YES बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना ईडीकडून अटक, पीएमसी बँक घोटाळ्याबाबत चौकशी होणार

YES बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना ईडीकडून अटक, पीएमसी बँक घोटाळ्याबाबत चौकशी होणार
राणा कपूर

YES बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना संक्तवसुली संचालनालयाने (ED) बुधवारी (27 जानेवारी) अटक केली आहे. (Rana Kapoor YES Bank)

prajwal dhage

|

Jan 28, 2021 | 8:37 AM

मुंबई : YES बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना संक्तवसुली संचालनालयाने (ED) बुधवारी (27 जानेवारी) अटक केली आहे. मॅक स्टार ग्रुप/ पीएमसी बँक घोटाळ्याबाबत चौकशी करण्यासाठी त्यांना अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणामध्ये अटक झालेले ते तिसरे व्यक्ती आहेत. 23 जानेवारी रोजी ईडीने मेहुल ठाकुर आणि मदन गोपाल चतुर्वेदी याना यापूर्वीच अटक केले आहे. राणा कपूर यांना सध्या नवी मुंबईतील तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे.

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी हाउसिंग डेव्हलपमेंट अ‌ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (HDIL) कंपनीचे संचालक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान हे मुख्य आरोपी आहेत. त्यांनी तब्बल 6500 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणी मागील काही दिवसांपासून YES बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्यामागेही चौकशीचा ससेमीरा सुरु आहे.

येस बँकेमधील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राणा कपूर यांचा संपूर्ण परिवार संशयाच्या भोवऱ्यात आहे. राणा कपूर यांची पत्नी बिन्दू कपूर, त्यांच्या तीन मुली राखी, रोशनी आणि राधा यांच्या नावावर अनेक कंपन्या आहेत. बेकायदेशीर क४ज मिळूवन देण्याच्या बदल्यात राणा कपूर यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलींना लाच देण्यात आल्याचा आरोप आहे.

दरम्यान, राणा कपूर आणि अशोक कपूर यांनी 2004 मध्ये येस बँकेची स्थापना केली होती. त्यानंतर राणा यांनी येस बँकेतून स्वत: च्या मर्जीने जवळच्या लोकांना मोठे कर्ज दिल्याचा आरोप आहे. 2017 मध्ये येस बँकेने 6 हजार 355 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. याच कर्जप्रकरणी सध्या कपूर यांची चौकशी सुरु आहे.

संबंधित बातम्या :

PMC Bank fraud : 22 फ्लॅट, 1 विमान, 1 जहाज, ईडीच्या हाती घबाड

Rana Kapoor | ‘YES बँके’चे माजी सीईओ राणा कपूर यांना 11 मार्चपर्यंत ईडी कोठडी

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी बडे मासे सापडले, वाधवान बिल्डर्सला अटक, 3500 कोटींची संपत्ती जप्त 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें