AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अज्ञात’ योगी प्रकाशझोतात, चित्रा रामकृष्णनांसोबत संवाद उघड; जाणून घ्या- व्यक्तीचं नाव

महत्वाच्या नियुक्त्यासोबत मोठ्या आर्थिक व्यवहारांचा देखील समावेश होता. त्यामुळे चित्रा रामकृष्णन यांना दिशा देणारा योगी नेमका कोण याबद्दल तर्कवितर्क लढविले जात होते.

'अज्ञात' योगी प्रकाशझोतात, चित्रा रामकृष्णनांसोबत संवाद उघड; जाणून घ्या- व्यक्तीचं नाव
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Feb 28, 2022 | 9:02 PM
Share

नवी दिल्ली : बाजार नियंत्रक सेबीच्या 190 पानांच्या अहवालामुळं देशातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्स्चेंजमधील (STOCK EXCHANGE) अनागोंदी समोर आली होती. वर्ष 2013-16 च्या दरम्यान एनएसईच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चित्रा रामकृष्णन (CHITRA RAMKIRSHNAN) यांनी वैयक्तिक तसेच कार्यालयीन निर्णय एका योगीच्या म्हणण्यानुसार घेतल्याचे उजेडातं आलं. यामध्ये महत्वाच्या नियुक्त्यासोबत मोठ्या आर्थिक व्यवहारांचा देखील समावेश होता. त्यामुळे चित्रा रामकृष्णन यांना दिशा देणारा योगी नेमका कोण याबद्दल तर्कवितर्क लढविले जात होते. दरम्यान, अज्ञात योगीचा चेहरा जगासमोर आला आहे. चित्रा रामकृष्णन यांच्या निर्णयावर प्रभाव टाकणारी व्यक्ती एनएसईचे ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर (CHIEF OPERATING OFFICER) आनंद सुब्रह्मण्यमचं असल्याच्या शंकेवर शिक्कामोर्तब झालं आहे. आनंद सुब्रह्मण्यम यांचा चेहरा डिजिटल योगी स्वरुपात पुढे आणण्यात आला. चित्रा रामकृष्णन यांना मोठे निर्णय घेण्यासाठी अध्यात्मिक रुपात मार्गदर्शन केलं.

डिजिटल योगी

अज्ञात योगी प्रकरणाचा सखोल तपास करण्यात आला. यावेळी तपासणीत डिजिटल पुरावे समोर आल्याचं वृत्त आहे. याचं डिजिटल पुराव्यामुळं केंद्रीय अन्वेषन विभाग (सीबीआय) थेट सुब्रह्मण्यम यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलं आहे. आनंद-चित्रा यांचे वैयक्तिक ईमेल संभाषण तपासात समोर आलं. यामध्ये चित्रा यांना पाठविलेल्या ई-मेलच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षातील आर्थिक प्रस्ताव, डिव्हिडंड पे-आऊट, रेशिओ, आर्थिक नियुक्त्या यांची माहिती ई-मेलद्वारे दोघांमध्ये देवाणघेवाण झाली. तपासकर्त्यांनी आनंद यांच्या चेन्नई स्थित घराची झाडाझडती केली होती. यामध्ये डेस्कटॉपची तपासणी केली. यामध्ये ‘sanad’ नामक विंडोज यूजर प्रोफाईल वर दोन स्काईप अकाउंट कॉन्फिगर केले होते.

चित्रा रामकृष्णांवरचे आरोप काय?

2013 मध्ये एनएसईच्या तत्कालीन सीईओ आणि एमडी चित्रा रामकृष्णा यांनी आनंद सुब्रमण्यम यांना चीफ सेक्रेटरी ऑफिसर (COO) पदावर नियुक्ती दिली. एनएसईमध्ये यापूर्वी असे कोणतेही पद नव्हते. आनंद सुब्रमण्यम एनएसईमध्ये येण्यापूर्वी बाल्मर लॉरी (Balmer Lawrie) मध्ये काम करत होते. त्यांचा पगार 15 लाख रुपये होता. एनएसईमध्ये त्यांना 9 पटींनी जास्त म्हणजेच 1.38 कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले. त्यानंतर त्यांना सलग प्रमोशन देण्यात आले. ते ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर बनले. चित्रा यांनी आनंद यांना 5 दिवस ऑफिसात न येण्याची सूटही दिली होती. त्यांना फक्त 3 दिवस ऑफिसमध्ये यावे लागत होते. चित्रा यांनी हे सर्व निर्णय अज्ञात साधूच्या सांगण्यावरून घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. ईमेलच्या माध्यमातूनच त्या साधूच्या संपर्कात होत्या.

इतर बातम्या

मुलांची पॉलिसी असल्यास पालकांना मिळणार आयपीओमध्ये सवलत, जाणून घ्या ‘एलआयसी’च्या आयपीओबाबत महत्त्वाची माहिती

बँकेतील कामे आजच पूर्ण करा, मार्च महिन्यात बँकांना तेरा दिवस सुटी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.