AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RBI Action : सहकार क्षेत्रातील ही बँक बंद करण्याचे आदेश, RBI ने केला परवाना रद्द

RBI Action : राज्यातील सहकार क्षेत्रातील या बँकेला अखेर दणका बसला. भारतीय रिझर्व्ह बँकेने या बँकेचा परवाना रद्द केला. कारवाई झाली आता या बँकेतील ग्राहकांच्या ठेवींचे आता काय होणार, किती रक्कम मिळणार?

RBI Action : सहकार क्षेत्रातील ही बँक बंद करण्याचे आदेश, RBI ने केला परवाना रद्द
| Updated on: Jul 06, 2023 | 5:34 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank Of India) वेळोवेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सरकारी, खासगी आणि सहकार क्षेत्रातील बँकांवर कारवाईचा बडगा उगारते. केंद्रीय बँकेने नियमांचे उल्लंघन केल्याने या बँकांवर धडक कारवाई करण्यात येते. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणात काही बँकांना दंड ठोठावण्यात येतो. कर्ज वाटपातील गोंधळ, लेखा परिक्षणातील गडबड यामुळे ही धडक कारवाई करण्यात येत. यावेळी दोन सहकारी बँकांवर (Cooperative Bank ) थेट कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेचा समावेश आहे. आरबीआयने या बँकेचा परवाना रद्द केला. कारवाई झाली आता या बँकेतील ग्राहकांच्या ठेवींचे आता काय होणार, किती रक्कम मिळणार?

या दोन बँकांवर कारवाई रिझर्व्ह बँकेने या कारवाईचा तपशील दिला. त्यानुसार, महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील दोन सहकारी बँकांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि बेंगळुरु शहरातील सुश्रुती सौहार्द सहकार बँकेचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे. या दोन्ही बँका यापुढे कोणतेही बँकेचे कामकाज करु शकणार नाहीत.

विदर्भातील मोठी बँक बुलडाणा जिल्हा हा सहकारी बँकांचा गड मानल्या जातो. येथील अनेक सहकारी अर्बन बँकांची कोट्यवधींची उलाढाल आहे. काही सहकारी बँकांना मल्टी शड्युल्ड बँकेचा दर्जा आहे. त्यांच्या शाखा अनेक राज्यात पसरल्या आहेत. मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ही विदर्भातील मोठी बँक आहे. तिची मुख्य शाखा मलकापूर शहरात आहे. या बँकेच्या अनेक शाखा राज्यात कार्यरत होत्या. एक हजार कोटींपेक्षा अधिकच्या ठेवी बँकेकडे होत्या.

कारवाईचे कारण काय कर्ज वाटपामुळे बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली होती. ऑगस्ट 2021 मध्ये केवायसीचे उल्लंघन केल्याप्रकरणी बँकेला दोन लाख रुपयांचा दंड ठोठवण्यात आला होता. त्यानंतर बँकेची आर्थिक स्थिती नाजूक झाली. यापूर्वी बँकेवर निर्बंध लागू होते. आता या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला.

यापूर्वी 114 वेळा दंड आरबीआयने 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात, 2022-23 मध्ये 8 सहकारी बँकांना दणका दिला होता. काहींचा परवाना रद्द केला. आरबीआयने आतापर्यंत 114 वेळा दंड ही ठोठावला. नियम धाब्यावर बसविणाऱ्या बँकांना केंद्रीय बँकेने धडा शिकवला. सहकारी बँकांच्या माध्यमातून ग्रामीण आणि दुर्गम भागात बँकिंग सुविधा झपाट्याने पोहचल्या. पण या बँकांनी नियम धाब्यावर बसवले. त्यांच्यावर पण कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

ग्राहकांना दिलासा नियमांचे उल्लंघन केल्याने बँकांवर आरबीआय कारवाई करते. बँकेचा परवाना रद्द झाल्यावर ठेवीदाराला ठेव विमा आणि क्रेडिट हमी महामंडळाकडून (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation-DICGC) एक ठराविक रक्कम नुकसान भरपाईच्या रुपात दिल्या जाते. त्यामुळे ग्राहकांना एक ठराविक रक्कम मदत म्हणून मिळते. सध्या पाच लाख रुपयांपर्यंत ठेव संरक्षण देण्यात आले आहे.

Follow Us
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?