AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rules Change : आजपासून हे सात नियम बदलले, तुमच्या खिशावर थेट काय आणि किती परिणाम होणार जाणून घ्या

Rules Change : जवळपास दर महिन्याच्या एक तारखेला तुमच्या खिशाशी संबंधित अनेक नियम बदलले जातात. त्याचा थेट परिणाम तुमची कमाई आणि सेविंग्सवर होतो. यावेळी सुद्धा 1 नोव्हेंबर म्हणजे आजपासून बँकिंग, पेंशन आणि आधारशी संबंधित नियम बदलले आहेत.

Rules Change : आजपासून हे सात नियम बदलले, तुमच्या खिशावर थेट काय आणि किती परिणाम होणार जाणून घ्या
New Rules
| Updated on: Nov 01, 2025 | 8:39 AM
Share

आज 1 नोव्हेंबर 2025 पासून अनेक नवीन नियम लागू झाले आहेत. ज्याचा तुमच्या रोजच्या पैशांवर परिणाम होऊ शकतो. आधार अपडेट फी आणि बँक नामांकनात बदलापासून जीएसटी स्लॅब आणि कार्ड फी पर्यंत आम्ही तुम्हाला 7 बदलांबद्दल सांगणार आहोत. ज्याचा थेट तुमच्या खिशावर परिणाम होईल.

आधार अपडेट फीस बदलली – भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) मुलांच्या आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक अपडेटसाठी लागणारी 125 रुपये फी माफ केली आहे. पुढचं एक वर्ष ही फी आकारली जाणार नाही. मोठ्यांसाठी नाव, जन्मतारीख, पत्ता किंवा मोबाइल नंबर सारखे डिटेल अपडेट करण्याची किंमत 75 रुपये आहे. फिंगरप्रिंट किंवा आयरिस स्कॅन सारख्या बायोमेट्रिक अपडेटची किंमत 125 रुपये असेल.

नवीन बँक नामांकन नियम – 1 नोव्हेंबरपासून बँक यूजर्सना एक अकाउंट, लॉकर किंवा सेफ डिपॉजिटसाठी जास्तीत जास्त चार लोकांना नामांकीत करण्याची परवानगी असेल. इमर्जन्सीमध्ये कुटुंबाला लवकरात लवकर पैसे मिळावेत आणि मालकी हक्कावरुन होणारे वाद टाळणं हा या नव्या नियमामागे उद्देश आहे. नव्या नामांकीत व्यक्तीचा समावेश करणं किंवा बदलणं ही प्रक्रिया यूजर्ससाठी अजून सोपी करण्यात आली आहे.

नवीन जीएसटी स्लॅब लागू – 1 नोव्हेंबरपासून सरकार काही सामानांसाठी स्पेशल रेटसह नवीन दोन-स्लॅब जीएसटी सिस्टिम लागू करेल. आधीच्या चार स्लॅब सिस्टिम 5%, 12%, 18% और 28%, रिप्लेस म्हणजे बदलली जाईल. 12% आणि 28% स्लॅब हटवला जाईल. लग्जरी आणि हानिकारक सामानावर 40% टक्के रेट लागू होईल. या स्टेपचा उद्देश भारताच्या इनडायरेक्ट टॅक्स स्ट्रक्चर सोप बनवणं आहे.

एनपीएस ते यूपीएस टाइम लिमिट वाढवलं – राष्ट्रीय पेंशन सिस्टिम (एनपीएस) मधून यूनिफाइड पेंशन स्कीम (यूपीएस) मध्ये शिफ्ट होण्यासाठी इच्छुक असलेल्या सेंट्रल गवर्नमेंट एम्प्लॉयीजकडे ही प्रोसेस पूर्ण करण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंतचा वेळ आहे.

पेंशन घेणाऱ्यांना लाइफ सर्टिफिकेट द्यावं लागेल – सर्व रिटायर्ड सेंट्रल आणि स्टेट गवर्नमेंट एम्प्लॉयीज़ला नोव्हेंबरच्या शेवटापर्यंत आपलं वार्षिक लाइफ सर्टिफिकेट जमा करावं लागेल. हे त्यांच्या बँक ब्रांच किंवा जीवन प्रमाण पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन केलं जाऊ शकतं. डेडलाइन मिस केल्यास पेंशन पेमेंटमध्ये विलंब किंवा अडथळा येऊ शकतो.

पीएनबी लॉकर फीसमध्ये बदल – पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) लवकरच संपूर्ण भारतात आपल्या लॉकर रेंट फी मध्ये बदल करणार आहे. नवीन रेट्स लॉकरची साइज आणि कॅटेगरीवर डिपेंड असेल. रिपोर्ट्सनुसार, अपडेटेड फीसची अनाउंसमेंट नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. नोटिफिकेशनच्या 30 दिवसानंतर फी प्रभावी होईल.

एसबीआय कार्ड यूजर्ससाठी नवीन फी – 1 नोव्हेंबरपासून एसबीआय कार्ड यूजर्सना मोबिक्विक आणि क्रेड सारख्या थर्ड-पार्टी Apps च्या माध्यमातून केलेल्या एजुकेशनशी संबंधित पेमेंटवर 1% फी द्यावी लागेल. त्याशिवाय एसबीआय कार्डद्वारे डिजिटल वॉलेटमध्ये 1,000 रुपयापेक्षा जास्त अमाऊंट टाकल्यास 1 टक्के फी लागेल.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.