शेतकऱ्यांसाठी खुशखबर, SBI चं किसान क्रेडिट कार्ड मिळवणं आणखी सोपं, जाणून घ्या प्रक्रिया

स्टेट बँक ऑफ इंडियानं किसान क्रेडिट कार्डविषयी सविस्तर माहिती जाहीर केली आहे. (State Bank of India Kisan Credit card)

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, SBI चं किसान क्रेडिट कार्ड मिळवणं आणखी सोपं, जाणून घ्या प्रक्रिया
किसान क्रेडिट कार्ड
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 1:41 PM

नवी दिल्ली: केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या 2.5 कोटी शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना KCC च्या माध्यमातून खत, बियाणांसाठी कर्ज सहज उपलब्ध होतं. यावर लागणारं व्याजही गतिशील असतं. म्हणजे, जर कर्ज घेणारे शेतकरी वेळेवर कर्ज परत करतात त्यांच्याकडून कमी व्याज घेतलं जातं. शेतकरी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही 1.60 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज विना गॅरंटी घेऊ शकतात. या कार्डवर शेतकरी तीन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज घेऊ शकतात. आतापर्यंत 1.5 कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आलं आहे. आता भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं किसान क्रेडिट कार्डविषयी सविस्तर माहिती जाहीर केली आहे. (State Bank of India Kisan Credit card scheme eligibility benefits and application details)

केंद्र सरकारनं किसान क्रेडिट कार्ड बनवण्याची प्रक्रिया पहिल्यापेक्षा सोपी केली आहे. यासाठी लागणारं प्रक्रिया शुल्क रद्द करण्यात आलं आहे. बँकांना गावांगावामध्ये कँम्प लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना आणि केसीसी स्कीमला लिंक केल्यानंतर देशातील 1.5 कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे बँका शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यास मनाई करु शकत नाहीत.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्डची वैशिष्ट्ये

– किसान क्रेडिट कार्डच्या खात्यातील क्रेडिट रकमेवर सेव्हिंग्ज खात्याच्या दरानं व्याज दिलं जातं. – किसान क्रेडिट कार्डधारकांना मोफत एटीएम आणि डेबिट कार्ड ( स्टेट बँक किसान कार्ड) दिले जाईल. – 3 लाख रुपयांच्या कर्जाला 2 टक्के व्याजदरात सूट – वेळेत कर्ज परतफेड केल्यास 3 टक्के व्याजदरात सूट

1.60 लाखांपर्यंत विनातारण कर्ज

-किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज अनूसूचित केलेले पीक, पीक विमा असणाऱ्या पिकांना दिलं जातं. – पहिल्या वर्षातील कर्जासाठी उत्पादन खर्च आणि पीक काढणीच्या खर्चावर आधारित कर्ज दिलं जातं. -5 वर्षांतील आर्थिक व्यवहार पाहून कर्ज रक्कम निर्धारितकेली जाते. -1.60 लाखापर्यंतचं कर्ज विनातारण दिलं जाते. – परतफेड कालावधी संपल्यानंतर चक्रवाढ पद्धतीनं व्याज आकारलं जातं.

आवश्यक कागदपत्रे

– विहीत नमुन्यातील अर्ज -ओळखपत्र म्हणून मतदार कार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स – शेतकरी – खंडानं जमीन करणारे शेती गट

संबंधित बातम्या :

PM Kisan : सरकार 1 कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मोफत देणार

किसान क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या कर्जावर किती व्याज लागतं, शेतकरी त्यांचा पैसा कसा वाचवू शकतात?, जाणून घ्या

(State Bank of India Kisan Credit card scheme eligibility benefits and application details)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.