AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना केले करोडपती, 10 हजारांचे वर्षभरात झाले 2.30 लाख

या वर्षाच्या सुरुवातीपासून गोपाला पॉलिप्लास्टचा स्टॉक 1,688 टक्क्यांनी वाढला आणि एका महिन्यात 151.17 टक्क्यांची वाढ झाली. कंपनीचे बाजारमूल्य 121 कोटी रुपये आहे. एक वर्षापूर्वी त्यात गुंतवलेली 10,000 रुपयांची गुंतवणूक आता वाढून 2.30 लाख झालीय.

'या' कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना केले करोडपती, 10 हजारांचे वर्षभरात झाले 2.30 लाख
1 सप्टेंबर 2021 ला कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी होणार : याद्वारे हे सुनिश्चित केले गेले आहे की, आरबीआयने बँकेच्या कामकाजावर बंदी घातल्यानंतर 90 दिवसांच्या आत बँकेच्या ठेवीधारकांना 5 लाख रुपयांपर्यंत ठेवी मिळतील. ही रक्कम डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनद्वारे प्रदान केली जाते. या महिन्याच्या 27 तारखेला राजपत्रात प्रकाशित झालेल्या अधिसूचनेनुसार, सरकारने 1 सप्टेंबर 2021 ला कायद्यातील तरतुदी अंमलात येण्याची तारीख म्हणून अधिसूचित केलेय.
| Edited By: | Updated on: Aug 06, 2021 | 2:31 PM
Share

नवी दिल्लीः मल्टिबॅगर स्टॉक 2021: कोरोना महामारीच्या संकटादरम्यान स्मॉलकॅप समभागांनी गुंतवणूकदारांना मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या तुलनेत मोठा नफा मिळवून दिलाय. गोपाला पॉलिप्लास्टच्या (Gopala Polyplast) शेअर्सने केवळ एका वर्षात आपल्या भागधारकांना 2,300 टक्क्यांहून अधिक परतावा दिला. त्या तुलनेत सेन्सेक्स केवळ 44.68 टक्क्यांनी वाढला. या वर्षाच्या सुरुवातीपासून गोपाला पॉलिप्लास्टचा स्टॉक 1,688 टक्क्यांनी वाढला आणि एका महिन्यात 151.17 टक्क्यांची वाढ झाली. कंपनीचे बाजारमूल्य 121 कोटी रुपये आहे. एक वर्षापूर्वी त्यात गुंतवलेली 10,000 रुपयांची गुंतवणूक आता वाढून 2.30 लाख झालीय.

आज स्टॉक 5 टक्क्यांनी वाढून नवीन 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर

बीएसई वर आज स्टॉक 5 टक्क्यांनी वाढून नवीन 52 आठवड्यांच्या उच्चांकी 118.25 रुपयांवर पोहोचला. गेल्या 5 दिवसात स्टॉक 27.5 टक्के वाढला. आज स्टॉकमध्ये 5 टक्क्यांवरचे सर्किट आहे. गोपाला पॉलिप्लास्टचा शेअर 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या सरासरीपेक्षा जास्त आहे.

प्रवर्तकांचे भागभांडवल

जून तिमाहीच्या अखेरीस फर्ममध्ये प्रवर्तकांचे भागभांडवल 92.83 टक्के आणि सार्वजनिक भागधारकांचे 7.17 टक्के होते. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) 5 टक्के हिस्सा म्हणजे 5.12 लाख समभागांसह कंपनीतील सर्वात मोठा भागधारक होता. 2 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक भांडवल असलेले 1,38,833 शेअर्स असलेले फक्त 3,682 भागधारक होते. तीन विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडे जून तिमाहीच्या अखेरीस 23,369 शेअर्स होते.

कंपनीची आर्थिक स्थिती

आर्थिकदृष्ट्या कंपनीने मार्च तिमाहीत 491.32 टक्क्यांच्या वाढीसह 17.14 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 4.38 कोटी रुपये होता. मात्र, तिमाही आधारावर निव्वळ नफा 65.33 टक्क्यांनी घसरून 49.44 कोटी रुपये झाला. वार्षिक आधारावर मार्च 2021 ला संपलेल्या आर्थिक वर्षात निव्वळ नफा 407 टक्क्यांनी वाढून 63.62 कोटी रुपये झाला, तर मार्च 2020 ला संपलेल्या आर्थिक वर्षात 20.70 कोटी रुपयांचा तोटा झाला. मार्च 2020 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात विक्री 182 टक्क्यांनी वाढून 15.87 कोटी रुपये झाली जी मागील आर्थिक वर्षात 5.62 कोटी होती.

कंपनीवर फसवणुकीचा आरोप

गुंतवणूकदारांनीही सावधगिरीने शेअरचा व्यापार करावा, कारण फर्म गेल्या वर्षी चुकीच्या कारणांमुळे चर्चेत होती. डिसेंबर 2020 मध्ये सीबीआयने गोपाला पॉलिप्लास्टविरोधात 72.55 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला. बँक ऑफ बडोदाच्या तक्रारीच्या आधारावर केंद्रीय एजन्सीने गोपाला पॉलिप्लास्टविरोधात गुन्हा नोंदवला आणि आरोप केला की, फर्मचे आरोपी संचालक – मनीष सोमाणी आणि मनोज सोमाणी आणि किशोरीलाल सोनथलिया यांनी फसवणुकीच्या 2017 ते 2019 दरम्यान बँकेला 72.55 कोटी रुपये दिले.

संबंधित बातम्या

RBI Monetary Policy: GDP 9.5% वाढीचा अंदाज; पतधोरणातील मोठ्या गोष्टी जाणून घ्या, एका क्लिकवर सर्व माहिती

Gold Price Today: चांगली संधी! सोने पुन्हा एकदा झाले स्वस्त, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

Shares of Gopala Polyplast company made investors millionaires, worth Rs 10,000 to Rs 2.30 lakh in a year

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.