Russia Ukraine Crisis : युद्धाचा सर्वाधिक फटका अशिया खंडात भारताला बसणार, S&P ग्लोबल रेटिंग्सचा अंदाज

| Updated on: Mar 17, 2022 | 6:50 AM

रशिया आणि युक्रेन युद्धाचा (Russia Ukraine Crisis) सर्वाधिक परिणाम हा तेल आयातदार देशांवर होणार आहे. आशिया खंडात रशिया आणि युक्रेन युद्धाचा सर्वाधिक फटका हा भारत आणि थायलंडला बसण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Russia Ukraine Crisis : युद्धाचा सर्वाधिक फटका अशिया खंडात भारताला बसणार, S&P ग्लोबल रेटिंग्सचा अंदाज
Follow us on

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन युद्धाचा (Russia Ukraine Crisis) सर्वाधिक परिणाम हा तेल आयातदार देशांवर होणार आहे. आशिया खंडात रशिया आणि युक्रेन युद्धाचा सर्वाधिक फटका हा भारत आणि थायलंडला बसण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. एस अँड पी (S&P) ग्लोबल रेटिंग्सकडून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संस्थेने आपल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, भारत आणि थायलंड हे जगातील कच्च्या तेलाचे मोठे आयातदार देश आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह युरोपीयन राष्ट्रांनी रशियावर कडक निर्बंध लादले आहेत. रशिया हा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर रशियातून कच्च्या तेलाचा पुरवठा बंद झाल्यास, कच्च्या तेलाचे भाव आणखी वाढतील. ज्याचा सर्वाधिक फटका हा कच्च्या तेलाचा (Crude oil) सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या भारतासारख्या देशांना बसेल.

बाजारपेठेत अस्थिरता

या अहवालामध्ये पुढे म्हटले आहे की, रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून जागतिक बाजारपेठेत अस्थिरता दिसून येत आहे. कच्च्या तेलापासून ते खाद्यतेलापर्यंत सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत. अनेक देश कोरोना काळात अर्थव्यवस्थेला बसलेल्या फटक्यातून आता कुठेतरी सावरत होते. तोच आता रशिया आणि युक्रेन युद्धाच्या रुपाने नवे संकट उभे राहिले आहे. जे देश कच्च्या तेलाच्या बाबतीत पूर्णपणे दुसऱ्या देशांवर अवलंबून आहेत, त्यांना या काळात मोठा फटका बसण्याचा अंदाज S&P ग्लोबल रेटिंग्सकडून वर्तवण्यात आला आहे.

पुढील वर्षी आर्थिक ग्रोथ 7.8 टक्के राहण्याचा अंदाज

दरम्यान S&P ग्लोबल रेटिंग्सने भारताच्या आर्थिक ग्रोथबाबत देखील अंदाज वर्तवला आहे. पुढील वर्षी भारताची आर्थिक ग्रोथ 7.8 टक्के राहण्याचा अंदाज असल्याचे संस्थेने म्हटले आहे. या शिवाय 2023-24 आणि 2024-25 मध्ये अनुक्रमे देशाची ग्रोथ 6 आणि 6.5 टक्के राहू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात महागाई दर 5.4 टक्के राहण्याचा अंदाज आहे. मात्र महागाईदर 5.4 टक्क्यांच्या वर गेल्यास अर्थव्यवस्थेला त्याचा मोठा फटका बसू शकतो.

संबंधित बातम्या

‘Net Neutrality’ चा मुद्दा पुन्हा चर्चेत; जाणून घ्या नेट न्यूट्रेलिटी म्हणजे नेमकं काय?

Home loan : घराचा हप्ता थकल्यास काय करावे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

सेन्केक्स 1000 पेक्षा अधिक अंकांनी वधारला; निफ्टी 17 हजारांच्या पातळीवर बंद