Today Petrol Price : आनंदवार्ता! कच्चा तेलाची घसरगुंडी, एक लिटर पेट्रोलचा भाव किती?

Today Petrol Price : देशात पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय किंमती सातत्याने घसरत असल्याने हा चमत्कार होण्याची शक्यता आहे.

Today Petrol Price : आनंदवार्ता! कच्चा तेलाची घसरगुंडी, एक लिटर पेट्रोलचा भाव किती?
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Feb 04, 2023 | 8:35 AM

नवी दिल्ली : भारतीय तेल कंपन्यांच नाही तर वाहनधाराकांसाठी ही गुड न्यूज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने कच्चा तेलात (Crude Oil Price) घसरण होत आहे. प्रत्येक दिवशी भावात घट होत आहे. गेल्या तीन दिवसांत भावात कमालीची पडझड झाली आहे. शनिवारी, 04 फेब्रुववारी 2023 रोजी क्रूड ऑईलमध्ये पुन्हा घसरण झाली. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलच्या (WTI Crude Oil Price) भावात 3.28 टक्के घसरण झाली. सध्या या तेलाचा बाजारभाव 73.39 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला आहे. ब्रेंट क्रूड ऑईलची (Brent Crude Oil) 2.71 टक्क्यांची घसरगुंडी उडाली. आज हा भाव 79.94 डॉलर प्रति बॅरलवर आला. या किंमतींवरच पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol Diesel Price) ठरविण्यात येतो. आज तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलचा भाव जामून घ्या.

गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलमध्ये मोठी घसरण झाली होती. गुरुवारी हा दर 83.34 डॉलर प्रति बॅरल होता. डब्ल्युटीआईच्या दरातही घसरण नोंदविण्यात आली होती. हा भाव 77.01 डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आला होता.

तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

हे सुद्धा वाचा

आज दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये तर डिझेलचा भाव 92.25 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे.

अहमदनगर पेट्रोल 106.53 तर डिझेल 93.03 रुपये प्रति लिटर, अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर, अमरावतीत 107.23 तर डिझेल 93.74 रुपये प्रति लिटर, औरंगाबाद 106.75 पेट्रोल आणि डिझेल 93.24 रुपये प्रति लिटर, नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 93.23 रुपये प्रति लिटर, नांदेडमध्ये पेट्रोल 108.32 तर डिझेल 94.78 रुपये प्रति लिटर आहे.

जळगावमध्ये पेट्रोल 106.17 आणि डिझेल 92.70 रुपये प्रति लिटर, नाशिकमध्ये पेट्रोल 105.89 रुपये आणि डिझेल 92.42 रुपये प्रति लिटर, लातूरमध्ये पेट्रोल 107.19 तर डिझेल 93.69 रुपये प्रति लिटर, कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.47 आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर, पुण्यात पेट्रोलचा भाव 105.77 आणि डिझेल 92.30 रुपये प्रति लिटर, सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.58 रुपये तर डिझेल 93.10 रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.