Gold Silver Rate Today : गुलाबी नोटेने सराफा बाजार फुलला, पण सोने-चांदीची धरसोड सुरुच, भाव घ्या जाणून

Gold Silver Rate Today : 2000 रुपयांच्या गुलाबी नोटांनी सराफा बाजारात बहर आणला असला तरी या नोटांवर कमिशन घेत असल्याने सोने-चांदीच्या दरात आणखी भर पडली आहे. अर्थात ही दरवाढ कृत्रिम आहे...

Gold Silver Rate Today : गुलाबी नोटेने सराफा बाजार फुलला, पण सोने-चांदीची धरसोड सुरुच, भाव घ्या जाणून
सराफा बाजार फुलला
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 10:28 AM

नवी दिल्ली : आजपासून 2000 रुपयांच्या गुलाबी नोटांची घरवापसी सुरु आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी 19 मे रोजी या नोटा परत घेण्याची घोषणा केली. ज्यांच्याकडे या नोटा मोठ्या प्रमाणावर घरात साठवलेल्या होत्या, त्यांनी लागलीच या पेट्रोल पंप, दारुची दुकाने आणि सराफा बाजाराकडे मोर्चा वळविला. काहींनी ऑनलाईन शॉपिंग रोखीत केली. सराफा बाजारात 2000 रुपयांच्या नोटांचा पाऊस पडल्याने दुकानदारांनी कमाईची आयती संधी सोडली नाही. गुलाबी नोटा असतील तर त्यावर कमिशन घेतले. त्यामुळे सोने-चांदी (Gold Silver Price) महागात पडली. ताज्या भावापेक्षा अशा ग्राहकांना नोटा खपविण्यासाठी अधिक पैसा द्यावा लागला. अर्थात ही दरवाढ कृत्रिम आहे.

गेल्या पंधरवाड्यापासून सोने-चांदीन नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. सोने-चांदीच्या धरसोड वृत्तीने बाजारात भावांचा ताळमेळ राहिला नाही. सलगा तीन-चार दिवस भावात घसरण दिसते आणि अचानक भावात एक-दोन दिवस तेजीत असतात. सकाळच्या सत्रात स्वस्त असणारे मौल्यवान धातू संध्याकाळी पुन्हा महागतात, असा मामला सुरु आहे. त्यामुळे खरेदीदारांना भावाचा नेमका अंदाज बांधता येत नसल्याचे चित्र आहे.

आजचा भाव काय IBJA नुसार, सोमवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,829 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर 22 कॅरेटचा भाव 55,719 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. goodreturns नुसार आज 22 कॅरेटचा भाव 56,440 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,560 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, सकाळच्या सत्रात भावात कोणताही बदल झालेला नाही. एक किलो चांदीसाठी 75,000 रुपये मोजावे लागत आहेत.

हे सुद्धा वाचा

शुक्रवारी होता हा भाव IBJA नुसार, शुक्रवारी सोने 199 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होऊन 60275 रुपयांवर पोहचले. तर गुरुवारी सोने 172 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होऊन 60,474 रुपयांवर पोहचले होते. शुक्रवारी चांदी प्रति किलो 71,784 रुपये तर गुरुवारी हा भाव 71,496 रुपये प्रति किलो होता.

24, 23, 22 कॅरेटचा भाव ibjarates.com नुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,829 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटचा भाव 60,585 रुपये तर 22 कॅरेटचा भाव 55,719 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 18 कॅरेट सोन्याचा भाव 45,622 रुपये होता. हे भाव काल संध्याकाळचे आहेत.

शुद्ध सोन्याचा हॉलमार्क भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

Non Stop LIVE Update
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....