AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar TATA : टाटा समूहातील वादात शरद पवारांनी उघडपणे घेतली भूमिका, नोएल टाटा की चंद्रशेखरन, पवार कोणाच्या बाजूने?

Sharad Pawar TATA : टाटा समूहात सुरु असलेल्या अंतर्गत वादात शरद पवार यांच्या पक्षाने उघडपणे भूमिका घेतली आहे. शरद पवार यांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट होते की, हा संघर्ष केवळ कॉर्पोरेट बाबींपुरता मर्यादित नाही.

Sharad Pawar TATA : टाटा समूहातील वादात शरद पवारांनी उघडपणे घेतली भूमिका, नोएल टाटा की चंद्रशेखरन, पवार कोणाच्या बाजूने?
Sharad Pawar Image Credit source: PTI
| Updated on: Sep 23, 2026 | 11:27 AM
Share

अक्षय मंकणी, प्रतिनिधी : सध्या टाटा समूहात अंतर्गत वाद सुरु आहे. मागच्या आठवड्यात टाटा सन्स लिमिटेडच्या बोर्डाची बैठक पार पडली. त्यात एन चंद्रशेखरन यांची एग्जीक्यूटिव चेअरमन पदावर पुन्हा पाच वर्षांसाठी नियुक्ती झाली आहे. चेअरमन पदावर चंद्रशेखरन यांच्या फेर नियुक्तीचा निर्णय टाटा ट्रस्टला पटलेला नाही. टाटा ट्रस्टचे चेअरमन आणि टाटा सन्सचे डायरेक्टर नोएल टाटा यांचा चंद्रशेखरन यांच्या नियुक्तीला विरोध आहे. फेब्रुवारी महिन्यातच नोएल टाटा यांनी बोर्ड मीटिंगमध्ये चंद्रशेखरन यांच्या प्रस्तावित तिसऱ्या कार्यकाळाला विरोध केला होता. नोएल टाटा अजूनही नेतृत्व बदलाच्या बाजूने आहेत. टाटा समूहात टाटा सन्स मूळ होल्डिंग कंपनी असून टाटा ट्रस्टकडे समूहातील एकूण 66 टक्के हिसेदारी आहे. मात्र, असं असूनही चंद्रशेखरन यांची फेरनियुक्ती झाली आहे.

चंद्रशेखरन यांचा 20 फेब्रुवारी 2027 ला दुसरा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यानंतर तिसरा कार्यकाळ घेणार नाही अशी चंद्रशेखरन यांनी 12 ऑगस्टला घोषणा केली होती. पण आता त्यांची फेरनियुक्ती झाली आहे. टाटा ट्रस्ट्ची या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढण्याची भूमिका आहे. टाटा समूहात सुरु असलेल्या या अंतर्गत वादात पहिल्यांदाच एका राजकीय पक्षाचा प्रवेश झाला आहे. त्यांनी उघडपणे भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नोएल टाटा यांना पाठिंबा दिला आहे.

शरद पवार काय म्हणाले?

“टाटा ट्रस्टकडून महाराष्ट्रात कर्करोग रुग्णालये, टीआयएफआर (TIFR) आणि टीआयएसएस (TISS) सारख्या शैक्षणिक संस्था आणि एनसीपीए (NCPA) सारख्या सांस्कृतिक संस्था चालवल्या जातात. टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्ट्सची 66% भागीदारी आहे आणि त्यातून मिळणाऱ्या लाभांशातून धर्मादाय कार्यांना निधी पुरवला जातो. ही व्यवस्था कायम ठेवणे आवश्यक आहे” असं शरद पवार यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून म्हटलं आहे.

ही तरतूद कंपनीच्या नियमावलीत आहे

नोएल टाटा यांच्याप्रमाणेच पवार यांनीही एन. चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी निवड बेकायदेशीर मानली आहे. शरद पवार यांनी म्हटले आहे की, “टाटा सन्सच्या संचालक मंडळावर केवळ टाटा ट्रस्ट्सच्या संचालकांपैकी बहुमत असलेलेच अध्यक्ष होऊ शकतात. ही तरतूद कंपनीच्या नियमावलीत आहे. पण 17 सप्टेंबरच्या संचालक मंडळाच्या बैठकीत नोएल टाटा आणि वेणू श्रीनिवासन यांनी स्वतंत्रपणे मतदान केले, जे बहुमत नाही” शरद पवार यांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट होते की, हा संघर्ष केवळ कॉर्पोरेट बाबींपुरता मर्यादित नाही

Follow Us
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट...
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट परीक्षेला बसण्यास बंदी
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर..
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर यांनीही घेतले दर्शन
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद...
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद, नेमकं प्रकरण काय?
धनुष्यबाण कुणाचं? शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी,
धनुष्यबाण कुणाचं? शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, नेमकं...
विठुरायाच्या दर्शनासाठी 3 दिवस प्रतीक्षा! पंढरपूर मंदिर बंद, कारण काय?
विठुरायाच्या दर्शनासाठी 3 दिवस प्रतीक्षा! पंढरपूर मंदिर बंद, कारण काय?
दिवाळीच्या प्रवासाचे नियोजन करताय? रेल्वे तिकीट बुकिंगमध्येच मोठा...
Diwali : दिवाळीत गावी जाण्याचा प्लॅन आहे? अत्ताच करा तयारी, नाही तर...
नवनीत राणांचा थेट कृषीमंत्री भरणेंना फोन, आधी लाऊडस्पीकरवर ठेवला मग...
नवनीत राणांचा थेट कृषीमंत्री भरणेंना फोन, आधी लाऊडस्पीकरवर ठेवला मग अचानक बंद का केला ??
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...