पैसे कमावण्याची संधी! ‘ही’ कंपनी 3000 कोटी रुपयांचा IPO आणणार, वाचा सविस्तर

रिन्यूएबल एनर्जी कंपनी ज्युनिपर ग्रीन एनर्जी लवकरच आयपीओ आणणार आहे. यासाठी कंपनीने सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला आहे.

पैसे कमावण्याची संधी! ही कंपनी 3000 कोटी रुपयांचा IPO आणणार, वाचा सविस्तर
ipo
| Updated on: Jun 30, 2025 | 10:24 PM

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. रिन्यूएबल एनर्जी कंपनी ज्युनिपर ग्रीन एनर्जी लवकरच आयपीओ आणणार आहे. यासाठी कंपनीने सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला आहे. यानुसार ज्युनिपर ग्रीन एनर्जी या आयपीओमधून 3000 कोटी रुपयांचा फंड उभारणार आहे. या आयपीओ अंतर्गत 3000 कोटी रुपयांचे सर्व नवीन शेअर्स जारी केले जाणार आहेत. म्हणजेत यात ओएफएसचा समावेश असणार नाही.

आयपीओपूर्वी 600 कोटी रुपये उभारणार

ज्युनिपर ग्रीन एनर्जी कंपनी आयपीओ आणण्यापूर्वी प्री-आयपीओ प्लेसमेंटद्वारे 600 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. हा निधी करण्यास कंपनीला यश आले तर नवीन इश्यूचा आकार कमी केला जाण्याची शक्यता आहे. कंपनीने सेबीला हेही सांगितले आहे की, कंपनी आयपीओमधून जमा झालेल्या पैशांमधून 2250 कोटी रुपये कर्ज फेडणार आहे. तसेच उरलेले पैसे गुंतवणूक आणि इतर कामांसाठी वापरले जाणार आहेत.

बड्या कंपन्यांशी स्पर्धा

जुनिपर ग्रीन एनर्जीच्या पोर्टफोलिओमध्ये सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेचा समावेश आहे. ही कंपनी बाजारात लिस्ट झाल्यानंतर अदानी ग्रीन एनर्जी, एनटीपीसी ग्रीन एनर्जी, सुझलॉन सारख्या बड्या कंपन्यांशी स्पर्धा करणार आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात कंपनीने 40 कोटी रुपयांचा नफा कमावला होता, मात्र त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात कंपनीला 12 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. हा आयपीओ मॅनेज करण्यासाठी आयसीआयसीआय सिक्युरिटीज, एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया), जेएम फायनान्शियल आणि कोटक महिंद्रा कॅपिटल या कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टीप – वरील लेखात दिलेली माहिती ही केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे आर्थिक जोखमीचे काम आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्यावा. वरील लेख वाचून एखाद्याने गुंतवणूक केल्यास, आणि त्याला आर्थिक फटका बसल्यास टीव्ही 9 मराठी जबाबदार असणार नाही.