AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Post Office Scheme : सर्वात भन्नाट योजना, थेट पैसे दुप्पट, एकदा पैसे टाकले की…सरकारच्या या स्कीमची चर्चा!

आपण गुंतवलेल्या पैशांचे मूल्य वाढावे असे प्रत्येकालाच वाटते. विशेष म्हणजे अशा प्रकारची गुंतवणूक करताना कोणताही धोका नको, असे अनेकांना वाटते. अशाच लोकांसाठी सरकारची एक भन्नाट योजना आहे.

Post Office Scheme : सर्वात भन्नाट योजना, थेट पैसे दुप्पट, एकदा पैसे टाकले की...सरकारच्या या स्कीमची चर्चा!
post office schemeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 12, 2026 | 5:39 PM
Share

Kisan Vikas Patra : प्रत्येकालाच आपण कमवलेले पैसे सुरक्षित राहायला हवेत असे वाटते. विशेष म्हणजे हेच पैसे योग्य ठिकाणी गुंतवून काही लोकांना आपल्या पैशांचे मूल्य वाढायला हवे, असेही वाटते. याच आशेपोटी अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या पैशांची गुंतवणूक करतात. परंतु काही ठिकाणी गुंतवणूकदारांसोबत धोकाधडी होते. तर काही ठिकाणी फायदा होण्याऐवजी तोटाच होतो. अशा स्थितीत गुंतवणूकदारांना सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय हवा असतो. हाच पर्याय आता सरकारने पोस्ट ऑफिसच्या एका भन्नाट योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे. या योजनेच्या मदतीने तुम्ही थेट दुप्पट परतावा मिळवू शकता. विशेष म्हणजे या योजनेत पैसे गुंतवले तर ते बुडण्याचा धोकाही नसतो. सोबतच तुम्हाला 100 टक्के ठरवून दिलेला परतावा मिळतो.

नेमकी योजना काय आहे?

पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे किसान विकास पत्र (KVP) असे आहे. या योजनेत तुम्ही पैसे गुंवतवल्यास प्रत्येक वर्षाला 7.5 टक्के प्रतिवर्ष अशा हिशोबाने आकर्षक व्याज दिले जाते. योजनेत पैसे गुंतवण्यासाठी तुमचे वय किमान 18 वर्षे असणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे तुम्ही अगदी 1 हजार रुपयांपासून तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. तसेच या योजनेत जास्तीत जास्त कितीही रुपयांची गुंतवणूक करू शकता. कोणताही भारतीय नागरिक जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी खाते खोलू शकतो.

जेव्हा वाटेल तेव्हा काढा पैसे

काही योजनांत तुम्ही एकदा गुंतवणूक केली की ठरविक काळापर्यंत तुम्ही गुंतवलेले पैसे काढू शकत नाही. परंतु या योजनेत तुमच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन तुम्हाला कधीही पैसे काढून घेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. किसान विकास पत्र या योजनेत तुम्हाल 7.5 टक्के व्याज मिळते. तसेच अडीच वर्षांनी गुंतवलेली रक्कम कधीही काढून घेऊ शकता.

थेट पैसे होणार दुप्पट

या योजनेत तुम्ही गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे थेट दुप्पट होऊ शकतात. सध्याचा व्याजदर लक्षात घेतल्यास 9 वर्षे 7 महिन्यात तुमचे पैसे दुप्पट होतात. विशेष म्हणजे या योजनेत कोणतीही जोखीम नाही.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

काल आदानींच साम्राज्य दाखवून भाजपवर टीका,आज राज ठाकरेंचा तो फोटो बाहेर
काल आदानींच साम्राज्य दाखवून भाजपवर टीका,आज राज ठाकरेंचा तो फोटो बाहेर.
ठाकरेंना अदानी नव्हे तर... राज ठाकरे यांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर
ठाकरेंना अदानी नव्हे तर... राज ठाकरे यांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर.
संघर्ष मराठीचा की ठाकरेंच्या अस्तित्वाचा? ठाकरे बंधूंवर फडणवीसाची टीका
संघर्ष मराठीचा की ठाकरेंच्या अस्तित्वाचा? ठाकरे बंधूंवर फडणवीसाची टीका.
'बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मी पाडलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले...'
'बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मी पाडलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले...'.
कोस्टल रोडचं श्रेय ते राज ठाकरेंना नो स्पेस...फडणवीस काय-काय म्हणाले?
कोस्टल रोडचं श्रेय ते राज ठाकरेंना नो स्पेस...फडणवीस काय-काय म्हणाले?.
फडणवीस यांचे मुंबई लुटीच्या आरोपांना प्रत्युत्तर, आरोप फेटाळले अन्...
फडणवीस यांचे मुंबई लुटीच्या आरोपांना प्रत्युत्तर, आरोप फेटाळले अन्....
ठाकरेंनी शिंदेंना वाळीत टाकलं होतं अन्...फडणवीसांनी सगळंच सांगून टाकलं
ठाकरेंनी शिंदेंना वाळीत टाकलं होतं अन्...फडणवीसांनी सगळंच सांगून टाकलं.
लवकरच मोठा मित्र पक्षप्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य
लवकरच मोठा मित्र पक्षप्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य.
राज ठाकरेंच्या लाकुडतोड्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युतर...
राज ठाकरेंच्या लाकुडतोड्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युतर....
भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांवर कारवाई, थेट पक्षातून काढलं! अमरावतीत खळबळ
भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांवर कारवाई, थेट पक्षातून काढलं! अमरावतीत खळबळ.