AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाढत्या ग्रामीण बेरोजगारीचा थेट वाहन उद्योगाला फटका; कंपन्यांचे शेअर्सही कोसळले

टू व्हीलरच्या (Two Wheeler) साईड ग्लासमधून निराश आणि हताश गावं दिसत आहेत. ही निराशा ऑटो उद्योगासाठी (auto industry) चिंताजनक ठरलीये. ऑटो उद्योगाची चिंता योग्यही आहे. कारण या गावांच्या जिवावरच टू व्हीलर उद्योगाच्या चाकांना गती मिळत असते.

वाढत्या ग्रामीण बेरोजगारीचा थेट वाहन उद्योगाला फटका; कंपन्यांचे शेअर्सही कोसळले
| Updated on: Mar 14, 2022 | 5:30 AM
Share

टू व्हीलरच्या (Two Wheeler) साईड ग्लासमधून निराश आणि हताश गावं दिसत आहेत. ही निराशा ऑटो उद्योगासाठी (auto industry) चिंताजनक ठरलीये. ऑटो उद्योगाची चिंता योग्यही आहे. कारण या गावांच्या जिवावरच टू व्हीलर उद्योगाच्या चाकांना गती मिळत असते. परिस्थिती कशी आहे हे आकडेवारीतून समजून घेऊयात. देशात सुमारे 75 टक्के एंट्री लेव्हलच्या बाईक आणि स्कूटरची विक्री होते, एंट्री लेव्हल म्हणजे बाजारातील सर्वात स्वस्त टू व्हीलर, या 75 टक्के विक्री पैकी 60 टक्के विक्री गावांमध्ये होते. म्हणजेच ग्रामीण भागातील (Rural areas) मागणी घटल्यास परिणाम मोठा होतो. सध्या ग्रामीण भागात टू व्हीलरला मागणीच नाही. देशभरात फेब्रुवारी महिन्यात 5 टॉप टू व्हीलर कंपन्यांनी 10 लाख 74 हजार 303 वाहनांची विक्री केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत 25 टक्क्यानं विक्रीत घट झालीये. गेल्या सहा महिन्यात देशभरात टू व्हीलर्सच्या विकीत सुमारे 7 लाखांनी घट झालीये. मोपेडला सुद्धा मागणी नाही. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात एकूण 59,007 मोपेडची विक्री झालीये. यंदा मात्र, जानेवारी महिन्यात फक्त 35,785 मोपेडची विक्री झालीये. म्हणजेच त्यामध्ये 23,222 वाहनांची घट झाली आहे.

मुबलक प्रमाणात टू व्हीलर्सचा साठा

दुसरीकडे मोपेड आणि स्वस्त टू व्हीलर्सच्या साठाही भरपूर आहे. डीलर्सकडे 25 ते 27 दिवस पुरेल एवढा साठा आहे, पण ग्राहकच नाहीत. सेमीकंडक्टर्सचा पुरवठा खंडित झाल्यानं प्रीमियम बाईक्सच्या उत्पादनात खंड पडला असताना स्वस्त बाईक्स उत्पादन व्यवस्थित सुरू आहे, असं टीव्हीएस मोटर्सने प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. म्हणजेच स्वस्त बाईकच्या उत्पादनात अडथळा नाही, मात्र विक्री होत नाही.

ग्रामीण भागात बेरोजगारी वाढली

CMIE ने जारी केलेल्या बेरोजगारीच्या आकड्यात गावात बेरोजागारी वाढल्याचं दिसून येतंय. गेल्या 8 महिन्यांत गावातील बेरोजगारी 8.35 टक्क्यांवर पोहोचलीये. अवकाळी पावसानं पिकांच नुकसान झालंय, सोयाबीन, कापसाच्या उत्पादनात घट झालीये. मनरेगाचं बजेट कमी झाल्यानं शेती व्यतिरिक्त इतर उत्पन्नात घट झालीये. म्हणजेच ग्रामीण भागातील उत्पन्नाचे दोन मुख्य स्रोत आटलेत. वाढत्या महागाईनं परिस्थिती आणखीनचं भयावह झालीये. टू व्हीलरचा एंट्री लेवलचा बाजार प्राईस सेंसेटिव्ह आहे. म्हणजेच भावात थोडीशीही वाढ झाल्यास विक्री कमी होते, असं ऑटो विशेष तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कच्चा माल महाग झाल्यानं टू व्हीलर कंपन्यांनी तीन वेळेस किमतीमध्ये वाढ केलीये, अशी माहिती क्रिसिलच्या अहवालातून समोर आली आहे. गेल्या वर्षी बीएस 6 मुळे किमतीमध्ये 10 ते15 टक्क्यानं वाढ झाली होती. म्हणजेच गेल्या दोन वर्षात दुचाकीच्या किंमती 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत. 64 हजार रुपयाला मिळणाऱ्या अ‍ॅक्टिव्हाची किंमत 71 हजार झालीये. शेअर बाजारातील गुंतवणूक करणारे मोठे गुंतवणूकदार या आकडेवारीकडे लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळे तर गेल्या एक महिन्यात टू व्हीलर कंपन्यांच्या शेअरच्या किमती 15 टक्क्यांनी कमी झाल्यात. याचाच अर्थ जोपर्यंत गावातील अर्थचक्र गतिमान होणार नाहीत, तोपर्यंत टू व्हीलर उद्योगाच्या चाकाला वेग येणार नाही.

संबंधित बातम्या

16 मार्चला फेडरल रिझर्व्हचा महत्त्वाचा निर्णय, बाजारावर दिसणार मोठा परिणाम

निवृत्ती योजनेत गुंतवणुकीला प्राधान्य, एनपीएस आणि अटल पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत 23 टक्क्यांची वाढ

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.