
मुंबई- एसएमएफजी इंडिया क्रेडिटने (एसएमआयसीसी) त्यांच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी २ डिसेंबर २०२५ पासून पगारी मासिक पाळीच्या रजा धोरणाची घोषणा केली आहे. हे पाऊल कामाच्या ठिकाणी महिलांना योग्य वागणूक देण्याच्या कंपनीच्या धोरणाला बळकट करत आहे. अनेक राज्ये देखील या प्रगत धोरणाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत असताना एसएमआयसीसीने देशभरातील त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी हे धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
नव्या धोरणानुसार महिला कर्मचाऱ्यांना दर महिन्याला एक भरपगारी मासिक पाळी सुटी मिळणार असून ती सध्याच्या सर्व सुट्ट्याच्या अतिरिक्त असणार आहे. ही रजा आपोआप लागू होईल यासाठी व्यवस्थापकीय स्वीकृतीची आवश्यकता लागणार नाही तसेच मेडीकल सर्टीफिकीटचीही गरज लागणार नाही. ही सुट्टी त्याच महिन्यात घ्यावी लागेल ज्या महिन्यात ती दिली जाणार आहे. हे प्रगतीशील पाऊल कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण कल्याणाच्या प्रत्येक पैलूला सहकार्य देण्याच्या SMICC सातत्यपूर्ण प्रतिबद्धतेला दर्शवते. संघटना सर्वसावेशक प्रथांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिबद्ध आहे. जी व्यक्तीगत गरजांचा सन्मान करतात आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे सर्वश्रेष्ट योगदान देण्यास सक्षम बनवते.
जस जशा संघटना आधुनिक कार्यबलाच्या अपेक्षानुरुप विकसित होत आहेत. कर्मचारी -केंद्रीत धोरणे अनिर्वाय बनली आहेत. SMFG इंडिया क्रेडिटमध्ये आम्ही आपल्या देशव्यापी कार्यालयात मासिक सुटी लागू केली आहे. त्यामुळे महिलांना कर्मचाऱ्याच्या समावेशन आणि समग्र कल्याणावर आपला फोकसला मजबूत केले आहे. आम्ही यास एक व्यापक आणि सतत प्रयत्नाचा हिस्सा मानत आहेत. ज्यात निष्पक्षता, सन्मान आणि देखभालीला केंद्री ठेवले आहे असे यावर बोलताना SMFG इंडिया क्रेडिटचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ रवी नारायणन यांनी म्हटले आहे.
आमच्या प्रत्येक एचआर नीतीच्या केंद्री आमच्या कर्मचाऱ्याचे कल्याण आहे. मासिक पाळी रजेचे धोरण कामाच्या स्थळाला एक करुणामय आणि न्यायसंगत स्थळ बनवण्याची आमची प्रतिबद्धता दर्शवते. जेथे विविध गरजांचा सन्मान केला जातो. आणि सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि सुविधा निश्चित केली जाते. आम्ही भारताच्या बदलत्या श्रम परिदृश्यच्या अनुरुप बनलेले आहोत आणि वित्तीय सेवा क्षेत्रात विश्वास, समावेशन आणि कॉर्पोरेट जबाबदारी मजबूत करणारी नितीचे नेतृत्व करण्यावर आम्ही अभिमान बाळगत आहोत असे SMFG इंडिया क्रेडिटचे मुख्य मानव संसाधन अधिकारी गौरव टरडल यांनी सांगितले.
ही संस्था तिच्या प्रमुख उपक्रम ‘अनटॅग्ड’ द्वारे एक निष्पक्ष, समावेशक आणि सक्षम कार्यस्थळ निर्माण करण्याच्या प्रतिबद्धतेला पुढे नेत आहे. हा SMICC विविधता, समानता आणि समावेशनाला (DEI) प्रोत्साहन देणारा व्यापक कार्यक्रम आहे. ज्यात कार्यस्थळावरील महिलांवर विशेष लक्ष दिले आहे. ही प्रतिबद्धता क्रेच सुविधांना, IVF सहाय्यता, ओपीडी सल्लामसलत आणि व्यापक गर्भधारणा काळजी पॅकेजेससारख्या महिला-केंद्रित कल्याण उपक्रमांमध्ये प्रतिबिंबित होते.
मध्यम आणि वरिष्ठ पातळीवरील महिला नेतृत्वासाठी विशेष विकास कार्यक्रमांद्वारे SMICC आपल्या समावेशक धोरणांना आणखी बळकटी देत आहे. लिंगभावाच्या रूढींना आव्हान देण्यासाठी आणि आदर आणि समानतेची संस्कृती वाढवण्यासाठी संपूर्ण संस्थेत संवेदनशीलता आणि प्रशिक्षण सत्रे देखील आयोजित केली जात आहेत.
SMICC मध्यम आणि वरिष्ठ पातळीवरील महिला नेतृत्वासाठी विशेष विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या समावेशक धोरणांना आणखीन मजबूत करत आहे. लैंगिक रुढींना आव्हान देऊन सन्मान आणि समानतेची संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संघटनेत संवेदनशीलता आणि प्रशिक्षण सत्र देखील आयोजित केले जात आहेत.
SMFG इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड ही एक आघाडीची एनबीएफसी – इन्व्हेस्टमेंट अँड क्रेडिट कंपनी ( एनबीएफसी-आयसीसी ) आहे. जी रिझर्व्ह बँकेत नोंदणीकृत आहे आणि सुमितोमो मित्सुई फायनान्शियल ग्रुपची ( एसएमएफजी ) पूर्ण मालकीची उपकंपनी आहे.
SMFG हा जगातील सर्वात मोठ्या बँकिंग आणि वित्तीय सेवा गटांपैकी एक आहे, जो व्यावसायिक बँकिंग, भाडेपट्टा, सिक्युरिटीज आणि ग्राहक वित्त यासह विविध वित्तीय सेवा प्रदान करतो. जपानमध्ये मुख्यालय असलेले, ते टोकियो आणि न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये ( ADRs द्वारे ) सूचीबद्ध आहे.
२००७ पासून भारतात कार्यरत असलेली, कंपनी आणि तिची उपकंपनी SMFG इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड ( SMFG गृहशक्ती ) यांचे ६७०+ शहरे आणि ७०,०००+ गावांमध्ये अस्तित्व आहे, ९८९ शाखा आणि २२,०००+ कर्मचारी आहेत. ही कंपनी लहान व्यवसायांना आणि किरकोळ ग्राहकांना कर्ज देण्याचे उपाय प्रदान करते – ज्यांना औपचारिक कर्ज उपलब्ध नाही.