तिसऱ्या तिमाहिमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजला 18,549 कोटींचा नफा, जिओमध्येही 8.9 टक्क्यांची वाढ

तिसऱ्या तिमाहिमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजला 18,549 कोटींचा नफा, जिओमध्येही 8.9 टक्क्यांची वाढ

रिलायन्स इंडस्ट्रीजने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 18, 549 कोटींचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात 41.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या तिसऱ्या तिमाहीत रिलायन्स जिओचा निव्वळ नफा 3,615 कोटी रुपये होता.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Jan 21, 2022 | 9:46 PM

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries) चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत (third quarter)  18, 549 कोटींचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात 41.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या तिसऱ्या तिमाहीत रिलायन्स जिओचा निव्वळ नफा 3,615 कोटी रुपये होता. तर तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल(Revenue) 19,347 कोटी रुपये इतका राहिला. या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीचा एकत्रित महसूल 54. 25 टक्क्यांनी वाढून 191271 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत एकत्रित महसूल 1,23,997 कोटी रुपये इतका होता. कंपनीचा निव्वळ नफा मार्जिन 9.8 टक्के राहिला आहे. त्या तुलनेत कंपनीचा निव्वळ नफा मार्जिन सप्टेंबरच्या तिमाहीत 8.1 टक्के आणि एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 10. 8 टक्के होता.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे उत्पन्नही वाढले

तेल, रिटेल तसेच दूरसंचार क्षेत्रातील चांगल्या कामगिरीमुळेच आर्थिक वर्ष 2022 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये चांगला नफा झाल्याचा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगितले की, ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत निव्वळ नफा 18,549 कोटी रुपये इतका होता. वर्षभरापूर्वी याच तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्याचे प्रमाण 13,101 कोटी रुपये इतके होते. कंपनीने म्हटले आहे की 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत समूहाच्या कामकाजावर कोणताही मोठा परिणाम झाला नाही. या तिमाहीत कंपनीचा EBITDA 29.9 टक्क्यांनी वाढून 33,886 कोटी रुपये झाला आहे. तसेच कंपनीच्या शेअरमध्ये देखील 18.26 टक्क्यांची वाढ झाली आहे.

जिओचा नफा 8.9 टक्क्यांनी वाढला

कंपनीने केलेल्या दाव्यानुसार , रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्मचा एकत्रित नफा 8.9 टक्क्यांनी वाढून 3,795 कोटी रुपये झाला आहे. या विभागातील कंपनीचा एकूण महसूल 13.8 टक्क्यांनी वाढून 24,176 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या विभागासाठी त्याचा एबिटा 18 टक्क्यांनी वाढून 10,008 कोटी रुपये झाला आहे. तर, त्याचा रोख नफा 14,7 टक्क्यांनी वाढून 8747 कोटी रुपये इतका झाला आहे. या तिमाहीत जिओने एकूण 102 कोटी नवे ग्राहक जोडले असून, जिओच्या एकूण सदस्यांची संख्या 4.21 कोटींवर पोहचली आहे.

संबंधित बातम्या

HDFC Life Insurance : एचडीएफसी लाइफ इन्शुरन्सला “अच्छे दिन” नफ्यात वाढ, 3.3 टक्के नफ्यासह उत्पन्नही वाढले

Vodafone-Idea : वोडाफोन-आयडियाची साथ सोडत आहेत ग्राहक! नेमकं कारण काय?

बजेट 2022: पॅकेजचा बूस्टर डोस की करांचा बोजा; शेतकऱ्यांना अर्थसंकल्पातून काय मिळणार?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें