AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र सरकारकडून गॅस सिलिंडरबाबत मोठे निर्देश जारी, आता… वाचा तुम्हाला कोणता नियम पाळावा लागणार?

PNG Connection LPG Rules : केंद्राने दिलेल्या निर्देंशांमध्ये ज्या भागात PNG कनेक्शन उपलब्ध झाले आहे आणि तरीही नागरिक LPG गॅसचा वापर करत आहेत, त्यांचे LPG कनेक्शन रद्द होऊ शकते, अशी माहिती देण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडून गॅस सिलिंडरबाबत मोठे निर्देश जारी, आता... वाचा तुम्हाला कोणता नियम पाळावा लागणार?
LPG New RulesImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 23, 2026 | 7:17 PM
Share

केंद्र सरकारने देशातील स्वयंपाकाच्या गॅस म्हणजेच LPG सिलिंडरबाबत मोठे निर्देश जारी केले आहेत. पेट्रोलियम मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना LPG सिलिंडरऐवजी पाइपलाइनद्वारे पुरवठा होणाऱ्या नॅचरल गॅस म्हणजेच PNGच्या वापराला वेगाने प्रोत्साहन देण्याचे निर्देश दिले आहेत. यामागील उद्देश LPGवरील अवलंबित्व कमी करून गॅस पुरवठा व्यवस्था अधिक सुरक्षित आणि डिजिटल करणे हा असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

केंद्राने दिलेल्या निर्देंशांमध्ये ज्या भागात PNG कनेक्शन उपलब्ध झाले आहे आणि तरीही नागरिक LPG गॅसचा वापर करत आहेत, त्यांचे LPG कनेक्शन रद्द होऊ शकते, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित ग्राहकांना गॅसच्या वापराबाबत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नवीन LPG कंट्रोल ऑर्डर 2026 आणि ‘नॅचरल गॅस डिस्ट्रीब्युशन ऑर्डर 2026 अंतर्गत हे निर्देश जारी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या निर्देशांनुसार एकाच वेळी PNG आणि LPG अशा दोन्ही प्रकारची कनेक्शन्स ठेवण्यावर बंदी असणार आहे. त्यामुळे अशा ग्राहकांना त्यांचे LPG सिलिंडर कनेक्शन सरेंडर करावे लागणार आहे.

PNG कनेक्शन घ्यावेच लागणार का?

पेट्रोलियम सचिव नीरज मित्तल यांनी राज्यांना पाठवलेल्या पत्रात LPG मधून PNG कडे स्थलांतर करण्याचे नियम अधिक कडक करण्यात आल्याचे सांगितले आहे. ज्या सोसायट्या किंवा परिसरात PNG नेटवर्क उपलब्ध झाले आहे, तेथील ग्राहकांना यासंदर्भात नोटीस देण्यात येणार आहे. नोटीस मिळाल्यानंतरही संबंधित ग्राहकाने ठराविक कालावधीत PNG कनेक्शन घेतले नाही, तर त्याचे LPG सिलिंडर कनेक्शन आपोआप रद्द केले जाऊ शकते.

मध्य पूर्वेतील संकटाचा परिणाम

अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे मध्य पूर्वेतील परिस्थिती अद्याप तणावपूर्ण आहे. दोन्ही देशांकडून होर्मुझ सामुद्रधुनीबाबत दावे-प्रतिदावे सुरू आहेत. त्यामुळे होर्मुझमार्गे मध्य पूर्वेतून आशियाकडे येणाऱ्या तेल आणि गॅस वाहतूक करणाऱ्या जहाजांवर परिणाम होत आहे. याचा परिणाम गॅसच्या पुरवठ्यावरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे LPG वरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत आता PNGच्या वापराला अधिक प्राधान्य देत आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...