चांदी पुन्हा दोन लाखाच्या पार, सोन्यानेही बनवला नवा रेकॉर्ड, दरवाढ कुठपर्यंत?

देशाच्या वायदा बाजारात चांदीचे भाव दोन लाखाच्या पार गेले आहेत. चालू आठवड्यात चांदीच्या दरात १७ हजार रुपयांची जास्त वाढ पाहायला मिळू शकते, मेक्सिकोवर लावलेला ५० टक्के टॅरिफ मौल्यवान धातूच्या दरवाढीला कारणीभूत आहे. चला तर पाहूयात सोने आणि चांदीचे भाव किती झाले आहेत.

चांदी पुन्हा दोन लाखाच्या पार, सोन्यानेही बनवला नवा रेकॉर्ड, दरवाढ कुठपर्यंत?
silver and gold rate news
| Updated on: Dec 12, 2025 | 7:05 PM

एकीकडे देशाच्या वायदा बाजारात मल्टी कमोडीटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या किंमतीने नवा रेकॉर्ड कायम केला आहे. तर दुसरीकडे चांदीचे दर आधीही २ लाख रुपयांच्या पलिकडे गेले होते. खास बातमी म्हणजे चालू आठवड्यातही चांदीच्या किंमतीत सुमारे १७ हजार रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे. तशी आज सकाळी चांदीच्या किंमतीत नफेखोरी पाहायला मिळाली होती आणि सुमारे २००० रुपयांहून जास्त घसरणीसह चांदीचे दर ओपन झाले होते. दुपारनंतर पुन्हा एकदा केवळ सोन्याच्या नव्हे तर चांदीच्या किंमतीतही मोठी दरवाढ पाहायला मिळाली. अलिकडे फेडने केलेली व्याजदरातील कपात, पुरवठ्यात कमी, अमेरिकेने मेक्सिकोवर लावलेला ५० टक्के टॅरिफ आणि मागणीत झालेली वाढ यामुळे चांदी आणि सोन्याच्या किंमतीत वाढ पाहायला मिळाली आहे. जाणकारांच्या मते साल २०२६ च्या पहिल्या सहामाहीत चांदीचे भाव २.५० लाख रुपयांपर्यंत पोहचू शकतात. चला तर पाहूयात देशाच्या वायदा बाजारात सोने आणि चांदीचे भाव किती झाले आहेत.

चांदीचे भाव 2 लाख रुपयांच्या पार

देशाच्या वायदा बाजारात मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीच्या किंमतीत २ लाख रुपयांच्या पार गेल्या आहेत. एमसीएक्सच्या आकड्यांनुसार कामकाजाच्या सत्रा दरम्यान चांदी १,४२० रुपयांच्या वाढीसह २,००,३६२ रुपयांवर पोहचली, जो आतापर्यंत लाईफ टाईम रेकॉर्ड आहे. तसे दुपारी ३.१५ वाजेपर्यंत चांदीची किंमत किरकोळ ४६ रुपयांच्या घसरणीसह १,९८,८९६ रुपयांवर होती.तसेच चांदी आज सकाळी १,९८४ रुपयांच्या घसरणीसह १,९६,९५८ रुपयांवर ओपन झाली होती आणि १,९६,९५७ रुपयांसह दिवसाच्या निच्चतम पातळीवर पोहचली होती. याचा अर्थ चांदीची किंमत दिवसाच्या लोव्हर लेव्हलने ३,४०५ रुपयांची उसळी पाहायला मिळाली आहे.

डिसेंबरमध्ये किती झाली वाढ

डिसेंबरमध्ये चांदीच्या किंमतीत जबरदस्त उसळी पाहायला मिळाली आहे. आकड्यांकडे पाहिले तर नोव्हेंबरच्या अखेरच्या कामकाजाच्या दिवशी चांदीचे भाव १,७४, ९८१ रुपये होते. ज्यात आतापर्यंत २५,३८१ रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे. जर सध्या आठवड्याचा विचार केला तर चांदीची किमतीत चांगलीच वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी चांदीचे भाव १,८३,४०८ रुपये प्रति किलोग्रॅम होते. ज्यात आतापर्यंत १६,९५४ रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे.याचा अर्ज चांदीच्या किमतीने डिसेंबरात चांगला रिटर्न दिला आहे.ज्याची अपेक्षा नव्हती.

सोन्याच्या किंमतीचाही रेकॉर्ड

चांदीच्या सोबत सोन्याच्या किंमतीनेही रेकॉर्ड कायम ठेवला आहे. एमसीएक्सच्या आकड्यांनुसार सोन्याचे भाव १,६४२ रुपयांच्या वेगाने रेकॉर्ड १,३४,१११ रुपयांवर पोहचले आहेत. सोन्याने १७ ऑक्टोबर म्हणजे सुमारे महिन्यानंतर पहिल्यांदा रेकॉर्ड कायम केला आहे. तसे सकाळी सोन्याचा भाव किरकोळ घसरणीनंतर १,३२,४४२ रुपयांना सुरु झाला होता. परंतू एक दिवसाआधी सोन्याच्या किंमती १,३२,४६९ रुपयांवर बंद झाल्या होत्या. तसे डिसेंबर त्या महिन्यात सोन्याच्या किंमतीत ३,६४९ रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे.