पैसे गुंतवणुकीचा सोपा मार्ग ! अधिक परताव्यासह सुरक्षेची हमी; पोस्टाच्या ‘या’ योजनेबद्दल तुम्हाला माहितीये का?

भविष्यात कोणता प्रसंग कसा येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे पैसे बचतीचा सल्ला दिला जातो. पैसा केवळ बचत करूनच चालणार नाही तर तो योग्य ठिकाणी गुंतवता देखील आला पाहिजे.

पैसे गुंतवणुकीचा सोपा मार्ग ! अधिक परताव्यासह सुरक्षेची हमी; पोस्टाच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहितीये का?
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Mar 14, 2022 | 8:25 AM

Post Office Saving Scheme : भविष्यात कोणता प्रसंग कसा येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे पैसे बचतीचा सल्ला दिला जातो. पैसा केवळ बचत करूनच चालणार नाही तर तो योग्य ठिकाणी गुंतवता देखील आला पाहिजे. जवळ असलेला पैसा कशात गुंतवावा? असा प्रश्न अनेकांना पडतो. सामान्यपणे लोक अधिक चांगला परतावा आणि कमी जोखमी असलेल्या ठिकाणी पैसे गुंतवतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेची (Saving Scheme) माहिती सांगणार आहोत, ज्या योजनेमध्ये पैसा गुंतवल्यास तुमचा पैसा सुरक्षीत तर राहातो सोबतच तुम्हाला चांगला परतावा देखील मिळतो. जर तुम्ही गुंतवणुकीवर जोखीम न घेता चांगला परतावा मिळू इच्छिता तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफीसची (Post Office) किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) ही योजनात सर्वोत्तम पर्याय आहे. विशेष: जे छोटे गुंतवणूकदार आहेत, त्यांच्यासाठी ही योजना अधिक फायद्याची ठरते. चला तर जाणून घेऊयात किसान विकास योजनेबाबत

124 महिन्यांमध्ये पैसे दुप्पट

पोस्टाच्या किसान पत्र बचत योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या योजनेवर चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळते. या योजनेत 124 महिन्यांमध्ये तुमचे पैसे दुप्पट होतात. जर तुम्ही बँकेच्या एखाद्या बचत योजनेत किंवा एफडीमध्ये पैसे गुंतवले आणि समजा बँकेचे दिवाळे निघाले तर सरकारी नियमानुसार तुम्हाला केवळ पाच लाखांपर्यंतच रक्कम परत भेटते. मात्र पोस्टाच्या योजनेमध्ये असं होत नाही. तुम्हाला तुमचा पूर्ण पैसा मिळतो आणि तो देखील व्याजासह त्यामुळेच पोस्टाच्या योजना गुंतवणुकीसाठी सुरक्षीत मानल्या जातात. सध्या किसान पत्र योजनेत वार्षिक आधारावर 6.9 टक्के व्याज देण्यात येत आहे.

अडीच वर्षांनंतर देखील काढू शकता रक्कम

किसान पत्र योजनेचा कालावधी हा सामान्यपणे 124 महिन्यांचा आहे, मात्र तुम्ही मुदतपूर्व देखील पैसे काढू शकता. मात्र त्यासाठी महत्त्वाची अट म्हणजे पैसे गुंतवल्यानंतर अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला पाहिजे. अडीच वर्षानंतर तुम्हाला तुमच्या खात्यातून कधीही पैसे काढता येतात. एवढेच नाही तर तुम्ही पोस्टाच्या या योजनेत पैसे गुंतवल्यास आयकर विभागाच्या नियमानुसार मिळणाऱ्या परताव्यावर सूट देखील मिळते, म्हणजेच या योजनेत पैसे गुंतवल्यास तुमचा डबल फायदा होतो. तुमचे वय जर अठरा वर्षांपेक्षा अधिक असेल तर तुम्ही या योजनेंतर्गत खाते ओपन करू शकता.

संबंधित बातम्या

टेलिकॉम क्षेत्राचे रुपडे पलटणार; ‘5G’बाबत माहिती व तंत्रज्ञान मंत्र्यांचं मोठं वक्तव्य, काय म्हणाले वैष्णव?

Russia-Ukraine war : भारतीय स्टील उद्योगाची चांदी; निर्यात 76 टक्क्यांनी वाढली

वाढत्या ग्रामीण बेरोजगारीचा थेट वाहन उद्योगाला फटका; कंपन्यांचे शेअर्सही कोसळले

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें