AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या सरकारी कंपन्यांनी केली कमाल; HAL, RVNL सह 80 स्टॉक्सने 9 महिन्यात केले गुंतवणूकदारांना मालामाल

PSU Stock : बाजारातील या चढउतारात पण गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न मिळाला. यामध्ये गुंतवणूकदारांना केवळ 9 महिन्यात 450 टक्क्यांपेक्षा अधिकचा छप्परफाड रिटर्न दिला. या स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली असती तर आज जोरदार कमाई झाली असती.

या सरकारी कंपन्यांनी केली कमाल; HAL, RVNL सह 80 स्टॉक्सने 9 महिन्यात केले गुंतवणूकदारांना मालामाल
सरकारी कंपन्यांचे शेअर सूसाट
| Updated on: Aug 01, 2024 | 5:03 PM
Share

शेअर बाजारात चढउताराचे सत्र असले तरी, बाजाराने गुरुवारी एक नवीन विक्रम केला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा Nifty 50 ने पहिल्यांदा 25,000 अंकाचा स्तर ओलांडला. मुंबई स्टॉक एक्सचेंजचा शेअर इंडेक्स Sensex ने 82,000 अंकांचा टप्पा पार केला. या सरकारी शेअरमध्ये गुंतवणूक करणारे आता मालामाल झाले आहे. या शेअरने बंपर रिटर्न दिला आहे. या सरकारी शेअरने अवघ्या 9 महिन्यात मालामाल केले.

छप्परफाड रिटर्न

सरकारी कंपन्यांच्या 80 स्टॉकने कमाल केली आहे. यामध्ये केवळ 9 महिन्यात 450 टक्क्यांहून अधिक छप्परफाड रिटर्न दिला. हे स्टॉक या गुंतवणूकदारांसाठी लकी ठरले आहेत. बाजारातील तज्ज्ञानुसार, यामधील 25 हून अधिक 4 स्टॉक्सने 100 टक्क्यांहून अधिक कमाई करुन दिली.

कोचीन शिपयार्ड, माझगाव डॉक शिपबिल्डर्स आणि रेल विकास निगम, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडसह 80 शेअरने तुफान फायदा करुन दिला. या शेअरमध्ये दोन वर्षांपूर्वी एक लाखांची गुंतवणूक करणाऱ्यांना 15 लाखांहून अधिकचा परतावा दिला. हडकोच्या शेअरने गेल्या 9 महिन्यात गुंतवणूकदारांना 800 टक्क्यांहून अधिकचा रिटर्न दिला.

रेल्वे कंपनीचा शेअर झाला रॉकेट

रेल विकास निगमने बाजारात गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिला. RVNL आणि आयनॉक्स विंडने गेल्या 9 महिन्यात गुंतवणूकदारांना अनुक्रमे 300 टक्के आणि 250 टक्क्यांचा रिटर्न दिला. भारत डायनॅमिक्सने या कालावधीत 205 टक्क्यांहून अधिकची भरारी घेतली.

हे स्टॉक झाले मल्टिबॅगर

एजिस लॉजिस्टिक्स, ऑईल इंडिया, ट्रेंट, सिग्नेचर ग्लोबल (इंडिया), मोतीलाल ओसवाल, ओरेकल फायनेन्शिअल, एनबीसीसी (इंडिया), हिताची एनर्जी, माझगाव डॉक, आयआरएफसी, हिंदुस्तान एयरोनॉटिक्स, अमारा राजा, बीएचईएल, शोभा, टीव्हीएस होल्डिंग्स, श्नाइडर इलेक्ट्रिक, टोरेंट पॉवर हे शेअर मल्टिबॅगर ठरले.

बीएएसएफ इंडिया, एनसीसी, स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्तान पेट्रोलियम, आरईसी, पॉवर फायनेंस कॉर्पोरेशन, एनएलसी इंडिया, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट, बीईएमएल, स्वान एनर्जी, प्रेस्टीज एस्टेट्स, कमिंस इंडिया, हिंदुस्तान कॉपर, एमआरपीएल, जुबिलेंट फार्मोवा आणि एचबीएल पॉवरमध्ये 125 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसली.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.