मिरची आता खिशालाही झोंबणार! हिरव्या मिरचीचा भाव तिप्पट वाढला, किरकोळ बाजारात किती दर?

मिरची आता खिशालाही झोंबणार! हिरव्या मिरचीचा भाव तिप्पट वाढला, किरकोळ बाजारात किती दर?
मिरची आणखी तिखट झाली...
Image Credit source: TV9 Marathi

Vegetables Rates : भाज्यांचे दर : सध्या बाजारात हिरव्या मिरच्यांचे दर हे कमालीचे वाढले आहेत. मिरची महाग झाल्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलंय. हिरव्या मिरच्यांचे दर हे तब्बल 150 रुपये किलोमपर्यंत पोहोचले आहेत.

गणेश थोरात

| Edited By: सिद्धेश सावंत

Mar 15, 2022 | 8:22 PM

ठाणे : सोमवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार किरकोळ बाजारातील महागाईचा (Retail inflation) दर हा सलग दुसऱ्या महिन्या 6 टक्क्यांच्या पुढे आहे. याची झळ आता सर्वसामान्यांच्या (Common man) खिशावर थेट पोहोचू लागली आहे. सध्या बाजारात हिरव्या मिरच्यांचे (Rates of Green Chilly) दर हे कमालीचे वाढले आहेत. मिरची महाग झाल्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलंय. हिरव्या मिरच्यांचे दर हे तब्बल 150 रुपये किलोमपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे नेहमीच्या जेवणात फोडणीसाठी आणि चवीला तिखटपणा आणण्यासाठी हमखास वापरली जाणारी मिर्ची आता लोकांच्या खिशाला झोंबू लागली आहे. किरकोळ बाजारात मूठभर मिरचीसाठी वीस ते तीस रुपयांपर्यंत रक्कम मोजावी लागतेय. 40 ते 50 रुपये इतका दर किरकोळ बाजारात हिरव्या मिरचीचा होता. मात्र आता हाच दर तब्बल 120 रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंत पोहोचला आहे. वातावरणातील बदल, जागतिक घडामोडी या सगळ्यामुळे मिरची महाग झाली असल्याचं सांगितलं जातंय.

कशामुळे दर वाढले?

अवकाळी पाऊस, दिवसेंदिवत वाढत असणारे पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे दर याचा थेट परिणाम आता भाज्यांच्या दरांवर होऊ लागलाय. इंधनाचे दर भडकल्यामुळे दळणवळण महागलंय. त्यामुळे याचा थेट फटका भाज्यांच्या दरांवर होताना पाहायला मिळतोय. कधी गारा, कधी अवकाळी पाऊस याचाही परिणाम भाज्यांच्या दरांवर होत असल्याचं दिसून आलंय.

जागतिक घडामोडींचे परिणामही बाजारावर दिसून येत आहेत. युक्रेन रशिया युद्धाचा परिणाम इंधनाच्या दरवाढी होतोय. त्यामुळे इंधनासोबत तेलाचे दरही कमालीचे वाढले आहेत. वाढत्या महागाईनं सर्वसामान्य बेजार झालेत. गृहिणींचं बजेट वाढत्या महागाईनं पुरतं कोलमडलंय. याबाबतच आता सर्वसामान्यांकडून सरकार लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by tv9 marathi (@tv9marathilive)

आणखी महागणार?

दरम्यान, येत्या काळात फक्त मिरचीच नाही, तर इतरही हिरव्या भाज्या, पालेभाज्या यांचे दर अधिक वाढतली, असाही अंदाज वर्तवला जातो आहे. किरकोळ महागाईनं गेल्या 8 महिन्यांच्या रेकॉर्ड तोडलाय. वाढत्या किंमतींनी सर्वसामान्यांचा खिसा फाडला असून समाजातील सर्वच स्तरांना महागाईची झळ बसू लागली आहे.

इतकी भाववाढ झाली..

  1. धान्य – 3.95 %
  2. मांसमच्छी – 7.54%
  3. भाज्या – 6.13%
  4. मसाले – 6.01%
  5. फळं – 2.26%

संबंधित बातम्या :

किरकोळ महागाईनं गेल्या 8 महिन्यांच्या रेकॉर्ड तोडला! वाढत्या किंमतींनी सर्वसामान्यांचा खिसा फाडला

पैसे गुंतवणुकीचा सोपा मार्ग ! अधिक परताव्यासह सुरक्षेची हमी; पोस्टाच्या ‘या’ योजनेबद्दल तुम्हाला माहितीये का?

कच्च्या तेलाच्या वाढत्या भावाचा प्रवाशांना फटका; विमान प्रवास महागला, तिकिटांच्या दरामध्ये 15 ते 30 टक्क्यांची वाढ

पाहा व्हिडीओ – सुप्रिया सुळे यांचं लोकसभेतील भाषण


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें