ड पातळीवर घसरल्या सोन्याच्या किंमती, वाचा ताजे दर