AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7 एप्रिलपर्यंत SBI ग्राहकांसाठी बंपर ऑफर, प्रत्येक खरेदीवर मिळणार 50 टक्के डिस्काऊंट आणि…

एसबीआयच्या बँकिंग सेवा आणि योनो प्लॅटफॉर्मवर खरेदी केल्यावर सवलतीचा फायदा ग्राहकांना मिळेल. याशिवाय कॅशबॅकची सुविधादेखील देण्यात येणार आहे.

7 एप्रिलपर्यंत SBI ग्राहकांसाठी बंपर ऑफर, प्रत्येक खरेदीवर मिळणार 50 टक्के डिस्काऊंट आणि...
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स दिल्यात. तुम्ही सवलतीच्या दरातील कर्जापासून ते विशेष ठेवी योजनांपर्यंत या ऑफरचा लाभ घेऊ शकता.
| Edited By: | Updated on: Apr 05, 2021 | 1:52 PM
Share

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय (State Bank of India) ने ग्राहकांसाठी योनो शॉपिंग कार्निवल (YONO shopping carnival) आणले आहे. बँकेच्या या ऑफरमध्ये ग्राहकांना स्वस्त खरेदी करण्याची संधी मिळेल. हे कार्निवल 4 एप्रिलपासून सुरू होईल आणि 7 एप्रिल 2021 पर्यंत चालेल. एसबीआयच्या बँकिंग सेवा आणि योनो प्लॅटफॉर्मवर खरेदी केल्यावर सवलतीचा फायदा ग्राहकांना मिळेल. याशिवाय कॅशबॅकची सुविधादेखील देण्यात येणार आहे. (sbi yono shopping carnival start from 4 april to 7 april 2021 get 50 percent discount)

बँकेने या ऑफरला योनो सुपर सेव्हिंग डे (YONO Super Saving Days) असे नाव दिले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) म्हटले आहे की, मार्च 2021 मध्ये झालेल्या शॉपिंग कार्निव्हलच्या दुसर्‍या आवृत्तीत ग्राहकांचा मोठा पाठिंबा होता, त्यामुळे बँकेने तिसरी आवृत्ती आणली.

मार्चच्या आवृत्तीत मोठी उडी होती

खरंतर, मार्चमध्ये आयोजित केलेले कार्निवल 4 ते 7 मार्च 2021 दरम्यान आयोजित केले गेले होते. कार्निवलच्या व्यवहारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना पैसे भरण्यासाठीही मोठ्या ऑफर करत आहेत. तुम्हीही युनो एसबीआय अॅपवर जर यूपीआयमार्फत पैसे भरले तर कॅशबॅक बक्षीस (UPI karo, reward jeeto!) अशी खास सुविधा तुम्हाला मिळेल.

50 टक्क्यांपर्यंत मिळेल सूट

या खास सेलमध्ये ग्राहकांना 50 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार असून यामध्ये मोठ्या प्रमाणात फायदे देण्यात आले आहेत. बँकेने या सेलमध्ये बड्या ब्रॅन्डससोबत टायअप केलं आहे. यामध्ये अॅमेझॉन, अपोलो 24×7, ईजीमायट्रिप, ओयो आणि @होम सारख्या दिग्गज कंपनम्यांचा समावेश आहे.

कोणत्या कॅटेगरीमध्ये मिळणार सूट

जर तुम्ही आरोग्यासंबंधी काही वस्तू खरेदी करणार असाल किंवा हॉटेल बुकिंग, फ्लाईट्स बुकिंग अशा सेवांचा लाभ घेणार असाल तर यामध्ये तुम्हाला 50 टक्के सूट देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अॅमेझॉनच्या माध्यमातून काही विशेष कॅटेगरीमध्ये 10 टक्क्यांचा अधिक कॅशबॅक देण्यात येत आहे. यामुळे ही सुविधा ग्राहकांसाछी अत्यंत महत्त्वाची आहे.

किती ग्राहकांना मिळणार फायदा

योनो शॉपिंग कार्निवलच्या खास सुविधेचा फायदा देशातील तब्बल 3.6 कोटी ग्राहक फायदा घेऊ शकणार आहेत. योनोच्या ग्राहकांना या ऑफरचा धमाकेदार फायदा येता येणार आहे. यासाठी तुम्ही https://sbiyono.sbi/index.html वर जाऊन अधिक माहिती घेऊ शकता. (sbi yono shopping carnival start from 4 april to 7 april 2021 get 50 percent discount)

संबंधित बातम्या – 

हॉटेल सुरू करून महिन्याला कमवा 1 लाख रुपये, वाचा संपूर्ण प्लॅन…

Gold Price Today : पुन्हा घसरल्या सोन्याच्या किंमती, आताच चेक करा ताजे दर

1 रुपयाच्या नाण्यावर 10 कोटी कमावण्याची सुवर्णसंधी! पटापट चेक करा संपूर्ण डिटेल्स

(sbi yono shopping carnival start from 4 april to 7 april 2021 get 50 percent discount)
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...