HDFC : RD वर इतके वाढवले व्याजदर, HDFC ने सणाच्या सिझनमध्ये वाढवला गोडवा..

कल्याण माणिकराव देशमुख, Tv9 मराठी

|

Updated on: Oct 14, 2022 | 9:14 PM

HDFC : आवर्ती ठेव योजनेत गुंतवणूक करणे आता अधिक फायदेशीर ठरणार आहे..

HDFC : RD वर इतके वाढवले व्याजदर, HDFC ने सणाच्या सिझनमध्ये वाढवला गोडवा..
व्याजदर वाढले
Image Credit source: सोशल मीडिया

नवी दिल्ली : एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) मुदत ठेवीवरील (FD)व्याज दरात वाढ केल्यानंतर आवर्ती ठेव योजनेवरील (RD) व्याजदरात वाढीची घोषणा केली आहे. त्यामुळे तुम्हाला बचत तर होणारच पण त्यावर तुम्हाला जोरदार परतावाही मिळणार आहे. तेव्हा तुम्ही आरडीत गुंतवणूक करु इच्छित असाल तर ही संधी तुमच्यासाठीच

एचडीएफसी बँकेने RD वर 50 बेसिस पॉईंट्स म्हणजे 0.50 टक्के व्याजदर वाढवला आहे. नवीन दर 11 ऑक्टोबर 2022 रोजी पासून लागू होतील. बँकेने सर्वसामान्य ग्राहकांना 6 ते 12 महिन्यांच्या वेगवेगळ्या आवर्ती ठेव योजनांसाठी ही ऑफर दिली आहे.

एचडीएफसी बँकेने आरडी वर 4.25% ते 6.10% व्याज जाहीर केले आहे. नवीन व्याजदर 11 ऑक्टोबर 2022 रोजी पासून लागू झाले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वसामान्य खातेदारांपेक्षा ज्यादा व्याज मिळेल. त्यांना 4.75% ते 6.75% व्याज मिळेल. त्याचा फायदा आवर्ती ठेव योजनेतील ठेवीदारांना होईल.

हे सुद्धा वाचा

एचडीएफसी बँकेने 6 ते 36 महिने आणि 90 ते 120 महिनेच्या मॅच्युरिटीवरील आरडीवर व्याज दर वाढविला आहे. बँकेने 39, 48 आणि 60 महिन्यांच्या मॅच्युअर होणाऱ्या आरडीवरील व्याज दरात वाढ केलेली नाही.  या आवर्ती ठेव योजनांवर पूर्वी प्रमाणेच व्याज मिळणार आहे.

ग्राहकांना या योजनेचा फायदा होणार आहे. बचतीवर त्यांना आता आकर्षक व्याजदर मिळत आहे. व्याजदरात चांगली वाढ झाली आहे. दर महिन्याच्या बचतीवर आता चांगला परतावा मिळेल. पण या योजनेत जास्त दिवसाच्या काही बचतीवर फायदा मिळणार नाही.

एचडीएफसी बँकेच्या अधिकृत संकेस्थळावर जाऊन तुम्हाला वेगवेगळ्या कालावधीच्या योजनेत गुंतवणूक केल्यास काय फायदा होईल याची माहिती मिळेल. त्यासाठी कॅलक्युटरचा वापर करता येईल. तुम्ही https://www.hdfcbank.com/personal/tools-and-calculators/rd-calculator या संकेतस्थळावर ही सुविधा मिळवू शकता.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI