Share Market: गुंतवणूकदार मालामाल होणार, ही कंपनी एकावर 1 शेअर फ्री देणार

Bonus Share: Sampre Nutritions Ltd कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. शेअर्स या आठवड्यात एक्स-बोनस आणि एक्स-स्प्लिटमध्ये व्यवहार करणार आहेत. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला ही माहिती दिली आहे.

Share Market: गुंतवणूकदार मालामाल होणार, ही कंपनी एकावर 1 शेअर फ्री देणार
bonus share
| Updated on: Nov 09, 2025 | 9:34 PM

शेअर बाजारातून अनेकजण दररोज लाखो रुपये कमवत असतात. अशातच आता Sampre Nutritions Ltd कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. शेअर्स या आठवड्यात एक्स-बोनस आणि एक्स-स्प्लिटमध्ये व्यवहार करणार आहेत. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला ही माहिती दिली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे. सॅम्प्रे न्यूट्रिशन्स लिमिटेडच्या एका शेअरची किंमत 150 रूपयांपेक्षा कमी आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

एकावर 1 शेअर फ्री मिळणार

Sampre Nutritions Ltd कंपनीने एक्सचेंजकडे दिलेल्या फाइलिंगमध्ये असे म्हटले आहे की, गुंतवणूकदारांनी खरेदी केलेल्या प्रत्येक शेअरवर एक मोफत शेअर दिला जाईल. तसेच कंपनीने 10 रूपयांची फेस व्हॅल्यु असणाऱ्या शेअरचे दोन भागांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू प्रति शेअर 5 रूपये इतकी होणार आहे. 14 नोव्हेंबर रोजी बोनस शेअर्स वाटप केले जाणार आहेत. ज्या गुंतवणूकदारांची नावे या तारखेला कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये लिस्टेड असतील त्यांना बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचे फायदे मिळणार आहेत. ही कंपनीकडून पहिल्यांदाच गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स दिले जात आहेत.

मार्केटमध्ये कंपनीची कामगिरी कशी आहे?

शुक्रवारी Sampre Nutritions Ltd कंपनीच्या शेअरची किंमत 2 टक्क्यांनी घसरून 138.60 वर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या दोन आठवड्यात कंपनीच्या शेअरची किंमत 16 टक्क्यांनी घसरली आहे. ही घसरण झाली असली तरीही या शेअरने तीन महिन्यांत 132 टक्के परतावा दिला आहे. तसेच सॅम्प्रे न्यूट्रिशन्स लिमिटेडच्या शेअर्सनी पोजिशनल गुंतवणूकदारांना 51 टक्के परतावा दिला आहे. या शेअरची एका वर्षातील सर्वाधिक किंमत 169.30 आहे, तसेच सर्वात कमी किंमत 20.90 प्रति शेअर आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 291 कोटी रूपये आहे.

(टीप – टीव्ही 9 मराठी तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. वरील लेख फक्त माहितीसाठी आहे. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास फायद्यासह तोटाही होण्याची शक्यता असते, तुम्ही एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास आणि तुम्हाला तोटा झाल्यास टीव्ही 9 मराठी जबाबदार असणार नाही.)