AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किरकोळ व्यवहारांची मोठी भरारी; तीन वर्षात उच्चांकी कामगिरी, ग्रांट थॉर्नटनचा अहवालातील दावा काय?

Grant Thornton Report : भारतात ग्राहक आणि किरकोळ क्षेत्राने मोठी भरारी घेतली आहे. ग्रांथ थॉर्नटन इंडियाच्या अहवालानुसार, 2025 मध्ये खासगी इक्विटी, विलय आणि अधिग्रहण व्यवहारांत (M&A) मोठी वाढ नोंदवली गेली. गेल्या तीन वर्षांतील हा सर्वाधिक व्यवहारांचा कालावधी ठरला आहे.

किरकोळ व्यवहारांची मोठी भरारी; तीन वर्षात उच्चांकी कामगिरी, ग्रांट थॉर्नटनचा अहवालातील दावा काय?
ग्राहक, किरकोळ व्यवहारात वाढImage Credit source: गुगल
| Updated on: Apr 17, 2025 | 12:05 PM
Share

भारतात ग्राहक आणि किरकोळ क्षेत्राने मोठी भरारी घेतली आहे. ग्रांथ थॉर्नटन इंडियाच्या अहवालानुसार, 2025 मध्ये खासगी इक्विटी, विलय आणि अधिग्रहण व्यवहारांत (M&A) मोठी वाढ नोंदवली गेली. गेल्या तीन वर्षांतील हा सर्वाधिक व्यवहारांचा कालावधी ठरला आहे. ई-कॉमर्स, एफएमसीजी, वस्त्रनिर्मिती, परिधान, अ‍ॅक्सेसरीज आणि वैयक्तिक निगा या विभागांनी एकत्रितपणे डील व्हॉल्युमचा 63 टक्के हिस्सा असल्याचे समोर आले आहे.

या क्षेत्राने एकूण 3.8 अब्ज डॉलर्सचे 139 व्यवहार पूर्ण केले आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत व्यवहारांच्या संख्येत 65 टक्क्यांची आणि मूल्यांआधारीत 29 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे व्यवहारांच्या संख्ये आधारीत ग्राहक आणि किरकोळ क्षेत्र हे सर्वाधिक सक्रिय असल्याचे समोर आले आहे. कमी रक्कमेचे व्यवहारा आणि दोन अब्ज डॉलर्सच्या व्यवहारांमुळे हा बदल झाल्याचे कारण देण्यात येते.

या दोन व्यवहारांनी लावले चार चांद

दोन अब्ज डॉलरच्या व्यवहारात टेमासेकच्या हल्दीराम या कंपनीतील 10 टक्क्यांची भागीदारी 1 अब्ज डॉलर्सला विकत घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा पॅकेज्ड फूड व्यवहार ठरला आहे. तर सिंगापूर येथील विल्मर इंटरनॅशनलने अडानी विल्मर स्टेपल व्यवसाय 1.44 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी केला. या दोन व्यवहारांनी या क्षेत्राला चार चांद लावले. हा वाटा एकूण व्यवहारांच्या तीन चतुर्थांश इतका आहे.

या क्षेत्राचा चढता आलेख

ग्रांथ थॉर्नटन इंडियामध्ये ड्युए डिलिजन्स पार्टनर शांती विजेत्या म्हणाल्या की, खासगी इक्विटी गुंतवणूक विविध क्षेत्रांमध्ये विभागलेली होती. आता ग्राहक आणि किरकोळ क्षेत्राने व्यवहारांच्या 28 टक्के व्हॉल्यूमसाठी आणि 18 टक्के व्हॅल्यूसाठी पुढाकार घेतला. देशातील एकूण खासगी इक्विटी आणि व्हेंचर कॅपिटल डीलमेकिंगच्या स्तरावर ते 11 तिमाहीतील सर्वोच्च पातळीवर पोहचले आहेत. तर या क्षेत्रात 8.6 अब्ज डॉलरच्या 408 व्यवहार झाले आहेत. हे व्यवहार गेल्या तिमाहीच्या तुलनेत 66 टक्क्यांनी अधिक आहेत.

ई-कॉमर्स, एफएमसीजी, वस्त्रनिर्मिती, परिधान, अ‍ॅक्सेसरीज आणि वैयक्तिक निगा या विभागांनी एकत्रितपणे डील व्हॉल्युमचा 63 टक्के हिस्सा असल्याचे समोर आले आहे. तर या अहवालानुसार, गेल्या तिमाहीत व्यवहारांचा सरासरी आकार 34.8 दशलक्ष डॉलरवरून घसरून 27.2 दशलक्ष डॉलरवरपर्यंत आला आहे.

ग्रांथ थॉर्नटन इंडियाचे पार्टनर आणि प्रायव्हेट इक्विटी ग्रुपचे तसेच टॅक्स अ‍ॅडव्हायजरी लीडर विशाल अग्रवाल यांनी मतं मांडले. त्यानुसार, एकूणच भारताताली भांडवली बाजारात नरमाई आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची रुची पु्न्हा निर्माण व्हावी यासाठी मूल्यांकन अधिक वास्तववादी करणे आवश्यक आहे. पण सध्या अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे जागतिक अनिश्चितता आहे. त्यामुळे गुंतवणूकदार वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. पुढे परिस्थिती जशी अनुकूल होईल, तसा बदल संभवतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.