AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पीएफ’चे नवीन नियम माहीत आहेत काय?; पटापट वाचा, नाही तर मोठा आर्थिक फटका बसणार!

एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गेनायझेशनने (ईपीएफओ) आपल्या नियमात बदल केले आहेत. (PF account rule changes from june 1, EPFO subscribers must follow this guideline)

'पीएफ'चे नवीन नियम माहीत आहेत काय?; पटापट वाचा, नाही तर मोठा आर्थिक फटका बसणार!
EPF
| Edited By: | Updated on: Jun 05, 2021 | 11:07 PM
Share

नवी दिल्ली: एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गेनायझेशनने (ईपीएफओ) आपल्या नियमात बदल केले आहेत. 1 जूनपासून लागू झालेल्या या नव्या नियमानुसार आता पीएफ अकाउंट आधारशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. नव्या नियमानुसार तुमचं पीएफ अकाउंट आधारशी संलग्न नसेल तर तुम्हाला मोठं आर्थिक नुकसानही सोसावं लागू शकतं. (PF account rule changes from june 1, EPFO subscribers must follow this guideline)

नव्या नियमानुसार आता आधार कार्डला व्हेरिफाय करावं लागणार आहे. तुम्ही ज्या कंपनीत काम करत आहात, त्या कंपनीने तुमचा आधार नंबर पीएफ अकाउंटशी व्हेरिफाय करणं बंधनकारक आहे. ही त्या कंपनीची जबाबदारी आहे. तसं नाही झालं तर कंपनीकडून येणारी रक्कम मिळणार नाही. त्यावर उपाय म्हणजे कंपनी आणि कर्मचाऱ्यांनी परस्पर सहकार्याने पीएफ अकाउंट लिंक करून घ्यावं. नाही तर 1 जूननंतर तुमच्या जमा रकमेवर परिणाम होऊ शकतो. नव्या नियमात यूएनला (UAN) आधारशी व्हेरिफाय करावा लागणार आहे.

काय आहेत नवे नियम?

ईपीएफओ (EPFO) ने सोशल सिक्युरिटी कोड 2020च्या कलम 142 अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. ईपीएफओने सर्व कंपन्यांना 1 जूनपर्यंत त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते आधारशी लिंक करण्याचे आणि ते व्हेरिफाय करण्याचे निर्देश दिले होते. 1 जूनपर्यंत आधारशी खाते लिंक केलं नाही तर इलेक्ट्रॉनिक चलान किंवा रिटर्न भरता येणार नाही. अशा परिस्थितीत कंपनीकडून पीएफमध्ये देण्यात येणारं योगदान थांबवलं जाईल. त्यामुळे कंपनीचा पैसा कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही, असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

ईपीएफओने काय म्हटलं?

ईपीएफओने याबाबतची अधिसूचना जारी केली होती. त्यात 1 जूनपर्यंत पीएफ खात्याशी आधार लिंक करण्यास सांगितलं होतं. तसं न केल्यास 1 जूनपासून ईसीआर भरला जाणार नाही. सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे पीएफ खाते आधारशी लिंक नसेल तर कंपनी आणि कर्मचाऱ्यांना ईपीएफओच्या सेवेचा लाभ घेता येणार नाही.

पीएफ खाते आधारशी लिंक कसे कराल?

स्टेप-1: ईपीएफओचे अधिकृत संकेतस्थळ www.epfindia.gov.in वर जाऊन लॉग इन करा स्टेप-2: त्यानंतर ऑनलाइन सर्व्हिसेसवर क्लिक करा. नंतर ई-केवायसी पोर्टलवर जा. या ठिकाणी link UAN aadhar वर क्लिक करा स्टेप-3: यूएएन अकाउंटशी नोंदणी झालेला तुमचा यूएएन नंबर आणि मोबाइल नंबर अपलोड करा. स्टेप-4: त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी नंबर बॉक्समध्ये भरा. 12 नंबरचा आधार नंबर टाकून फॉर्म सबमिट करा. आता ओटीपी व्हेरिफिकेशन ऑप्शनवर क्लिक करा. स्टेप-5: तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल आईडीवर एक ओटीपी येईल. त्याने आधार नंबरला व्हेरिफाय करा. या व्हेरिफिकेशननंतर तुमचे आधार पीएफ अकाउंटशी लिंक होईल.    (PF account rule changes from june 1, EPFO subscribers must follow this guideline)

संबंधित बातम्या:

7th Pay Commission : दहा हजार ग्रेड पे सरकारी कर्मचाऱ्याला जवळपास 2.88 लाखाचं नुकसान

SBI, HDFC, ICICI : 30 जूनची डेडलाईन लक्षात ठेवा, अन्यथा FD अधिक लाभांश नाही मिळणार

मे महिन्यात जीएसटीमध्ये 65 टक्के वाढ, जाणून घ्या सरकारी तिजोरीत किती रक्कम आली

(PF account rule changes from june 1, EPFO subscribers must follow this guideline)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.