कच्च्या तेलाचे दर 40 डॉलरनी घसरले; भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना मोठा दिलासा

रशिया आणि युक्रेन युद्ध (Russia-Ukraine war) सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या (Crude Oil) दरात अचानक वाढ झाली होती. सलग दोन आठवडे कच्च्या तेलाचे दर हे 100 डॉलर प्रति बॅरलपेक्षा अधिक होते. मात्र चालू आठवड्यात कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत.

कच्च्या तेलाचे दर 40 डॉलरनी घसरले; भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना मोठा दिलासा
कच्च्या तेलाची आयात वाढली
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 7:02 AM

रशिया आणि युक्रेन युद्ध (Russia-Ukraine war) सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या (Crude Oil) दरात अचानक वाढ झाली होती. सलग दोन आठवडे कच्च्या तेलाचे दर हे 100 डॉलर प्रति बॅरलपेक्षा अधिक होते. मात्र चालू आठवड्यात कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत. कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर प्रति बॅरलपेक्षाही कमी झाले आहेत. दरम्यान कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याने भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कच्च्या तेलाच्या दरात वाढ झालेली असताना देखील भारतात पेट्रोल (Petrol),डिझेलचे दर वाढवण्यात आले नव्हेत. त्यामुळे या कंपन्याना मोठा फटका बसला. मात्र आता कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याने या कंपन्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 28 फेब्रुवारी रोजी कच्च्या तेलाच्या दराने 100 डॉलरचा टप्पा ओलांडला होता. सात मार्चला तर कच्च्या तेलाचे भाव गेल्या 14 वर्षातील रेकॉर्ड तोडत 139 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले होते. मात्र आता पुन्हा एकदा दर कमी होताना दिसत आहेत. चालू आठवड्यात कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर प्रति बॅरलच्याही खाली आले आहेत.

एका आठवड्यात 40 डॉलरनी कमी झाले भाव

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने कमी होताना दिसत आहेत. गेल्या आठ दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या भावात प्रति बॅरल मागे 40 डॉलरची घट झाली आहे. सात मार्चला क्रूड ऑईलचे दर 139 डॉलर प्रति बॅरल होते. तर चालू आठवड्यात ते 99 डॉलर प्रति बॅरलच्याही खाली आले आहेत. याचाच अर्थ कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सरासरी चाळीस डॉलरची घट झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घट होने ही भारतासाठी दिलासादायक गोष्ट आहे. कारण भारत हा कच्च्या तेलाचा जगातील एक मोठा आयातदार देश आहे.

पेट्रोलियन कंपन्यांना दिलासा

गेल्या 15 दिवसांमध्ये सातत्याने कच्च्या तेलाचे दर वाढत होते. कच्च्या तेलाचे वाढते दर पहाता दहा मार्चला पाच राज्यातील निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर देशात पेट्रोल, डिझेलचे दर वाढवले जातील असा अंदाज होता. मात्र निवडणूक निकालानंतर देखील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले. इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आल्याने पेट्रोलियम कंपन्यावरील दबाव वाढला होता. मात्र आता कच्च्या तेलाचे दर काहीप्रमाणात कमी झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारतात गेल्या चार नोव्हेंबरपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेले नाही.

संबंधित बातम्या

मिरची आता खिशालाही झोंबणार! हिरव्या मिरचीचा भाव तिप्पट वाढला, किरकोळ बाजारात किती दर?

Vehicle Scrappage Policy: वेहिकल स्क्रपिंग प्रोसेस पूर्णतः होईल डिजिटल, सरकार ने जाहीर केली नवीन नियमावली

ग्राहकाभिमुख सेवांनी ग्राहकांचे ‘उज्जीवन’ , उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा नवउपक्रम

'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.