RBI ने TCPSL ला 2 कोटी आणि ATPL ला 54.93 लाखांचा दंड ठोठावला, काय आहे प्रकरण?

| Updated on: Nov 24, 2021 | 10:38 PM

या दोन PSO प्रदात्यांना दंड लावण्याचे कारण नियमांचे पालन न करणे हे आहे आणि त्याचा त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या व्यवहारांच्या वैधतेशी काहीही संबंध नाही, असंही RBI ने स्पष्ट केले. आरबीआयने केरळस्थित कंपनी मुलामुत्तिल फायनान्सियर्स लिमिटेडला 20 लाखांचा दंड ठोठावल्याची माहिती दिलीय. एनपीएशी संबंधित नियमांचे पालन न केल्याबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आले.

RBI ने TCPSL ला 2 कोटी आणि ATPL ला 54.93 लाखांचा दंड ठोठावला, काय आहे प्रकरण?
Follow us on

नवी दिल्लीः रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने टाटा कम्युनिकेशन्स पेमेंट सोल्युशन्स लिमिटेड (TCPSL) आणि अपनीट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (ATPL) वर नियमांचे पालन न केल्याबद्दल दंड ठोठावलाय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन कंपन्यांवर दंड ठोठावण्याची माहिती दिली. त्यानुसार TCPSL ला 2 कोटी रुपये आणि ATPL ला 54.93 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय.

संपत्तीशी संबंधित नियमांचे पालन केले नाही

टीसीपीएसएलने व्हाईट लेबल एटीएमची स्थापना आणि नेट वर्थ यासंबंधीच्या सूचनांचे पालन केले नसल्याचे आढळून आलेय, असंही आरबीआयने म्हटलेय. एटीपीएलने एस्क्रो खात्यांमधील शिल्लक आणि निव्वळ संपत्तीशी संबंधित नियमांचे पालन केले नाही. त्याच्याकडून मिळालेल्या उत्तराचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय बँकेने त्याच्यावर दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.

दंड का ठोठावला?

या दोन PSO प्रदात्यांना दंड लावण्याचे कारण नियमांचे पालन न करणे हे आहे आणि त्याचा त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या व्यवहारांच्या वैधतेशी काहीही संबंध नाही, असंही RBI ने स्पष्ट केले. आरबीआयने केरळस्थित कंपनी मुलामुत्तिल फायनान्सियर्स लिमिटेडला 20 लाखांचा दंड ठोठावल्याची माहिती दिलीय. एनपीएशी संबंधित नियमांचे पालन न केल्याबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आले.

एसबीआयवरही केली कारवाई

अलीकडेच RBI ने नियमांचे पालन करताना त्रुटींसाठी देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) वर 1 कोटीचा दंड ठोठावला. बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 47A(1)(c) च्या तरतुदींनुसार आरबीआयने दिलेल्या अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला, असे केंद्रीय बँकेने एका निवेदनात म्हटले. त्याचवेळी सेंट्रल बँकेने स्टँडर्ड चार्टर्ड बँक या खासगी बँकेलाही 1.95 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. निर्धारित कालावधीत सायबर सुरक्षा घटनेचा अहवाल देण्यात अयशस्वी झाल्याबद्दल आणि इतर कारणांमुळे अनधिकृत इलेक्ट्रॉनिक व्यवहारांमध्ये गुंतलेली रक्कम जमा करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल RBI ने स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला 1.95 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.

सहकारी बँकांवर कारवाई

यापूर्वीच्या घटनांवर नजर टाकल्यास अनेक बँका आणि सहकारी संस्थांवर आरबीआयने कारवाई केल्याचं पाहायला मिळेल. बँकिंगशी संबंधित नियमांचे पालन न केल्याबद्दल अनेकांना दंड ठोठावण्यात आला. गेल्या महिन्यात RBI ने खासगी क्षेत्रातील बँक RBL बँकेला नियमांचे पालन न केल्याबद्दल आणि बँकिंग नियमन कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. 26 ऑक्टोबरच्या अशाच एका घटनेत आरबीआयने मोठी कारवाई केली. वेगवेगळ्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरबीआयने दोन सहकारी बँकांना दंड ठोठावला. यामध्ये महाराष्ट्रातील वसई विकास सहकारी बँक आणि पंजाबमधील जालंधर येथील नागरी सहकारी बँक लिमिटेड यांची नावे आहेत. काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील वसई विकास सहकारी बँकेला 90 लाखांचा दंड ठोठावलाय. या बँकांनी आरबीआयच्या एनपीएबाबत काही नियमांचे उल्लंघन केले आणि सूचनांचे पालन केले नाही, त्यामुळे दंड आकारण्यात आला. याशिवाय नागरिक नागरी सहकारी बँकेला उत्पन्नाची ओळख, मालमत्तेचे वर्गीकरण, तरतूद या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 7 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

संबंधित बातम्या

भारत सरकारकडून My Home Group चा सन्मान; चांगल्या कार्यासाठी गौरव

तो ‘फुगा’ लवकरच फुटेल; RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं क्रिप्टोकरन्सीबद्दल मोठं विधान