2000 note exchange : काय सांगताय काय, 10 लाखांची नोट! कोणत्या देशात चालते सर्वात महागडे चलन

| Updated on: May 23, 2023 | 11:23 AM

2000 note exchange : भारतात पण 10 हजारांची नोट चालत होती, 1978 साली ती चलनातून बाद झाली. पण जगात एका देशात तर 10 लाखांची नोट चलनात आहे, कोणत्या देशात चालते सर्वात महागडे चलन

2000 note exchange : काय सांगताय काय, 10 लाखांची नोट! कोणत्या देशात चालते सर्वात महागडे चलन
Follow us on

नवी दिल्ली : भारतात पण 10 हजारांची नोट चालत होती, 1978 साली ती चलनातून बाद झाली. 5,000 रुपयांची नोटही व्यवहारातून गायब झाली. सध्या भारतात सर्वाधिक मूल्य असलेली (Most Valued Currency) 2,000 रुपयांची नोट बाजारातून बाद होण्याच्या मार्गावर आहे. आजपासून ही नोट परत बोलविण्यात येत आहे. त्यापूर्वी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 1,000 रुपयांची नोट बंद करण्यात आली होती. जगातील या देशात तर 10 लाखांची नोट (10 Lakh Note) चलनात आहे. अनेक देशांमध्ये आजही महागड्या नोटा आहेत. कोणते आहेत हे देश आणि तिथे किती रुपयांच्या नोटा व्यवहारात आहेत, माहिती आहे का?

आता 500 रुपयांची नोट महाग
भारतीय रिझर्व्ह बँके (RBI) नागरिकांना चांगल्या दर्जाच्या नोटा देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे दोन हजारांच्या नोटा माघारी बोलविण्यात येत आहे. गुलाबी नोटांच्या दर्जावर यापूर्वी प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत 2,000 रुपयांच्या नोटा माघारी बोलविण्यात येत आहेत. त्यामुळे देशात आता 500 रुपयांची नोट सर्वाधिक मूल्य असलेली नोट ठरलेली आहे. RBI च्या अहवालानुसार, 31 मार्च 2022 पर्यंत 2,000 रुपयांच्या (2000 Rupee note) एकूण 214.20 कोटी नोटा चलनात होत्या. एकूण नोटांच्या हे प्रमाण 1.6% आहे. मूल्यानुसार एकूण 4,28,394 कोटी रुपयांच्या नोटा व्यवहारात होत्या.

हे सुद्धा वाचा

कधी होती 10 हजारांची नोट
भारतात 2000 रुपयांचीच नोट सर्वात महागडी होती असे नाही. यापूर्वी भारतात 10 हजारांची नोट व्यवहारात वापरण्यात येत होती. भारतीय रिझर्व्ह बँकेने छापलेली ही सर्वात महागडी नोट होती. ही नोट 1938 साली पहिल्यांदा छापण्यात आली. जानेवारी 1946 साली नोट बंद झाली. 10,000 रुपयांची नोट पुन्हा 1954 साली बाजारात आली. 1978 साली ही नोट बंद करण्यात आली.

व्हेनेझुएला महागड्या नोटात अव्वल
महागाईचा आगडोंब असळलेल्या काही देशात व्हेनेझुएलाचा क्रमांक लागतो. या महागाईवर मात करण्यासाठी व्हेनेझुएलाने सर्वात मूल्य असलेली 10 लाख रुपयांची नोट छापली आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये या देशाने एक लाख बोलीवर ची नोट छापली होती. सर्वाधिक मूल्याची नोट छापणारा व्हेनेझुएला हा जगातील एकमेव देश आहे.

चीन पण नाही मागे
चीनची अर्थव्यवस्थेने दुहेरी मुद्रा धोरणाचा स्वीकार केलेला आहे. चीनी रॅन्मिबीचा (RMB) वापर चीनच्या अंतर्गत व्यवहारात करण्यात येतो. तर चीन युआन (CNY) आंतरराष्ट्रीय चलन म्हणून करण्यात येतो. रॅन्मिन्बी नोट, 1, 5, 10, 20, 50, 100, 200, 500, 1000, 5000,10,000 आणि 50,000 युआनच्या असतात.

पाकिस्तानमध्ये 5000 रुपयांची नोट
पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या आर्थिक संकटातून जात आहेत. या देशात 5000 रुपयांची नोट सर्वाधिक मूल्य असलेली नोट आहे. 2005 मध्ये ही नोट चलनात आणण्यात आली होती. सध्या आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्याने ही नोट बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे. पाकिस्तान स्टेट बँकेच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, या देशात 5, 10, 20, 50, 500, 1000 आणि 5000 रुपयांची नोट चलनात आहे.

अर्जेटिनात पण अधिक मूल्याच्या नोटा
अर्जेटिनात महागाई उच्चांकी पातळीवर आहे. महागाईवर मात करण्यासाठी येथील सरकार अधिक मूल्य असलेल्या नोटेची छपाई करण्याच्या तयारीत आहे. या देशात 2000 पेसो हे चलन आहे. तसेच 1000 पेसोची पण मोठी नोट आहे. केंद्रीय बँक BCRA नुसार, 2000 रुपयांची नोट ही अमेरिकेचे चलनात 11 डॉलर इतक्या मूल्याची असेल.