AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारची ‘ही’ योजना ठरत आहे मुलींच्या भविष्यासाठी वरदान; आजच ओपन करा आपल्या पाल्याचे खाते

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) ही मुलींच्या भविष्यासाठी एक चांगला पर्याय ठरत आहे. मुलींचे भविष्य (future) लक्षात घेऊन मोदी सरकारने ही योजना सुरू केली. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचे खाते तिचे पालक (parents) ओपन करू शकतात.

सरकारची 'ही' योजना ठरत आहे मुलींच्या भविष्यासाठी वरदान; आजच ओपन करा आपल्या पाल्याचे खाते
| Edited By: | Updated on: Mar 15, 2022 | 5:30 AM
Share

नवी दिल्ली : सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) ही मुलींच्या भविष्यासाठी एक चांगला पर्याय ठरत आहे. मुलींचे भविष्य (future) लक्षात घेऊन मोदी सरकारने ही योजना सुरू केली. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गंत दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचे खाते तिचे पालक (parents) ओपन करू शकतात. भारतात कोणत्याही पोस्ट ऑफीसमध्ये किंवा बँकेत तुम्ही सुकन्या समृद्धीचे खाते काढू शकता. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाची अट म्हणजे, एका कुटुंबात केवळ दोन मुलीच्या नावानेच तुम्हाला सुकन्या समृद्धीचे खाते सुरू करता येते. जर एखाद्या व्यक्तीला जुळ्या मुली झाल्या तर मात्र दोन पेक्षा अधिक मुलींना सुकन्या योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेचे वैशिष्ट म्हणजे या योजनेंतर्गत करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर चांगला व्याजदर मिळतो. कालावधी पूर्ण झाल्यानंतर मिळणारा परतावा देखील अधिक असतो. तुम्ही हा पैसा मुलीच्या लग्नासाठी किंवा तिच्या उच्च शिक्षणासाठी वापरू शकता..

7.6 टक्के व्याज दर

सध्या सुकन्या समृद्धि योजनेमध्ये गुंतवण्यात आलेले रकमेवर 7.6 टक्के दराने व्याज देण्यात येते. तुम्ही कमीत कमी 250 रुपयांची गुंतवणूक करून खाते सुरू करू शकता. कमीत कमी 250 रुपये व जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक तुम्ही या योजनेंतर्गंत करू शकता. तुम्ही पैसे दर महिन्याला जामा करू शकता किंवा एक रकमी देखील हफ्ता जमा करता येतो. सुकन्या समृद्धी योजनेतंर्गत करण्यात आलेल्या गुंतवणुकीला आयकरामधून सूट मिळते.

वयाची अट

सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित मुलीचे वय हे दहा वर्षांपेक्षा कमी असावे. जेव्हा मुलगी आपल्या वयाचे अठरा वर्ष किंवा 21 वर्ष पूर्ण करते तेव्हा या योजनेचा कालावधी पूर्ण होतो. या योजनेवर इतर कुठल्याही योजनेपेक्षा अधिक व्याज मिळत असल्याने पालकांना चांगला परतावा मिळतो. ही रक्कम मुलीच्या लग्नासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी वापली जाऊ शकते. अगदी कमीत कमी कागदपत्रांमध्ये तुम्ही आपल्या मुलीचे सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडू शकता. खाते उघडण्यासाठी फक्त संबंधित मुलीचा जन्म दाखला आणि आई वडिलांचा निवासाचा पत्ता व आधार कार्ड एवढ्याच गोष्टी आवश्यक असतात.

संबंधित बातम्या

महागाईचा भडका! हिंदुस्थान युनिलिव्हरचा ग्राहकांना धक्का; चहा, कॉफीच्या भावात 14 टक्क्यांची वाढ

कच्च्या तेलाच्या वाढत्या भावाचा प्रवाशांना फटका; विमान प्रवास महागला, तिकिटांच्या दरामध्ये 15 ते 30 टक्क्यांची वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीचा श्रीलंकेला फटका; इंधनाच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या भारतात काय स्थिती?

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.