AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलेच्या खात्यात आले 224 कोटी रुपये, सरकार अन् बँकेकडूनही ‘ग्रीन सिग्नल’

Share Market Investment: रेखा झुनझुनवाला यांना मागील आर्थिक वर्षांत शेअरचा चांगला लाभांश (डिव्हीडंड) मिळाला आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांचा लाभांश त्यांना 224 कोटी मिळाला आहे. रेखा झुनझुनवाला यांची शेअर बाजारात एकूण गुंतवणूक 37,831 कोटी रुपये केली आहे.

महिलेच्या खात्यात आले 224 कोटी रुपये, सरकार अन् बँकेकडूनही 'ग्रीन सिग्नल'
| Updated on: May 31, 2024 | 9:55 AM
Share

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या आता प्रचंड वाढली आहे. दोन नियमांचे पालन करत गुंतवणूक केल्यास नफा मिळतो. शेअर बाजारात गुंतवणूक करताना तुमच्याकडे तुमचा सर्व खर्च वजा करुन शिल्लक राहिलेली रक्कम हवी. तसेच तुमच्याकडे दीर्घकाळ थांबण्याची तयारी हवी. त्यानंतर चांगल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यावर नफा मिळतो. दिग्गज गुंतवणूकदार असाच सल्ला देतात. देशातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी काही न करता 224 कोटी रुपये नफा कमावला आहे. फक्त तीन महिन्यांत त्यांनी हा नफा मिळवला आहे. आर्थिक वर्षात शेअर मिळालेल्या लाभांशाची ही रक्कम आहे. यामुळे सरकार आणि बँककडून त्या पैशांना मंजुरी आहे.

रेखा झुनझुनवाला यांना मागील आर्थिक वर्षांत शेअरचा चांगला लाभांश (डिव्हीडंड) मिळाला आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांचा लाभांश त्यांना 224 कोटी मिळाला आहे. रेखा झुनझुनवाला यांची शेअर बाजारात एकूण गुंतवणूक 37,831 कोटी रुपये केली आहे. विविध कंपन्या आपल्या नफाचा वाटा भागधारकांना (शेअर होल्डर) देत असतात.

टाटा कंपनीच्या दोन शेअरने दिले 66 कोटी

रेखा झुनझुनवालावाला यांना देण्यात आलेल्या लाभांशमध्ये सर्वाधिक वाटा टाटा कंपनीच्या शेअर्सचा आहे. टाटाची टायटन कंपनीने त्यांना 52.23 कोटी रुपये लाभांश दिला आहे. टाटा मोटर्सने 12.84 कोटी रुपये लाभांश त्यांना दिला आहे. तसेच कॅनेरा बँक 42.37 कोटी, वेलर एस्‍टेट 27.50 कोटी आणि एनसीसीने 17.24 कोटी रुपये लाभांश दिला आहे. तसेच CRISIL, Escorts Kubota, Fortis Healthcare, Geojit Financial Services, The Federal Bank यासह अन्य कंपन्यांनी 72.49 कोटी रुपये लांभाश दिला आहे.

कुठे किती गुंतवणूक

रेखा झुनझुनवाला यांची सर्वाधिक गुंतवणूक टाटा कंपनीच्या शेअरमध्ये आहे. त्यांनी 16,215 कोटी रुपये टायटनमध्ये गुंतवले आहेत. 4,042 कोटी रुपये टाटा मोटर्समध्ये गुंतवले आहेत. तसेच मेट्रो ब्रॅण्डमध्ये 3,059 कोटी रुपये गुंतवले आहे. शेअर बाजारात लिस्टींग असलेल्या 26 कंपन्यांमध्ये त्यांची एक टक्क्यापेक्षा जास्त गुंतवणूक आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.