AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Record : लाख मोलाचा शेअर! भारतीय टायर कंपनीची ऐतिहासिक कामगिरी

Share Record : या टायर कंपनीने गुंतवणूकदारांना प्रगतीची चाकं दिली आहेत. ज्यांनी काही वर्षांपूर्वी हा शेअर खरेदी केला ते आता नवकोट नारायण झाले आहेत.

Share Record : लाख मोलाचा शेअर! भारतीय टायर कंपनीची ऐतिहासिक कामगिरी
लाखोचा वायदा
| Updated on: Jun 13, 2023 | 1:46 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात (Share Market) या टायर कंपनीने इतिहास रचला आहे. या कंपनीचा एक शेअर एक लाख रुपयांचा झाला आहे. या टायर कंपनीने गुंतवणूकदारांना प्रगतीची चाकं दिली आहेत. ज्यांनी काही वर्षांपूर्वी हा शेअर खरेदी केला ते आता नवकोट नारायण झाले आहेत. गेल्या महिनाभरापूर्वीच या शेअरची बाजारात जोरदार चर्चा होती. हा शेअर लवकरच एक लाखांचा टप्पा गाठून पुढे प्रगती करेल, यावर बाजारातील तज्ज्ञांनी विश्लेषण केलं होतं. तसेच यापूर्वी या टायर कंपनीने (Tyre Company) कधी शेअर स्प्लिट केला आणि आता ही कंपनी शेअरचे विभाजन करेल की नाही, याचा अंदाज करण्यात आला होता.

असा रचला इतिहास एमआरएफ स्टॉकने (MRF Stock) मंगळवारी शेअर बाजारात इतिहास रचला. एक लाख रुपयांना गवसणी घालणारा हा भारतातील पहिला स्टॉक ठरला. हा स्टॉक BSE वर अगोदर 98,939.70 रुपये प्रति शेअरवर बंद झाला होता. आज सकाळी हा शेअर 99,500 रुपयांवर उघडला आणि सकाळच्याच सत्रात तो 1,00,300 रुपयांपर्यंत झेपावला. त्याने एकाच दिवशी 800 रुपये प्रति शेअरची हनुमान उडी घेतली. एक लाखांपेक्षा जास्त किंमत असलेला भारतीय शेअर बाजारातील एकमेव स्टॉक ठरला. एका वर्षात या स्टॉकमध्ये तुफान तेजी दिसून आली.

घसरणीनंतर उसळी बेंचमार्क सेन्सेक्सवर हा स्टॉक 19 टक्क्यांनी वधारला. तर एका वर्षात हा स्टॉक 45 टक्क्यांनी झेपावला. एमआरएफच्या शेअरने 17 जून 2022 रोजी बीएसईवर 65,900.05 असा 52 आठवड्यातील निच्चांक गाठला होता. या शेअरने गेल्या एका महिन्यात 13 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या शेअरमध्ये एका वर्षात जोरदार 33 टक्के उसळी दिसून आली. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना या कंपनीने मालामाल केले आहे. गेल्या 20 वर्षांत या शेअरने 5000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. 20 वर्षांपूर्वी म्हणजे 2 मे 2003 रोजी हा शेअर 1100 रुपये होता. आता तो 95,000 रुपयांवर आहे.

का आहे इतका महागडा एमआरएफ कंपनीचा हा शेअर इतका महागडा का आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर गेल्या कित्येक वर्षांपासून या कंपनीने शेअर स्प्लिट केला नाही, हे त्यामागील प्रमुख कारण आहे. 27 एप्रिल 1993 साली हा शेअर 11 रुपयांना मिळत होता. 1970 मध्ये 1:2 आणि 1975 मध्ये 3:10 या प्रमाणात हा स्टॉक स्प्लिट झाला होता. त्यानंतर कंपनीने अद्याप स्टॉक स्प्लिट केलेला नाही. हेच याच्या महागडेपणाचे एक कारण आहे.

तिमाहीत जोरदार कामगिरी MRF ही ती कंपनी आहे. एमआरएफ कंपनीचे टायर तर अनेकांनी त्यांच्या दुचाकी, चारचाकीसाठी खरेदी नक्कीच केले असेल. तर या कंपनीचा शेअर भारतीय शेअर बाजारातील सर्वात महागडा स्टॉक आहे. चौथ्या तिमाहीत या कंपनीने जोरदार मुसंडी मारली. FY23 च्या मार्च तिमाहीत एमआरएफला तगडा फायदा झाला. या कंपनीचा नफा 162 टक्क्यांनी वाढून 410.66 कोटी रुपयांवर पोहचले.

असा दिला लाभांश या दरम्यान कंपनीचे ऑपरेटिंग परफॉर्मन्स जोरदार राहिला. तर वार्षिक आधारावरील महसूल 10 टक्क्यांनी वाढून 5,725.4 कोटी रुपयांवर पोहचला. या कंपनीने शेअर होल्डर्सला प्रत्येक शेअरमागे 169 रुपयांचा लाभांश देण्याची घोषणा केली होती. आता कंपनीच्या शेअरने एक लाखांचा टप्पा ओलांडल्याने सुरुवातीच्या काळात ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे ते आता नवकोट नारायण झाले आहेत.

चढता आलेख

  1. 1993 मध्ये एमआरएफच्या एका शेअरची किंमत 11 रुपये होती
  2. 2000 मध्ये हा शेअर 2000 रुपयांवर होता
  3. 2012 मध्ये एका शेअरची किंमत 10,000 रुपयांवर पोहचली
  4. 2014 मध्ये एक शेअर 25,000 रुपयांवर पोहचला
  5. 2016 मध्ये एका शेअरची किंमत 50,000 रुपये झाली
  6. 2018 साली हा शेअर 75,000 रुपयांवर पोहचला
  7. 13 जून 2023 रोजी इतिहास रचत या शेअरने 1 लाखांचा टप्पा ओलांडला

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.