AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vehicle Scrappage Policy: वेहिकल स्क्रपिंग प्रोसेस पूर्णतः होईल डिजिटल, सरकार ने जाहीर केली नवीन नियमावली

रस्ते परिवहन मंत्रालय (MoRTH) ने स्क्रेपेज पॉलिसी (Vehicle scrappage policy) संबधित एक ड्राफ्ट जाहीर केला आहे. वाहन मालकाला गाडीचे सर्व अत्यावश्यक कागदपत्र "वाहन" पोर्टल च्या डाटाबेस मध्ये जमा करावे लागतील.

Vehicle Scrappage Policy: वेहिकल स्क्रपिंग प्रोसेस पूर्णतः होईल डिजिटल, सरकार ने जाहीर केली नवीन नियमावली
Vehicle Scrappage PolicyImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 15, 2022 | 12:14 PM
Share

रस्ते परिवहन मंत्रालय (MoRTH) ने स्क्रेपेज पॉलिसी (Vehicle scrappage policy) संबधित एक ड्राफ्ट जाहीर केला आहे. या ड्राफ्टच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे की, जेव्हा जुन्या गाड्यांना स्क्रॅप म्हणजे भंगार म्हणून जमा करतेवेळी वाहन मालकांना आता एक डिजिटल प्रक्रिया पार पाडावी लागेल. मंत्रालयाने सांगितले आहे की, जी गाडी स्क्रॅप साठी जाणार आहे त्या गाडीसाठी रजिस्टर वेहिकल स्क्रापिंग फॅसिलिटीज म्हणजेच RVSF ची आवश्यकता लागेल. स्क्रापिंग आधी आरवीएस एफ डिजिटल माध्यमाद्वारे व्हेरिफाय केले जाईल त्यानंतर गाडी भंगारामध्ये पाठवली जाईल. या ऑनलाइन पद्धतीमुळे आपल्याला कळून जाईल की, गाडी जमा करण्यापूर्वी या गाडीचे कोणतेच ड्युज बाकी नाही. याबद्दलची सविस्तर माहिती या प्रक्रियेमुळे आपल्या सर्वांना कळून जाईल. त्याचबरोबर प्रादेशिक ट्रांसपोर्ट विभागाने (transport department) त्या गाडीला ब्लॅक लिस्ट केले आहे की नाही याबद्दलची माहिती देखील मिळेल.

रस्ते परिवहन मंत्रालयाने जी नवीन नियमावली तयार केलेली आहे, त्या नियमावली मध्ये म्हटले आहे की, गाडी जमा करण्याची पूर्वी किंवा गाडी भंगारमध्ये देण्यापूर्वी वाहन मालकाला मंत्रालयाच्या पोर्टल “वाहन” येथील डेटाबेसमध्ये आवश्यक असलेली माहिती जमा करावी लागेल. गाडी जमा करण्यापूर्वी वाहन मालकांना सर्व गोष्टींची तपासणी करावी लागेल, यामध्ये हायर संबंधित असलेले कागदपत्र, सरेंडर गाडीचे लीज पेपर ,नेशनल क्राइम रिकॉर्ड्स ब्यूरो मध्ये गाडी विरोधात काही केस नसल्याचा पुरावा,गाडीची कोणतीच ड्यूज पेंडीग नसल्याचा पुरावा म्हणजेच एनओसी आणि प्रादेशिक परिवहन विभाग द्वारे ही गाडी ब्लॅक लिस्टेड नसल्याचा पुरावा असलेले कागदपत्र जमा करावे लागणार आहेत.

गाडी मालकाला कराव्या लागतील या काही गोष्टी

ड्राफ्ट नुसार अत्यावश्यक असलेल्या कागदपत्रांत पैकी एखादे कागद पत्र जरी गाडी मालकाकडे नसेल तर ती गाडी स्क्रापिंग प्रक्रियेसाठी व्हॅलिड ठरणार नाही. प्रस्तावित नियमानुसार वेहिकल स्क्रपिंग साठी अर्जदाराला डिजिटल प्रक्रिया करावी लागेल आणि यासाठी आर वी एसएफ ची मदत घ्यावी लागेल. स्क्रापिंग करतेवेळी गाडी मालकाला अंडरटेकिंग फॉर्म भरावा लागेल. या प्रकारचा दस्तऐवज आर वी एस एफ ऑपरेटरला देखील द्यावे लागेल. भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये या अनुषंगाने या कागदपत्रांची मागणी वाहन मालकांकडून केली जाईल.

स्क्रेपिंगचा फायदा

असे म्हटले जात आहे की, मार्च किंवा एप्रिल पासूनच गाडीच्या स्क्रपिंग पद्धतीला सुरुवात केली जाईल. संपूर्ण देशामध्ये स्क्रपिंग सेंटर बनवण्याचे काम वेगाने पार पाडले जात आहे. या प्रक्रियेचा फायद्याबद्दल बोलायचे झाल्यास रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी लोकसभा मध्ये स्क्रॅपेज पॉलिसी लॉन्च करतेवेळी म्हटले की, या पॉलिसी दरम्यान एका नियमावलीची यादी तयार करण्यात आलेली आहे आणि ही यादी सर्व ऑटो मेकर्सला स्क्रेपिंग सर्टिफिकेट दाखवल्यानंतर नवीन वाहन खरेदी करतेवेळी 5 टक्के डिस्‍काउंट देण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे. ही एक वाहन स्क्रेपिंग पॉलिसी आहे.या पॉलिसी अंतर्गत वीन टू विन पॉलिसी आहे यामुळे प्रदूषण कमी होणार आहे आणि त्याचबरोबर ऑटो सेक्टर ला देखील भविष्यात फायदा होणार आहे.

मालकांना नेमका काय फायदा होईल

तज्ञ मंडळींच्या मते जुनी गाडी स्क्रॅप केल्यानंतर वाहन मालकांना एक सर्टिफिकेट दिले जाईल. हे सर्टिफिकेट दाखवून नवीन गाडी खरेदी करतेवेळी 5 टक्के सूट मिळेल. ही सवलत ऑटो कंपनी देईल.जेव्हा आपण नवीन गाडी खरेदी करणार असू तेव्हा रजिस्ट्रेशन फी द्यावी लागणार नाही त्याचबरोबर नवीन गाडी खरेदी करतेवेळी रोड टॅक्स मधील 25 टक्के सवलत देखील मिळेल. कमर्शियल वेहिकल खरेदी करणाऱ्यांना रोड टॅक्स मध्ये 15 टक्के सवलत मिळेल.

संबंधित बातम्या

ग्राहकाभिमुख सेवांनी ग्राहकांचे ‘उज्जीवन’ , उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा नवउपक्रम

हायटेक बँकिंगचे दावेदारच सायबर भामट्यांचे ‘शिकार’! कोटक महिंद्राच्या ग्राहकांची सर्वाधिक लूट, ICICI बँक फसवणुकीच्या जाळ्यात

सरकारची ‘ही’ योजना ठरत आहे मुलींच्या भविष्यासाठी वरदान; आजच ओपन करा आपल्या पाल्याचे खाते

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.