Share Market : कोरोनाचे भूत पुन्हा मानगुटीवर, शेअर बाजारात धडामधूम, परंतु, हेल्थकेअर सेक्टरमधील स्टॉक सूसाट..

| Updated on: Dec 21, 2022 | 8:06 PM

Share Market : कोरोनाचे भूत पुन्हा मानगुटीवर येण्याची वर्दी मिळताच बाजाराला हादरे बसले..

Share Market : कोरोनाचे भूत पुन्हा मानगुटीवर, शेअर बाजारात धडामधूम, परंतु, हेल्थकेअर सेक्टरमधील स्टॉक सूसाट..
शेअर बाजाराला हादरे
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक (Corona) झाल्याच्या बातम्या येत आहेत. तर जगभरातही कोरोनाचे भूत मानगुटीवर बसल्याच्या वार्ता धडकत आहेत. त्याचा वाईट परिणाम शेअर बाजारावर (Share Market) झाला आहे. बाजार या बातमीने हादरला. गुंतवणूकदार भयभीत झाले. 2020 मध्ये कोरोना या नवीनच आजाराने संपूर्ण देशालाच भयभीत केले असताना स्टॉक बाजाराने जबरदस्त परतावा (Good Return) दिला. त्यात फार्मा सेक्टर (pharma Sector) सर्वात पुढे होते. आता बाजारात कोरोनामुळे भीतीचे वातावरण असताना फार्मा आणि केमिकल सेक्टरमधील शेअर्समध्ये पुन्हा एकदा तेजीचे सत्र आहे.

बुधवारी, 21 डिसेंबर 2022 रोजी हेल्थकेअर आणि फार्मा सेक्टरमधील अनेक शेअर्समध्ये तेजीचे सत्र होते. अॅपोलो हॉस्पिटल, IOL केमिकल्स आणि फार्मा, सुप्रिया लाईससायन्स, पेनेका बायोटेक, विमता लॅब, ग्लेनमार्क फार्मा, क्रस्ना डायग्नोस्टिक्स (KRSNAA), ग्रॅनुअल्स इंडिया या स्टॉकचा समावेश आहे.

निफ्टीमध्ये फार्मा सेक्टरने आज जोरदार मुसंडी मारली. यामध्ये 2.39 टक्क्यांची वाढ झाली आहे. याशिवाय आयटी सेक्टरमध्ये 0.53 टक्क्यांची तेजी दिसून आली. पण इतर सेक्टरमध्ये मात्र अनेक स्टॉक्सच्या दांड्या उडाल्या होत्या. त्यांनी गुंतवणूकदारांना निराश केले.

हे सुद्धा वाचा

इंडिया विक्सच्या आलेखात बाजारातील भीती स्पष्टपणे दिसून आली. आज या सेक्टरमध्ये 12 टक्क्यांची उसळी दिसून आली. म्हणजे बाजारात कोविड-19 ची भीती स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे बाजारात गुंतवणूकदारांनी आणि एफआयआयने विक्री सत्र आरंभले होते.

निफ्टीतील टॉप गेनर्सचा विचार करता, पहिले 4 स्टॉक फार्मा सेक्टरमधील होते. यामध्ये डिविस लॅब (Divis Labs) 4.99 टक्के, अपोलो हॉस्पिटल (Apollo Hospital) 3.69 टक्के, सिप्ला (Cipla) 3.38 टक्के, तर सन फार्मा (Sun Pharma) 1.75 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.