Today Petrol Price : मित्रा, इंधन महागाईतून सूटका कधी होणार ? एक लिटर पेट्रोलसाठी किती दिवस मोजणार जादा दाम

Today Petrol Price : पेट्रोल डिझेलचे दाम लवकरच आटोक्यात येतील या प्रतिक्षेत भारतीय नागरिकांची दोन वर्षे हा हा म्हणता भूर्रकन निघून गेली. आता अजून किती दिवस प्रतिक्षा करावी लागणार?

Today Petrol Price : मित्रा, इंधन महागाईतून सूटका कधी होणार ? एक लिटर पेट्रोलसाठी किती दिवस मोजणार जादा दाम
दर किती
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 8:38 AM

नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांत पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Rate) कमी होणार असल्याच्या अनेकदा चर्चा झडल्या. पण नागरिकांच्या हाती काही लागले नाही. उलट खिशाला दोन वर्षांपासून चाट लागत आहे. सर्वसामान्यांचे बजेट पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरांमुळे (Domestic Gas Price) दरमहा तिप्पट वाढले आहे. हा बोजा कमी झाला तर महागाई आटोक्यात येऊ शकते. पण माशी कुठं शिंकली हेच नागरिकांना कळत नाहीये. गेल्या उन्हाळ्यात आणि त्यानंतर जुलै ऑगस्ट महिन्यात क्रूड ऑईलच्या किंमती (Crude Oil Price Today) गगनाला भिडल्या होत्या. हे अपवाद वगळता कच्चा तेलाचे भाव सातत्याने घरणीलाच आहेत. तरीही भारतीय तेल विपणन कंपन्या (OMCs) पेट्रोल-डिझेलमागे तोटा होत असल्याचा शिमगा घालत आहे. आता ही गेल्या दहा दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलात कमालीची घसरण झाली आहे. त्यात मोदी सरकारच्या रणनितीमुळे भारताला रशियाकडून अत्यंत स्वस्त दरात इंधन पुरवठा होत आहे. मग पेट्रोल-डिझेलच्या आघाडीवर सर्वसामान्यांना दिलासा कधी मिळणार, असा सवाल पेट्रोल पंपावर जाणाऱ्या वाहनधारकाला सतावत आहे. पण सध्या तरी दरवाढीतून त्याची सूटका होताना दिसत नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने कच्चा तेलात (Crude Oil Price) घसरण होत आहे. प्रत्येक दिवशी भावात घट होत आहे. गेल्या पाच दिवसांत किंमती कमालीच्या घसरल्या आहेत. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil Price) 73.39 डॉलर प्रति बॅरलवर आहे. तर ब्रेंट क्रूड ऑईलचा (Brent Crude Oil) भाव 79.94 डॉलर प्रति बॅरलवर आहे.

केंद्र सरकारने 21 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर देशात पेट्रोल 8 रुपये तर डिझेल 6 रुपयांनी स्वस्त झाले होते. भाजप शासित काही राज्य सरकारांनी ही व्हॅटमध्ये कपात केल्याने इंधनाचे दर 100 रुपयांच्या आता आले आहेत. हरियाणातील नवीन काँग्रेस सरकारने प्रति लिटर डिझेलवर 3 रुपयांचा कर वाढविला आहे.

हे सुद्धा वाचा

तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

आज रविवारी महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर नजर टाकुयात. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे. अहमदनगर पेट्रोल 106.44 तर डिझेल 92.94 रुपये प्रति लिटर, अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर,

अमरावतीत 107.14 तर डिझेल 93.65 रुपये प्रति लिटर, औरंगाबाद 107.98 पेट्रोल आणि डिझेल 95.94 रुपये प्रति लिटर, नागपूरमध्ये पेट्रोल 106.06 तर डिझेल 93.23 रुपये प्रति लिटर, नांदेडमध्ये पेट्रोल 108.32 तर डिझेल 94.78 रुपये प्रति लिटर आहे.

जळगावमध्ये पेट्रोल 107.22 आणि डिझेल 93.73 रुपये प्रति लिटर, नाशिकमध्ये पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर, लातूरमध्ये पेट्रोल 107.38 तर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर, कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.55 आणि डिझेल 93.08 रुपये प्रति लिटर, पुण्यात पेट्रोलचा भाव 105.96 आणि डिझेल 92.48 रुपये प्रति लिटर, सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.20 रुपये तर डिझेल 92.74 रुपये प्रति लिटर आहे.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.