AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियात मंदी, जर्मनी-इटली सुस्त तरी भारताचा विकास राहील अव्वल

जगावर आर्थिक मंदीचे सावंत असताना देखील भारत मात्र चांगली प्रगती करेल अशी शक्यता IMF ने वर्तविली आले.

रशियात मंदी, जर्मनी-इटली सुस्त तरी भारताचा विकास राहील अव्वल
अर्थव्यवस्था Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 11, 2022 | 8:39 PM
Share

मुंबई,  2022 मध्ये भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था (Indian Economy) असेल. आयएमएफने आज जाहीर केलेल्या वाढीच्या अंदाजातून हे समोर आले आहे. इतकंच नाही तर पुढच्या वर्षीही भारताची वाढ सर्वात वेगवान असू शकते असा अंदाज IMF ने वर्तवला आहे.दुसरीकडे 2022 आणि 2023 मध्ये रशियामध्ये मंदी येण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे. त्याच वेळी, 2023 मध्ये, जर्मनी आणि इटलीमध्ये देखील अर्थव्यवस्था सुस्त असेल. आयएमएफच्या आधी जगभरातील इतर अनेक संस्थांनीही भारत जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगवान विकास साधेल असे मत व्यक्त केले आहे.

काय आहे आयएमएफचा अंदाज

IMF च्या  अंदाजानुसार, भारत 2022 मध्ये 6.8 टक्के वाढ नोंदवू शकतो. त्याच वेळी, 2023 मध्ये भारताचा विकास दर 6.1 टक्के असू शकतो.  विकसनशील प्रदेशांचा एकूण विकास दर दोन्ही वर्षांमध्ये 3.7 टक्के असेल. या क्षेत्रातील चीनचा सर्वात मोठा स्पर्धक देखील विकासाच्या बाबतीत भारतापेक्षा खूप मागे आहे, IMF च्या अंदाजानुसार, चीनची अर्थव्यवस्था 2022 मध्ये 3.2 टक्के आणि 2023 मध्ये 4.4 टक्के वाढू शकते.

अनेक देशांमध्ये मंदीची भीती

आयएमएफच्या आकडेवारीत अनेक देशांमध्ये मंदीची शक्यता आहे. अमेरिका 2022 मध्ये 1.6 टक्के आणि 2023 मध्ये 1 टक्के दराने वाढू शकते. म्हणजेच जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था मंदीत आहे. दुसरीकडे, 2023 मध्ये जर्मनीची अर्थव्यवस्था मंदीत जाऊ शकते. IMF ने 2023 मध्ये येथे 0.3 टक्के घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. इटलीमध्ये 2023 मध्ये 0.2 टक्के घट होण्याची शक्यता आहे.

सर्वात वाईट परिस्थिती रशियाची असू शकते, जिथे 2022 मध्ये विकास 3.4 टक्के आणि 2023 मध्ये 2.3 टक्के  घसरेल.

IMF ने कमी केला GDP अंदाज

चलनवाढ आणि मध्यवर्ती बँकांच्या धोरणांमुळे, IMF ने 2023 वर्षासाठी आपला वाढीचा अंदाज कमी केला आहे, IMF चा अंदाज आहे की 2023 मध्ये जागतिक GDP वाढ 2.7 टक्के असू शकते. हे मागील अंदाजापेक्षा 20 बेसिस पॉइंट्स कमी आहे. त्यानंतर 2.9 टक्के वाढीचा अंदाज देण्यात आला होता. त्याच वेळी, 2022 सालासाठी वाढीचा अंदाज 3.2 टक्के कायम ठेवण्यात आला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...