Gold Silver Rate Today | इकडे घसरण तिकडे संधी, रुपया पडला, सोन्या-चांदीकडे ओढा, गुंतवणुकीचे पर्याय कोणते?

| Updated on: Jul 19, 2022 | 2:24 PM

Gold rate today: आज सकाळी बाजारात सोन्या चांदीच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण झाली. सोने 61 रुपयांनी तर चांदीत 472 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोने आणि चांदीत गुंतवणुकीची संधी उपलब्ध झाली आहे.

Gold Silver Rate Today | इकडे घसरण तिकडे संधी, रुपया पडला, सोन्या-चांदीकडे ओढा, गुंतवणुकीचे पर्याय कोणते?
आजचे सोन्या चांदीचे दर
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Gold Silver Rate Today | डॉलरची स्थिती मजबूत झाल्याने सोन्यासह चांदीवर दबाव दिसून आला. सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली. सकाळी सोन्याचा दरात (Gold rate today) 61 रुपयांची घसरण दिसून आली. स्थानिक वायदे बाजारात सकाळी 11 वाजता MCX वर 101 रुपयांच्या घसरणीसह सोन्याचा भाव 50260 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. ऑक्टोबर डिलिव्हरीच्या सोन्यामध्ये 72 रुपयांची घसरण होऊन ते 50515 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यापार करत होते. चांदीचे दर 410 रुपयांनी घसरले. सप्टेंबरची डिलिव्हरी असलेल्या चांदीत (Silver rate today)यावेळी 503 रुपयांची घसरण झाली आणि ते 55588 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर उघडली. डिसेंबर डिलिव्हरीची चांदी 472 रुपये घसरणीसह 56570 रुपयांच्या स्तरावर व्यापार करत होती. डॉलर मजबूत स्थिती असल्यामुळे सोन्या चांदीचे दर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उतरत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी या काळात सोन्यात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. वायदे बाजारात आणि सराफा बाजारात या दोन्हींमध्ये केलेली गुंतवणूक ही भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, 999 शुद्ध सोन्याचा भाव आज 50493 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 995 शुद्ध सोन्याचा दर 50291 रुपये तर 916 शुद्ध सोन्याचा भाव 46252 रुपये, 750 शुद्ध सोन्याचा भाव हा 37870 रुपये आणि 585 शुद्ध सोन्याचा दर 29538 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 999 शुद्ध चांदीचा भाव 55204 रुपये प्रति किलोग्रॅम होता. सोमवारी, 18 जुलै 2022 रोजी 999 शुद्ध सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम हा 50667 रुपये होता. 999 शुद्ध चांदीची किंमत 55614 रुपये प्रति किलोग्रॅम होता.

युरोपियन सेंट्रल बँकेची बैठक

अमेरिकन फेडरल बँकेनंतर आता युरोपियन सेंट्रल बँकेची ही महत्वपूर्ण बैठक होत आहे. महागाई काबूत आणण्यासाठी युरोपची ही मध्यवर्ती बँक ही व्याजदरात वाढ करण्याची दाट शक्यता आहे. व्याजदर 75 बेसिस पॉईंट्सपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दशकातील ही पहिली वाढ ठरेल. सध्या हा दर 0.10 टक्क्यांच्या घसरणीसह 107.125 स्तरावर आहे. डॉलर इंडेक्स जर कमकूवत झाला तर सोन्याचे दर पुन्हा वाढू शकतात. सध्या रुपया डॉलरच्या तुलनेत सर्वकालीन निच्चांकी स्तरावर पोहचला आहे. त्यामुळे सोन्याचे भाव कमी होण्याची शक्यता. तेव्हा गुंतवणूकदारांना वायदे बाजारात, शेअर बाजारात आणि सराफा बाजारात गुंतवणुकीच्या संधी आहेत.

हे सुद्धा वाचा

राज्यातील चार शहरांतील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार(Good Return Website) मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,390 प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,200 रुपये आहे. पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा दर 50,470 रुपये आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,270 आहे. नागपूर मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 50,470 रुपये आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,270 आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 46,270 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 50,470 रुपये आहे.