AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घर खरेदी करताय, स्टेट बँकेचा मोठा निर्णय, गृह कर्जावरील व्याज दरात कपातीचा निर्णय

स्टेट बँक ऑफ इंडियानं गृह कर्जावरील व्याज दरात कपात केली आहे. SBI reduced home loan interest rate

घर खरेदी करताय, स्टेट बँकेचा मोठा निर्णय, गृह कर्जावरील व्याज दरात कपातीचा निर्णय
| Updated on: May 01, 2021 | 1:46 PM
Share

मुंबई: भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियानं गृह कर्जावरील व्याज दरात कपात केली आहे.अवघ्या एक महिन्याच्या कालावधीत होम लोन म्हणजेच गृहकर्जाचं व्याज कमी करण्याचा निर्णय स्टेट बँकेने घेतलाय. 1 एप्रिलला स्टेट बँकेने गृह कर्जावरील व्याजदर 6.70 टक्के वरुन 6.95 टक्के इतका केला होता. मात्र, आता एसबीआयनं व्याज दर घटवला आहे. (SBI reduced home loan interest rate by 25 bps to 6.70 percent)

30 लाखापर्यंतच्या गृहकर्जासाठी 6.70 टक्के व्याज

एसबीआयनं त्यांच्या ग्राहकांसाठी 30 लाखापर्यंतच्या गृह कर्जासाठी 6.70 टक्के व्याजदर निश्चित केला आहे. 30 लाख ते 75 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 6.95 टक्के व्याजदर आकारण्यात येईल. तर, त्यापुढील रकमेसाठी 7.05 टक्के व्याज दर असेल.

व्याज दरात सूट कशी मिळवाल?

एखाद्या महिलेनं तिच्या नावावर गृहकर्जासाठी अर्ज केल्यास तिला 5 बेसिस पॉईंटची सूट मिळेल. एखाद्या ग्राहकानं एसबीआयच्या योनो अ‌ॅपमद्वारे अर्ज केल्यास त्याला आणखी 5 बेसिस पॉईंटची सूट मिळणार आहे.

गृहकर्जावरील सर्वात कमी व्याजदर

सध्याच्या काळात घर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी चांगली संधी आहे.कारण देशातील प्रमुख बँकांचे गृह कर्जाचे व्याजदर गेल्या दहा वर्षातील सर्वात कमी पातळीवर आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया,एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक या बँका कमी व्याजदरानं गृह कर्ज देत आहेत.

आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कपात

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आर्थिक धोरण जाहीर करताना मार्च 2020 पासून बँकांच्या रेपो रेटमध्ये कपात केली आहे. 6 टक्केमधून रेपो रेट कमी करुन 4 टक्के करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या:

Special Report: Gold Rate Today: सोने फेब्रुवारीच्या 20 दिवसांत 3292 रुपयांनी स्वस्त; येत्या आठवड्याभरात स्वस्त होणार की महागणार?

Gold Rate : 8 महिन्यात सगळ्यात स्वस्त झालं सोनं, यावर्षी 4000 ने घसरण; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी

(SBI reduced home loan interest rate by 25 bps to 6.70 percent)

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...