Petrol Diesel Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जारी, वाचा काय आहे आजचे दर

देशातील बर्‍याच शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पलीकडे गेलं आहे. गेल्या काही आठवड्यांपासून वाढत्या किंमतींचा ट्रेंड सुरू आहे.

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जारी, वाचा काय आहे आजचे दर
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 6:53 AM

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price Today) आकाशाला भिडत आहेत. या किंमतींमध्ये सातत्याने वाढत होत आहेत. देशातील बर्‍याच शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पलीकडे गेलं आहे. गेल्या काही आठवड्यांपासून वाढत्या किंमतींचा ट्रेंड सुरू आहे. खरंतर, तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी करतात. आज थेट चौथ्या दिवशी (बुधवारीही) दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. (petrol diesel rate today 03 march 2021 know the new price of delhi mumbai and all cities)

बुधवारी पेट्रोल-डिझेलचे दर कालच्या दराइतकेच आहेत. दिल्लीत पेट्रोलच्या किमतीत 24 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किमतीत 15 पैशांची वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत.

मुंबईत पेट्रोलच्या दरात 13 पैशांची वाढ झाली होती आणि आता पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 97.57 रुपये आहे. इतकंच नाहीतर डिझेल प्रतिलिटर 88.60 रुपये दराने विकलं जात आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरांनी कायम उच्चांक गाठलं. त्याचबरोबर मुंबईतील प्रीमियम पेट्रोल 100 रुपयांच्या पलीकडे पोहोचलं आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, मंगळवारी कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 91.35 लिटर आहे. त्याचबरोबर डिझेल आज प्रति लिटर 84.35 रुपयांवर आहे. चेन्नईत पेट्रोलच्या दरात 22 पैशांची वाढ झाली होती आणि आता पेट्रोल 93.11 रुपये प्रति लिटरला विकलं जात आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर

नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 91.17 रुपये प्रतिलिटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today) : 97.57 रुपये प्रतिलिटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 91.35 रुपये प्रतिलिटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 93.11 रुपये प्रतिलिटर

नोएडा (Noida Petrol Price Today) : 89.38 रुपये प्रतिलिटर

देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 81.47 रुपये प्रतिलिटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.60 रुपये प्रतिलिटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.35 रुपये प्रतिलिटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) : 86.45 रुपये प्रतिलिटर

नोएडा (Noida Diesel Price Today) : 81.91 रुपये प्रतिलिटर

राज्यातील पेट्रोलचे दर

मुंबई – 97.47 प्रतिलिटर

ठाणे – 97.45 प्रतिलिटर

पुणे – 97.35 प्रतिलिटर

नागपूर – 98.08 प्रतिलिटर

सांगली – 97. 73 प्रतिलिटर

सातारा – 97.94 प्रतिलिटर

कोल्हापूर – 97.78 प्रतिलिटर

परभणी – 99.68 प्रतिलिटर

राज्यातील डिझलचे दर

मुंबई – 88.60 प्रतिलिटर

ठाणे – 88.55 प्रतिलिटर

पुणे – 87.03प्रतिलिटर

नागपूर – 89.15 प्रतिलिटर

सांगली – 87.42 प्रतिलिटर

सातारा – 87.63 प्रतिलिटर

कोल्हापूर – 87.48 प्रतिलिटर

परभणी – 89.28 प्रतिलिटर

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (petrol diesel rate today 03 march 2021 know the new price of delhi mumbai and all cities)

संबंधित बातम्या – 

बँक ऑफ बडोदाची जबरदस्त सेवा; 24 तासांत कधीही ‘या’ नंबरवर मिस्ड कॉलद्वारे मिळवा खात्यासंबंधी माहिती

6 कोटी लोकांसाठी मोठी बातमी! पीएफ व्याजदर कमी होणार; ‘या’ दिवशी घोषणा

Gold Rate Today: सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, चांदीही स्वस्त; पटापट जाणून घ्या तोळ्याचा भाव

(petrol diesel rate today 03 march 2021 know the new price of delhi mumbai and all cities)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.