PMAY-G: घर बांधण्यासाठीच्या कर्जावर सरकारकडून अनुदान; जाणून घ्या योजनेचा फायदा?

| Updated on: Nov 14, 2021 | 10:44 AM

पीएम आवास योजना ग्रामीण अंतर्गत अल्प उत्पन्न गटातील लोकांना घरे बांधण्यासाठी अनुदानावर कर्ज दिले जाते. PMAY-G मध्ये, तुमचे उत्पन्न वार्षिक 6 लाख रुपयांपर्यंत असल्यास, 6 लाख रुपयांच्या कर्जावर 6.5 टक्के क्रेडिट लिंक्ड सबसिडी मिळेल. कर्ज जास्तीत जास्त 20 वर्षांच्या कालावधीसाठी असावे. | PMAY-G

PMAY-G: घर बांधण्यासाठीच्या कर्जावर सरकारकडून अनुदान; जाणून घ्या योजनेचा फायदा?
पंतप्रधान आवास योजना
Follow us on

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी त्रिपुरातील 1.47 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजना- ग्रामीणचा पहिला हप्ता जारी करतील. पंतप्रधान एक वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पहिल्या हप्त्याचे वितरण करतील. यानिमित्ताने 700 कोटींहून अधिक रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

पीएम आवास योजना ग्रामीण अंतर्गत अल्प उत्पन्न गटातील लोकांना घरे बांधण्यासाठी अनुदानावर कर्ज दिले जाते. PMAY-G मध्ये, तुमचे उत्पन्न वार्षिक 6 लाख रुपयांपर्यंत असल्यास, 6 लाख रुपयांच्या कर्जावर 6.5 टक्के क्रेडिट लिंक्ड सबसिडी मिळेल. कर्ज जास्तीत जास्त 20 वर्षांच्या कालावधीसाठी असावे. जर तुम्हाला घर बांधण्यासाठी यापेक्षा जास्त रक्कम हवी असेल तर तुम्हाला त्या जादा रकमेवर साध्या व्याजदराने कर्ज घ्यावे लागेल.

अर्ज कसा कराल?

पंतप्रधान आवास योजना ग्रामीण योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकारने मोबाईल आधारित गृहनिर्माण अॅप तयार केले आहे. ते गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येते. डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरच्या मदतीने लॉगिन आयडी तयार करावा लागेल.
यानंतर अॅप तुमच्या मोबाइल नंबरवर वन टाईम पासवर्ड पाठवेल. याच्या मदतीने लॉग इन केल्यानंतर आवश्यक माहिती भरा. PMAY-G अंतर्गत घर मिळविण्यासाठी अर्ज केल्यानंतर केंद्र सरकार लाभार्थ्यांची निवड करते. यानंतर लाभार्थ्यांची अंतिम यादी PMAY-G च्या वेबसाइटवर टाकली जाते.

सर्वप्रथम rhreporting.nic.in/netiay/Benificiary.aspx या वेबसाइटवर जा. नोंदणी क्रमांक असल्यास, तो प्रविष्ट करा आणि क्लिक करा, त्यानंतर तपशील दिसेल. जर नोंदणी क्रमांक नसेल तर ‘Advance Search’ वर क्लिक करा. त्यानंतर जो फॉर्म येतो तो भरा. त्यानंतर सर्च ऑप्शनवर क्लिक करा. तुमचे नाव PMAY-G यादीमध्ये असल्यास, सर्व संबंधित तपशील दिसेल.

2 लाखांपर्यंत आर्थिक मदत मिळणार

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. बेघर लोकांना घरे उपलब्ध करून देणे हे PMAY-G योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना घरे बांधण्यासाठी 2 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेंतर्गत आतापर्यंत १,६३,६६,४५९ घरे पूर्ण झाली आहेत. पीएम आवास योजना ग्रामीण अंतर्गत 2,19,789.39 कोटी जारी करण्यात आले आहेत.

इतर बातम्या:

आरबीआय नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी, काय आहे विशेष? कोणत्या बॅंकांवर परिणाम होईल?

जास्त जनधन बँक खाती असलेल्या राज्यांतील गुन्ह्यांच्या प्रमाणात घट: एसबीआय

‘या’ बँकेत तुमचं खातं आहे का, नाशिकमधील सहकारी बँकेवर RBI ची मोठी कारवाई