Gold Exchange: नवीन बाजाराची देशात पायाभरणी, सोने देवाण-घेवाणीचे मार्गदर्शक तत्वे जाहीर, व्यवहाराची मिळणार पावती! 

भारतीय प्रतिभूती आणि विनियमन बोर्ड अर्थात सेबीने वॉल्ट अर्थात तिजोरी विनियमन अधिसूचना काढली होती. यामुळे देशातील शेअर बाजारांना गोल्ड एक्सचेंज सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. आता सेबीने याविषयीची मार्गदर्शक तत्वे जाहीर करुन या बाजाराची पायाभरणी केली आहे. आता या बाजाराची कार्यपद्धती कशी राहिल याचे मार्गदर्शक तत्वे सेबीने घालून दिली आहे.  गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये सेबीच्या मंडळाने गोल्ड एक्सचेंज स्थापन करण्यास मंजुरी दिली होती. 

Gold Exchange: नवीन बाजाराची देशात पायाभरणी, सोने देवाण-घेवाणीचे मार्गदर्शक तत्वे जाहीर, व्यवहाराची मिळणार पावती! 
सोने

देशात सोन्याच्या इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील व्यापाराचे (Gold Exchange) स्थान मजबूत करण्यासाठी भारतीय प्रतिभूती आणि विनियमन बोर्डाने (SEBI) मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहे. यापूर्वी अधिसूचना काढण्यात आली होती. आता मार्गदर्शक तत्वे जाहीर करुन या बाजाराची पायाभरणी करण्यात आली आहे. या बाजारात इलेक्ट्रॉनिक सोन्याच्या पावत्या पावती ( EGR  ) म्हणून बाजारात सोन्याचा व्यापार केला जाईल.

शेअर बाजार (Share Market) ईजीआरमध्ये व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक असलेले त्यासाठी अर्ज करू शकतात, असे सेबीने एका परिपत्रकात म्हटले आहे. शेअर बाजार व्यवसाय किंवा ईजीआरचे सोन्यात रूपांतर करण्यासाठी वेगवेगळ्या रकमेसह करार सुरू करू शकतात. त्यासाठी आराखडा (Frame Work) तयार करण्यात आला आहे. त्यानुसार, ईजीआर तयार करणे, शेअर बाजारात ईजीआरमध्ये व्यापार करणे आणि ईजीआरचे प्रत्यक्ष सोन्यात रूपांतर करणे या तीन टप्प्यांत ही प्रक्रिया पूर्ण होईल.

डिपॉझिटरीज् (Depositories) एक समान व्यासपीठ (Common Platform) विकसित करेल. प्रत्येकाला या व्यासपीठावर प्रवेश असेल. यात डिपॉझिटरीस, शेअर बाजार, क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स, व्हॉल्ट मॅनेजर्स यांचा समावेश आहे. व्हॉल्ट किंवा ‘स्ट्राँग रूम’ मॅनेजरचे काम मान्यताप्राप्त साठवण ठिकाणी सोने ठेवतील. तिजोरी व्यवस्थापकाला सेबीने निर्धारित केलेल्या पद्धतीने सोने ठेवावे लागते. त्याचबरोबर गुणवत्ता सुनिश्चित करणे ही त्यांची जबाबदारी असेल. सेबीच्या निर्देशानुसार,  नवीन कायदा त्वरित प्रभावाने अंमलात येणार आहे.

वॉल्ट मॅनेजर्ससाठी नियम

यापूर्वी सरकारने सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) अॅक्ट, 1956 अंतर्गत 24 डिसेंबर रोजी अधिसूचनेद्वारे इलेक्ट्रॉनिक सोन्याच्या पावत्या सिक्युरिटीज म्हणून घोषित केल्या होत्या. नियामकाने ३१ डिसेंबर रोजी व्हॉल्ट व्यवस्थापकांसाठी स्वतंत्रपणे नियम अधिसूचित केले आहेत. प्रत्यक्ष सोन्याचे ईजीआरमध्ये रूपांतर केले जाईल. आयातीद्वारे किंवा मान्यताप्राप्त देशांतर्गत रिफायनरीजद्वारे शेअर बाजारातून तिजोरीत अथवा सुरक्षित ठिकाणी सोन्याचा साठा आणि पुरवठा करण्यात येईल. तसेच तिजोरीत जमा झालेले सोने ईजीआरमध्ये रूपांतरित करता येऊ शकते. सर्व निकष पूर्ण करण्यासाठी सोन्याचे ईजीआरमध्ये रूपांतर होईल याची खात्री व्हॉल्ट व्यवस्थापक करतील.

वॉल्ट मॅनेजरची ही जबाबदारी असेल

तिजोरी व्यवस्थापकाच्या जबाबदाऱ्यांमध्ये ठेवी स्वीकारणे, सोन्याचा साठा आणि संरक्षण करणे, ईजीआर तयार करणे आणि मागे घेणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि वेळोवेळी डिपॉझिटरी रेकॉर्डसह स्पॉट गोल्ड जुळवणे यांचा समावेश आहे

व्हॉल्ट मॅनेजरसाठीच्या अटी

व्हॉल्ट मॅनेजर  (Vault Manager) म्हणून काम करण्याच्या इच्छेने प्रथम सेबीकडे नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. त्याच्या पात्रतेच्या निकषांबद्दल सेबीने म्हटले आहे की, भारतात स्थापन झालेली आणि किमान ५० कोटी रुपयांची निव्वळ संपत्ती असलेली कॉर्पोरेट संस्था व्हॉल्ट मॅनेजरसाठी अर्ज करू शकते. नियामक निलंबित किंवा रद्द करेपर्यंत जारी केलेले कोणतेही नोंदणी प्रमाणपत्र वैध राहील. जेव्हा व्हॉल्ट मॅनेजर नियमांमध्ये जे काही लिहून दिले जाते, त्याच्यापेक्षा वेगळे उपक्रम करतो, तेव्हा त्याच्या व्यवसायातील व्हॉल्ट मॅनेजरशी संबंधित उपक्रम इतरांपेक्षा वेगळे असले पाहिजेत, असे सेबीने म्हटले आहे

काय होईल फायदा 

एक ग्रॅम सोन्याच्या किंमतीपेक्षा ही सोन्याच्या शेअरची किंमत कमी असेल आणि वायदे बाजारात खरेदी विक्री करणाऱ्या सर्वसामान्य गुंतवणुकदारांना ते सहजपणे मोबाईल ॲप द्वारे खरेदी विक्री करता येईल.

सोन्याच्या व्यवहारासाठी इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीटस चा वापर करण्यात येणार आहे. मूल्य निर्धारण करण्यासाठी एक निर्धारित पद्धत अवलंबिण्यात येईल. सोन्याच्या स्वरूपात अथवा सोन्याचे प्रतिनिधित्व म्हणून इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीटस यांचा या गोल्ड एक्सचेंज मध्ये वापर करण्यात येणार आहे. शेअर मार्केट सारखेच तुम्हाला गोल्ड एक्सचेंज मध्ये सोने खरेदी-विक्री आणि ते राखून ठेवण्याची  मुभा असेल.

संबंधित बातम्या : 

आयसीआयसीआय बँकेकडून क्रेडिट कार्डशी संबंधित सर्व शुल्कांमध्ये वाढ, नवे दर दहा फेब्रुवारीपासून लागू

Gold Price Today: सोन-चांदी भावात 2 महिन्यातील मोठी घसरण, ‘त्या’ भावापेक्षा 9000 रुपयांनी खाली!

Published On - 10:24 am, Tue, 11 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI