अंबानी कुटुंबात नव्या युगाची सुरुवात, इशा अंबानी यांच्यावर मोठी जबाबदारी; मुकेश अंबानी आता…

आरबीआयने कंपनीला पाठविलेल्या यासंदर्भात पाठविलेल्या पत्रा म्हटले आहे की जर कंपनीने सहा महिन्यांच्या अवधीत हा प्रस्ताव न स्वीकारल्यास कंपनीला यासाठी पुन्हा नव्याने अर्ज करावा लागेल. तसेच कंपनीला नवीन अर्ज करताना प्रस्ताव न स्वीकारण्यामागचे योग्य कारण देखील सादर करावे लागेल.

अंबानी कुटुंबात नव्या युगाची सुरुवात, इशा अंबानी यांच्यावर मोठी जबाबदारी; मुकेश अंबानी आता...
ISHA AMBANIImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 16, 2023 | 8:52 PM

मुंबई | 16 नोव्हेंबर 2023 : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. रिलायन्सची नवीन कंपनी जियो फायनान्शियल सर्व्हीसेस संबंधी ही मोठी घडामोड आहे. जिओ फायनान्सिअल सर्व्हीसेस ( Jio Finacial Services ) मध्ये डायरेक्टर या पदासाठी मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी यांच्या नियुक्तीला भारतीय रिझर्व्ह बॅंकेने आपली मंजूरी दिली आहे.  ईशा अंबानी यांच्या सोबत आरबीआयने संचालक म्हणून अंशुमन ठाकूर आणि हितेश कुमार सेठीया यांच्या नावावरही मोहर लावली आहे. ईशा रिलायन्स रिटेलच्याही डायरेक्टर आहेत.

आरबीआयने कंपनीला पाठविलेल्या यासंदर्भात पाठविलेल्या पत्रा म्हटले आहे की जर कंपनीने सहा महिन्यांच्या अवधीत हा प्रस्ताव न स्वीकारल्यास कंपनीला यासाठी पुन्हा नव्याने अर्ज करावा लागेल. तसेच कंपनीला नवीन अर्ज करताना प्रस्ताव न स्वीकारण्यामागचे योग्य कारण देखील सादर करावे लागेल. या वर्षी मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने डी – मर्जर प्रोसेसने आपल्या फायनान्सियल बिझनेसला स्वतंत्र केले आहे. त्यानंतर जियो फायनान्सियल सर्व्हीसेस अस्तित्वात आली आहे.

ईशावर रिलायन्स रिटेलची जबाबदारी –

भारतात जियो Jio ची संकल्पना आणण्यासाठी आणि तिला लॉंच करण्यामागे ईशा अंबानी यांची मोठी भूमिका राहीली आहे. सध्या मुकेश अंबानी यांची कन्या इशा त्यांचा रिटेल कारभार रिलायन्स रिटेलचे नेतृत्व सांभाळत असून त्याचा विस्तार करीत आहे.ईशा अंबानी हीने ( Isha Ambani ) येल युनिव्हर्सिटीतून सायकोलॉजी आणि साऊथ इंडीयन स्टडीजमध्ये डीग्री घेतली आहे. तसेच ईशा अंबानी यांनी स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटीतून एमबीएची डीग्री देखील घेतलेली आहे.

नियुक्तीच्या बातमीने शेअर वधारले

मुकेश अंबानी यांच्या जियो फायनान्सियल सर्व्हीसेसचे शेअर गेल्या ऑगस्ट 2023 महिन्यात शेअर मार्केटमध्ये लीस्ट झाले होते, लिस्टींग नंतर त्यात घसरण झाली होती.नंतर शेअरने वेग पकडला. गुरुवारी इशा अंबानी यांच्या नियुक्तीला आरबीआयची मंजूरी मिळाल्याच्या वृत्तानंतर कंपनीच्या शेअर त्याचा चांगला परिणाम झाला. कारभार संपेपर्यंत जियो फायनान्सियल सर्व्हीस स्टॉकचा भाव 1.32 टक्क्यांच्या उसळीनंतर 227.10 रुपयांच्या लेव्हलवर क्लोज झाला.

जियो फायनान्सियलचे मूल्य

जियो फायनान्सचे मार्केट कॅपिटलायझेशन 1.44 लाख कोटी रुपये आहे. कंपनीच्या शेअरचा 52 व्या आठवड्याचा हाय लेव्हल 266.95 रुपये आणि 52 आठवड्याचा लो लेव्हल 202.80 रुपये आहे. इशा अंबानीला अलिकडेच रियालन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात समाविष्ठ केले आहे. त्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी एजीएममध्ये केली होती. अलिकडेच कंपनीच्या शेअर होल्डरनी रिलायन्स बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये आकाश अंबानी, इशा अंबानी आणि अनंत अंबानी यांना सामील करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली होती.

Non Stop LIVE Update
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी.
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.