AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाजारभावापेक्षा स्वस्त सोने खरेदी करण्याची आजची शेवटची संधी, कशी गुंतवणूक कराल?

जर तुम्हीही स्वस्त सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही शेवटची संधी आहे. (Sovereign Gold Bonds Last day to buy gold)

बाजारभावापेक्षा स्वस्त सोने खरेदी करण्याची आजची शेवटची संधी, कशी गुंतवणूक कराल?
गोल्ड एक्स्चेंजमुळे शेअर मार्केटप्रमाणे सोन्याचे व्यवहार होतील. एका गोल्ड रिसीटच्या माध्यमातून खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार पार पडतील. गोल्ड एक्स्चेंजमुळे सोन्याची किंमत आणि गुणवत्ता याची खात्री असेल.
| Updated on: May 21, 2021 | 12:26 PM
Share

मुंबई : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत पुन्हा एकदा सोन्याच्या किंमती गगनाला भिडत आहेत. अनेक शहरात दहा ग्रॅम म्हणजेच प्रतितोळा सोन्याची किंमत 48 हजार रुपयांच्या पुढे गेली आहे. जर तुम्हीही स्वस्त सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही शेवटची संधी आहे. सॉवरेन गोल्ड बाँड योजनेत (Sovereign Gold Bond Scheme) गुंतवणूक करण्याची आजची शेवटची संधी आहे. ही योजना गुंतवणुकीसाठी 17 मे पासून खुली करण्यात आली. या योजनेत गुंतवणूक करण्याचा आज (21 मे) शेवटचा दिवस आहे. (Sovereign Gold Bonds Last day to buy gold at great prices)

यंदाच्या आर्थिक वर्षात सॉवरेन गोल्ड बाँड हे मे ते सप्टेंबर दरम्यान सहा टप्प्यात सुरु केले जाणार आहे. सॉवरेन गोल्ड बाँडच्या दुसऱ्या सीरिजची सदस्यता 24 मे ते 28 मे रोजी सुरु होईल. या कालावधीतील सदस्यांना 1 जून रोजी सोन्याचे बाँड दिले जातील. यानंतर 31 मेपासून 4 जूनपर्यंत तिसरी आणि 12 जुलै ते 16 जुलैपर्यंत चौथ्या सीरीजची सदस्यता देण्यात येईल. तसेच चौथी सीरिज ही 12 जुलै ते 16 जुलैपर्यंत सुरु होईल. यातील तिसर्‍या मालिकेसाठी बाँडची तारीख 8 जून आहे, तर चौथ्या सीरिजसाठी बॉण्ड 20 जुलै आहे.

यानंतर पाचव्या सीरिजसाठी 9 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट आणि सहावी सीरिज ही 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान खुली होईल. यातील पाचव्या सीरिजसाठीचे गोल्ड बाँड हे 17 ऑगस्टला जारी केले जातील. तर 7 सप्टेंबरला सहाव्या सीरिजसाठीचे गोल्ड बाँड जारी होतील.

ऑनलाईन खरेदीवर डिस्काऊंट

गेल्या काही वर्षांपासून सरकार ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सतत नवीन प्रयत्न करत आहे. याअंतर्गत, सरकारने सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांना प्रति दहा ग्रॅम 50 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जाणार आहे. म्हणजेच जर तुम्ही 10 ग्रॅम सोने खरेदी केले तर तुम्हाला 500 रुपयांची सूट दिली जाईल.

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या बाँडची किंमत इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडने जारी केलेली किंमत ही सामान्य सरासरी किंमतीवर आधारित असेल. गुंतवणूकीच्या कालावधीआधी आठवड्याच्या शेवटच्या तीन दिवसांमध्ये ही किंमत 99.9 शुद्धतेच्या सोन्याची सरासरी किंमत असते.

कुठे गुंतवणूक करणार?

बाँड स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, नियुक्त पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेडमार्फत विक्री केली जाते. त्याशिवाय स्मॉल फायनान्स बँका आणि पेमेंट बँकांना बाँड विक्री करण्याची परवानगी दिली जाणार नाही. भारत सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँकेद्वारे हे बाँड जारी केले जातील.

किती गुंतवणूक करायची? 

या बाँडची मुदत 8 वर्ष असेल. पाच वर्षानंतर पुढील व्याज देय तारखेला बाँडमधून पैसे काढून घेण्याचा पर्याय असेल. सोन्याच्या बंधनात गुंतवणूक एक ग्रॅमच्या मूळ युनिटनुसार केली जाऊ शकते. किमान एक ग्रॅम सोन्याची गुंतवणूक करावी लागेल. या सरकारी योजनेतंर्गत भारतातील कोणताही नागरिक 4 किलोपर्यंत सोन्यात गुंतवणूक करु शकतो. ही गुंतवणूक बाँडद्वारे केली जाते. म्हणजे यात तुम्हाला सोन्याचे दागिने वैगरे मिळणार नाहीत, त्याचवेळी, ट्रस्ट आणि इतर संस्थांची खरेदीची कमाल मर्यादा 20 किलो ठेवली गेली आहे.

वेळोवेळी योजनेत गुंतवणुकीची संधी

सोन्यात गुंतवणूक आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी सरकार वेळोवेळी सॉवरेन गोल्ड बाँडच्या सीरिज जारी करते. याअंतर्गत गुंतवणूकदारांना बाजारभावापेक्षा कमी किंमतीत सोने मिळते. तसेच त्यामध्ये सरकारकडून सुरक्षिततेची पूर्ण हमी दिली जाते. हा बाँड खरेदी करण्यासाठी ग्राहकांना केवायसीचे निकष बाजारपेठेतून सोने खरेदी करण्याप्रमाणेच असतील. सरकारची सॉवरेन गोल्ड बाँड ही योजना नोव्हेंबर 2015 मध्ये सुरू झाली.

अधिक नफा

  • या योजनेंतर्गत गुंतवणुकीवर 2.5 टक्के व्याज मिळू शकते
  • यामध्ये गुंतवणूकीचा कालावधी 8 वर्षांचा आहे, पण आपण 5 वर्षानंतरही पैसे काढू शकता.
  • पाच वर्षानंतर पैसे काढण्यासाठी कॅपिटल गेन टॅक्स लागू होत नाही.
  • आवश्यक भासल्यास सोन्याच्या ऐवजी तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊ शकता.

(Sovereign Gold Bonds Last day to buy gold at great prices)

संबंधित बातम्या :

स्वस्त सोने खरेदी करायचंय?, मग त्वरा करा; ‘या’ डेडलाईनपर्यंतच सोने स्वस्तात खरेदी करता येणार!

Gold Price Today | चार दिवसांत तिसऱ्यांदा घसरले सोन्याचे भाव, जाणून घ्या आजचा नवा दर

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.