पावसाळ्यात अंडरवेअरच्या खरेदीत धडाका, विक्री वाढली; कारण काय ?
पुरुष आता अधिक अंडरवेअर्स खरेदी करू लागले आहेत. त्यांच्या अंडरवेअरच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. जॉकीपासून रूपा पर्यंत सर्व इनरवेअर कंपन्या हेच सांगत आहेत. पण, पावसाळ्यात लोक अंडरवेअरची इतकी खरेदी का करतात?

पुरूषांच्या अंडरवेअरमध्ये विक्रीत मोठी वाढ झाली आहे. त्यांच्या अंडरवेअरच्या विक्रीत जबरदस्त वाढ झाल्याचे दिसत आहे. जॉकीपासून रूपा पर्यंत सर्व इनरवेअर कंपन्या हेच सांगत आहेत. वर्षभरापूर्वी याच कंपन्यांनी दावा केला होता की कोरोनाच्या काळात त्यांची (अंडरवेअरची) विक्री कमी होत आहे. पण आता पेज इंडस्ट्रीज, आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल, अरविंद फॅशन्स आणि रुपा अँड कंपनी या देशातील आघाडीच्या अंडरवेअर कंपन्यांनी त्यांच्या अहवालात नमूद केले आहे की, पुरुषांच्या अंडरवेअरची विक्री वाढत आहे.
जर ही विक्री वाढली असेल तर त्यात बातमी देण्यासारखं काय आहे? असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. खरंतर अंडरवेअरची वाढती विक्री ही एक चांगली बातमी आहे. जेव्हा लोकांकडे पुरेसा पैसा असतो किंवा अर्थव्यवस्था मजबूत असते तेव्हा लोक अशा गोष्टींवर पैसे खर्च करतात. कसे ते समजून घेऊया…
खुशखबर मिळताच लोक पैसे खर्च करतात
भारतीय अर्थव्यवस्था चांगली (चालली) आहे आणि पुढेही असेच चित्र दिसेलस असे संकेत सध्या सर्व बाजूंनी मिळत आहेत. महागाई दरातील घट आणि चांगला पाऊस यामुळे भारताच्या चांगल्या आर्थिक विकासाची पुष्टी झाली आहे. अंतर्वस्त्रांच्या विक्रीत झालेली वाढ हे चांगल्या अर्थव्यवस्थेचे लक्षण आहे. हे थोडे विचित्र वाटलं तरी तेच खरं आहे.
याला मेन्स अंडरवेअर इंडेक्स असे नाव देण्यात आले आहे. जेव्हा अर्थव्यवस्था मंदीत जाते, तेव्हा लोक त्यांच्या गरजा कमी करतात आणि प्रथम ही कपात अंडरवेअरसारख्या गोष्टींमध्ये होत असते. पण जेव्हा अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागते, तेव्हा लोक पुन्हा या वस्तू खरेदी करू लागतात.
रिपोर्टमध्ये काय खुलासा ?
एका रिपोर्टनसार, पेज इंडस्ट्रीज नुसार, ग्राहकांची संख्या वाढत चालली आहे आणि स्टॉकची व्यवस्था चांगली आहे, ज्यामुळे विक्रीत वाढ झाली आहे. कपडे आणि ॲक्सेसरीजवरील लोकांचा खर्च वाढत आहे. त्याशिवाय ई-कॉमर्स आणि डिजीटल प्लॅटफॉर्मची संख्या वाढल्यानेही अंडरेवअरची विक्री करणाऱ्या कंपन्यांना फायदा मिळत आहे.
गेल्या काही तिमाहींमध्ये कोविड महामारीमुळे कपड्यांच्या विक्रीत मंदी आली होती आणि तेव्हा कंपन्यांकडे जादा साठा होता. पण आता परिस्थिती बदलत आहे. मात्र, अजूनही परिस्थिती पूर्णपणे पूर्वीसारखी झालेली नाही. अरविंद फॅशन्स, रुपा अँड कंपनी आणि लक्स इंडस्ट्रीज सारख्या कंपन्यांनी त्यांच्या विक्रीत चांगली वाढ नोंदवली आहे.
कंपन्यांचा फायदा वाढला
अरविंद फॅशनच्या इनरवेअर श्रेणीतील एकूण विक्री डबल डिजीटमध्ये वाढली आहे. तर रुपा कंपनीच्या एप्रिल-जून कालावधीत महसुलात 8% वाढ झाली आहे, तसेच लक्स इंडस्ट्रीजने गेल्या तिमाहीत व्हॉल्यूम आणि महसूलात 9% वाढ नोंदवली आहे.
व्हीआयपी क्लोदिंगनुसार, बाजारात (सध्या) सुधारणा आणि विकासाचे संकेत आहेत. महसूल 15-20% वाढण्याची अपेक्षा आहे असे नमूद करण्यात आले आहे.