AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्विगी, ब्लिंकीट सावधान!,आता आली बिगबास्केटची बारी,10 मिनिटांत सामान घरपोच…

बिगबास्केट बाह्य गुंतवणूकदारांकडून निधी उभारण्याची योजना आखत असल्याच्या वृत्ताला पारेख यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले की टाटा समूहाच्या पाठिंब्यामुळे कंपनीकडे पुरेसे भांडवल आहे.

स्विगी, ब्लिंकीट सावधान!,आता आली बिगबास्केटची बारी,10 मिनिटांत सामान घरपोच...
| Updated on: Jun 11, 2025 | 9:05 PM
Share

भारतात कोणताही किराणा असो वा इतर जुजबी सामान अवघ्या दहा मिनिटांत घरपोच मिळत आहे. फूड एपवरुन तर हवे ते खाद्यपदार्थ लिलया मिळत आहेत. भारतात क्वीक कॉमर्सचा बाजार खूपच वेगाने वाढत आहे. या मार्केटमध्ये अनेक कंपन्याची एकमेकांत स्पर्धा सुरु झाली आहे. आता क्वीक मार्केटमध्ये टाटा ग्रुपची कंपनी बिगबास्केटने देखील मोठी झेप घ्यायचे ठरवले आहे. कंपनीचे सहसंस्थापक विपुल पारेख यांनी सांगितले की बिगबास्केट २०२६ च्या आर्थिक वर्षअखेर संपूर्ण देशात १० मिनिटात फूड डिलिव्हरी सेवा सुरु करणार आहे. काय आहे कंपनीची योजना पाहूयात…

भारतात घर बसल्या दिवाणखान्यात लोकांना गरमागरम खाद्यपदार्थ क्रिकेटची मॅच पाहाताना खायला मिळत आहेत. या मार्केटमध्ये आधीच अनेक कंपन्या आहेत. क्वीक कॉमर्स मार्केटमध्ये स्विगी स्नॅक, ब्लिंकिट बिस्ट्रो आणि झेप्टो कॅफे सारख्या कंपन्याची स्पर्धा असतानाही आता टाटा ग्रुपची बिग बास्केट कंपनी दहा मिनिटात जेवण पोहचवणार आहेत. ७१०० कोटी रुपयांचा क्विक कॉमर्स बाजारात आता बिग बास्केट देखील उतरली आहे.

नवीन सेवेत काय ?

रॉयटर्सच्या बातमीनुसार , बिगबास्केटचे टार्गेट झोमॅटो आणि स्विगी सारख्या दादा फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मचे ग्राहकांना त्यांच्याकडे आकर्षित करण्याचे आहे. विपुल पारेख यांनी सांगितले की कंपनी या सेवेद्वारे डार्क स्टोअरचा वापर करणार आहे. डार्क स्टोअर हे छोट्या गोदामासारखे असतात. जे जास्त लोकसंख्या असलेल्या जागी असतात. येथे डिलिव्हरी पार्टनर, टु-व्हीलर रायडर्स, सामान वा फूड ग्राहकांपर्यंत पोहचवत असतात.

डार्क स्टोअर्सचा विस्तार

बिगबास्केटने 2011 मध्ये भारतात ऑनलाईन किराना डिलीव्हरी सुरू केली होती,सध्या ही कंपनी 700 डार्क स्टोअर्सना चालवते. कंपनीने साल 2025 च्या अखेरपर्यंत या डार्क स्टोअरची संख्या वाढवून 1000 ते 1200 करण्याची योजना आखली आहे. या नवीन फूड डिलीव्हरी सेवेची सुरुवात गेल्या महिन्यात बंगळुरुत पायलट प्रोजक्ट अंतर्गत झाली होती. आता कंपनी जुलै 2025 पर्यंत 40 डार्क स्टोअरद्वारे नव्या संकल्पनेचा विस्तार करणार आहे. पारेख यांनी सांगितले की सध्या 5-10 टक्के ग्राहक नेहमीच्या किराणा खरेदीसह रेडी टू इट खाद्य पदार्थ ऑर्डर करीत आगे. हा आकडा लवकरच वाढण्याची शक्यता आहे.

आयपीओ आणणार

बिगबास्केट पुढील 18-24 महिन्यांत शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची तयारी करीत आहे. बिगबास्केटच्या या सेवेमध्ये स्टारबक्स कॉफी आणि टाटा समूहाच्या इंडियन हॉटेल्सची फूड कंपनी क्यूमिनची उत्पादने समाविष्ट असतील. कंपनीने स्पष्ट केले की ती कोणत्याही बाह्य रेस्टॉरंटशी भागीदारी केली जाणार नाही

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.