AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market : जागतिक बाजार धराशायी, निफ्टीने तोडले रेकॉर्ड, गाठले नवीन शिखर

Share Market : नॅशनल स्टॉक एक्सचेंजने आज सकाळीच इतिहास रचला. निफ्टीने नवीन विक्रम केला. बुधवारी प्री-ओपनमध्येच निफ्टीने सर्व रेकॉर्ड तोडले. जगातील इतर शेअर बाजार धराशायी होत असताना भारतीय शेअर बाजाराची आगेकूच सर्वांनाच धक्का देणारी आहे.

Share Market : जागतिक बाजार धराशायी, निफ्टीने तोडले रेकॉर्ड, गाठले नवीन शिखर
| Updated on: Jun 28, 2023 | 1:35 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजाराचा पुन्हा एकदा डंका वाजला. शेअर बाजाराने नवीन विक्रम रचला. यावेळी निफ्टी आणि बीएसईने हा इतिहास रचला आहे. यापूर्वी मुंबई स्टॉक एक्सचेंजने 7 जून रोजी हा इतिहास रचला होता. त्यावेळी बाजार बंद झाला तेव्हा बीएसई सेन्सेक्सने (BSE Sensex) 350.08 अंकाची उसळी घेतली. बीएसई 63,142.96 अंकावर बंद झाला होता. तर एनएसई निफ्टी (NSE Nifty) 127.40 अंकांच्या तेजीसह 18,726.40 अंकांवर पोहचला होता. त्यानंतर 22 जून रोजी पुन्हा नवीन उच्चांक गाठला. आज एनएसईने हा रेकॉर्ड मोडीत काढला. बुधवारी प्री-ओपनमध्येच निफ्टीने सर्व रेकॉर्ड तोडले. निफ्टी 18900 उघडला. त्यामुळे गुंतवणूकदारांसह तज्ज्ञांनी पण आनंद व्यक्त केला. गेल्या वर्षी गटंगळ्या खाणाऱ्या शेअर बाजाराने (Share Market) दमखम दाखविल्याने सर्वांनाच हत्तीचे बळ आले.

आज रचला इतिहास बुधवारी, 28 जून रोजी प्री-ओपन सेशनमध्ये, बाजार उघडण्यापूर्वीच निफ्टीने 18900 अंकांचा पल्ला गाठला. यापूर्वी निफ्टीने सर्वकालीन उच्चांक 18,887.60 अंक होता. ऑक्टोबर 2021 मध्ये हा रेकॉर्ड झाला होता. दीड वर्षानंतर हा रेकॉर्ड गाठला आहे.

सेन्सेक्स पण नवीन उच्चांकावर सेन्सेक्सने 63,701.78 अंकाचा नवीन सर्वकालीन नवीन रेकॉर्ड केला. यापूर्वी 7 जून रोजी बाजार बंद झाला तेव्हा बीएसई सेन्सेक्सने (BSE Sensex) 350.08 अंकाची उसळी घेतली. बीएसई 63,142.96 अंकावर बंद झाला होता. त्यानंतर 22 जून 2023 रोजी सेन्सेक्सने नवीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी 63,601.71 अंकावर उघडला होता. तर निफ्टीने 18908.15 या सर्वकालीन उच्चांकावर ट्रेडिग सुरु केले होते.

अमेरिकन शेअर बाजार फुलला मंगळवारी अमेरिकन शेअर बाजाराने मरगळ झटकली. हा बाजार फुलला. डाऊ जोंस, नॅस्डॅक आणि एसअँडपीने जोरदार कामगिरी बजावली. मोठ्या तेजीसह हे दोन्ही शेअर बाजार बंद झाला. त्याचा अनुकूल परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसला. बाजाराने मोठी उसळी घेतली.

निफ्टीने बॅरिकेट्स तोडले गेल्या काही वर्षांपासून निफ्टी सातत्याने सर्वकालीन उच्चांक गाठण्यासाठी प्रयत्न करत होता. पण आज शेवटी निफ्टीने मागील सर्व रेकॉर्ड इतिहास जमा केले. नवीन शिखर गाठले. यादरम्यान स्मॉलकॅप आणि मिडकॅप इंडेक्सने जोरदार तेजी उसळी घेतली.

सकाळीच आनंदवार्ता भारतीय शेअर बाजाराने नवीन चढाई केल्याने बाजारात आनंदाची लहर उसळली आहे. सेन्सेक्स सकाळी 9.40 वाजता 63,600 अंकांच्या जवळपास होता. तर निफ्टी 18900 अंकांच्या जवळपास होता. निफ्टी-50 मध्ये अदानी एंटरप्राईजेस आणि अदानी पोर्टच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. याशिवाय टायटन, जेएसडब्ल्यू स्टील आणि बजाज फायनान्स शेअर दीड टक्के तेजी दिसून आली. खासगी बँकांच्या शेअरवर दबाव दिसून आला. येत्या काही दिवसात तेजीचे सत्र कायम राहील, असा विश्वास गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांना वाटत आहे. त्यामुळे पुन्हा एखादा नवीन रेकॉर्ड नक्की होईल, असा विश्वास त्यांना आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.