AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Stock Market : शेअर बाजार जोमात; Sensex ची ऐतिहासिक कामगिरी, लिलया पार केला 80,000 अंकांचा टप्पा

Stock Market New High : मंगळवारी 80 हजारांच्या जवळपास घुटमळणाऱ्या शेअर बाजाराने बुधवारी चमकदार कामगिरी केली. बाजाराने मोठी झेप घेतली आहे. आजच्या दिवसाची सुरुवात होताच, बाजाराने 80 हजार अंकांचा टप्पा पार केला.

Stock Market : शेअर बाजार जोमात; Sensex ची ऐतिहासिक कामगिरी, लिलया पार केला 80,000 अंकांचा टप्पा
बाजाराची ऐतिहासिक कामगिरी
Updated on: Jul 03, 2024 | 10:45 AM
Share

शेअर बाजाराने पुन्हा एकदा इतिहास रचला. मंगळवारी सेन्सेक्स 80 हजारांच्या जवळपास घुटमळला. त्यानंतर त्याला पुढे झेप घेता आली नाही. पण आज बाजार उघडताच सेन्सेक्सने मोठी उसळी घेतली. बीएसई सेन्सेक्सने 481.44 अंकांच्या उसळीने लक्ष्य भेदले. सेन्सेक्स आज 79,922.89 अंकांवर उघडला होता. तो काही मिनिटांतच व्यापारी सत्रात पुन्हा एकदा 572 अंकांच्या उसळीने 80,000 टप्पा पार करुन पुढे गेला. बाजाराच्या या घौडदौडीमुळे गुंतवणकूदारांनी भांगडा केला.

काल दिले संकेत, आज केली कमाल

बुधवारी शेअर बाजारात व्यापारी सत्र सुरु होताच बीएसई सेन्सेक्स 481.44 अंकांनी उसळला. तो 79,922.89 अंकावर ओपन झाला. त्यानंतर काही मिनिटांनीच सेन्सेक्स 572 अंकांनी वधारला. सेन्सेक्स 80,000 अंकांचा टप्पा ओलांडून पुढे गेला. त्याने 80,039.22 अंकांचा स्तर गाठला. मंगळवारी सेन्सेक्सने सकाळी धुमाकूळ घातला आणि दुपारनंतर तो मंदावला. त्यानंतर बाजार रेंगाळत बंद झाला. तर निफ्टी 18.10 अंकांनी घसरुन 24,123.85 अंकावर बंद झाला. तर सेन्सेक्स 34.73 अंकानी घसरुन 79,441.46 वर बंद झाला. आज बाजाराने उच्चांकी झेप घेत पुढील घौडदौडीचे संकेत दिले आहेत.

बँकिंग स्टॉक्सची कमाल

BSE च्या 30 शेअर्समध्ये 21 हिरव्या निशानावर व्यापार करत आहेत. सेन्सेक्सच्या 80 हजारांच्या कामगिरीमागे सर्वात मोठे योगदान बँकिंग स्टॉक्सचे आहे. या शेअर्समध्ये जोरदार तेजीचे सत्र दिसून आले. बँकिंग शेअरच्या घौडदौडीमुळे बँक निफ्टीने 53,000 अंकांचा रेकॉर्डस्तर गाठला. HDFC Bank Share 2.9 टक्क्यांनी चढून 1781.60 रुपयांवर व्यापार करत होता. तर ICICI Bank Share जवळपास 2 टक्क्यांच्या तेजीसह 1215 रुपयांवर पोहचला. याशिवाय Axis Bank Share ने पण 2 टक्क्यांची उसळी घेतली हा शेअर 1277.95 रुपयांवर पोहचला. तर कोटक बँक शेअरमध्ये 1.50 टक्क्यांची तेजी दिसली. हा शेअर 1799.90 रुपयांवर ट्रेड करत आहे.

निफ्टीची पण घौडदौड

Sensex प्रमाणे एनएसई निफ्टीने 167 अंकांची झेप घेत 24,291 वर व्यापारी सत्राला सुरुवात केली. काही वेळातच निफ्टी 24,292 अंकांवर पोहचला. बाजार उघडल्यानंतर जवळपास 2095 शेअरमध्ये तेजी आली. तर 694 शेअरमध्ये घसरण झाली. तर 100 शेअरमध्ये कोणताही बदल दिसला नाही. निफ्टीवर एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी लाईफ, ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि टाटा कंझ्युमर हे गेनर ठरले.

200 दिवस न बोलता काढले पण... मुंडेंनी विरोधकांना चांगलंच फटकारलं
200 दिवस न बोलता काढले पण... मुंडेंनी विरोधकांना चांगलंच फटकारलं.
देवेंद्र दरबारी, मंत्री रमी खेळती भारी..कोल्हेंची कृषीमंत्र्यांवर टीका
देवेंद्र दरबारी, मंत्री रमी खेळती भारी..कोल्हेंची कृषीमंत्र्यांवर टीका.
फडणवीस अन् आदित्य ठाकरेंची सॉफिटेल हॉटेलमध्ये भेट? नेमकं घडतंय काय?
फडणवीस अन् आदित्य ठाकरेंची सॉफिटेल हॉटेलमध्ये भेट? नेमकं घडतंय काय?.
काय दुर्दैव शेतकऱ्यांचं...कोकाटेंच्या त्या व्हिडीओवरुन बच्चू कडू भडकले
काय दुर्दैव शेतकऱ्यांचं...कोकाटेंच्या त्या व्हिडीओवरुन बच्चू कडू भडकले.
कृषीमंत्र्यांचा सभागृहात रंगला रमीचा डाव; रोहित पवारांचा दावा तरी काय?
कृषीमंत्र्यांचा सभागृहात रंगला रमीचा डाव; रोहित पवारांचा दावा तरी काय?.
फडणवीसांना फटकारे, राज ठाकरेंचं चॅलेंज, उद्धव ठाकरेंच्या दिशेनं इंजिन?
फडणवीसांना फटकारे, राज ठाकरेंचं चॅलेंज, उद्धव ठाकरेंच्या दिशेनं इंजिन?.
ठाकरेंनी भाजपला डिवचलं तर हिरव्या सापांच्या मागे... म्हणत पलटवार
ठाकरेंनी भाजपला डिवचलं तर हिरव्या सापांच्या मागे... म्हणत पलटवार.
8० वर्षांच्या पळडकर आजीची 17 एकर जमीन कुणी लाटली?अंगठ्यांचे ठसे अन्...
8० वर्षांच्या पळडकर आजीची 17 एकर जमीन कुणी लाटली?अंगठ्यांचे ठसे अन्....
तुम्ही गुगल पे, फोनपे वापरताय? तुमच्यासाठी मोठी बातमी; 1 ऑगस्टपासून...
तुम्ही गुगल पे, फोनपे वापरताय? तुमच्यासाठी मोठी बातमी; 1 ऑगस्टपासून....
राज ठाकरेंना अटक करा, सामान्य माणूस असुरक्षित अन्... सदावर्तेंची टीका
राज ठाकरेंना अटक करा, सामान्य माणूस असुरक्षित अन्... सदावर्तेंची टीका.