दिवाळीत उद्योग रुळावर, मागील वर्षीपेक्षा यंदा टोयोटा किर्लोस्कर मोटार विक्री 12 टक्क्यांनी अधिक

दिवाळीने उद्योगांना नवी उर्जा मिळून ते रुळावर येत असल्याचं दिसत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धनत्रयोदशीला टोयोटा किर्लोस्कर मोटरगाडीची विक्री 12 टक्क्यांनी अधिक झाली.

दिवाळीत उद्योग रुळावर, मागील वर्षीपेक्षा यंदा टोयोटा किर्लोस्कर मोटार विक्री 12 टक्क्यांनी अधिक
Follow us
| Updated on: Nov 14, 2020 | 6:31 PM

मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक उद्योग डबघाईला आले, तर काही उद्योग बंदही झाले. यात अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या. मात्र, दिवाळीने उद्योगांना नवी उर्जा मिळून ते रुळावर येत असल्याचं दिसत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धनत्रयोदशीला टोयोटा किर्लोस्कर मोटरगाडीची विक्री 12 टक्क्यांनी अधिक झाली. त्यामुळे नोव्हेंबर 2020 मध्ये गाड्यांची विक्रीय मागील वर्षीपेक्षा अधिक असेल अशी आशा कंपनीला आहे (Sale of Toyota Kirliskar Motor increases in Diwali as compare to last year).

टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष (विक्री आणि सेवा) नवीन सोनी म्हणाले, “यावर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी गाड्यांच्या विक्रीत मागील वर्षीच्या तुलनेत 10 ते 13 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. यावर्षी धनत्रयोदशीचा उत्सव दोन दिवस साजरा करण्यात आला. या काळात टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीच्या वाहन विक्रीत वाढ झाली. ही वाढ मागील वर्षीच्या विक्रीच्या तुलनेत 12 टक्के अधिक आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातील गाड्यांच्या विक्रीचा वेग ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत जास्त होईल, अशी कंपनीला आशा आहे.”

मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात बाजारात चांगली सुधारणा दिसत आहे. बाजार पेठा सुरु झाल्याने गाडी विक्रीतील ही वाढ पाहायला मिळत असल्याचं बोललं जातंय. याशिवाय दिवाळीच्या मुहुर्तावर होणाऱ्या विक्रीचाही यात महत्त्वाचा वाट आहे.

फेस्टिव्ह सीजनमध्येही वाहन कंपन्यांना मोठा फटका, विक्रीत 24 टक्क्यांची घट

दरम्यान, कोरोना साथीरोग (Corona Pandemic) आणि लॉकडाऊनमुळे (lockdown) देशातील ऑटो इंडस्ट्रीला (Automotive industry) मोठा फटका बसला होता. अनलॉकची (Unlock) प्रक्रिया सुरु केल्यानंतर वाहनविक्री पुन्हा सुरु झाली. ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील अनेक कंपन्यांच्या विक्रीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये (Auto sales october) त्यामध्ये आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींसह वाहन कंपन्यांनी व्यक्त केली होती, परंतु तसे झाले नाही. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर (festive season) लोक दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी करतील, असा अंदाज होता. परंतु ऑक्टोबर महिन्यात वाहन विक्रीत घट झाली.

केवळ काही कंपन्यांच्या प्रवासी वाहनांच्या विक्रीत थोडीफार वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये प्रामुख्याने मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा मोटर्स आणि किया मोटर्स या कंपन्यांचा बाजारात बोलबाला पाहायला मिळाला. मात्र इतर कंपन्यांच्या विक्रीत घट झाली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशनने (फाडा) दिलेल्या माहितीनुसार प्रवासी वाहनांच्या विक्रीत देशभरात 8.8 टक्क्यांची घट झाली आहे.

संबंधित बातम्या :

रुपयाची घसरगुंडी, ऑटो इंडस्ट्रीत मंदी, अर्थव्यवस्था घसरण्याची कारणं

2018 मधील टॉप-10 कार, गुगलची यादी प्रसिद्ध

भारदस्त न्यू Ertiga मध्ये खास फीचर्स, इनोव्हा क्रिस्टाला टक्कर देणार?

Sale of Toyota Kirliskar Motor increases in Diwali as compare to last year

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.