AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही तर केवळ सुरूवात… पेट्रोल-डिझेल दरवाढ… RBI चा तो मोठा इशारा… महागाईचा बॉम्ब फुटणार?

RBI Warning of Inflation: मध्य-पूर्वेतील युद्धाने जग होरपळले आहेत. भारतालाही त्याची मोठी झळ बसली आहे. गेल्या 10 दिवसात तीनदा इंधन दरवाढ झाली आहे. पण RBI ने मोठा इशारा दिला आहे. महागाईच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागण्याचे मोठे संकेत केंद्रीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.

ही तर केवळ सुरूवात... पेट्रोल-डिझेल दरवाढ... RBI चा तो मोठा इशारा... महागाईचा बॉम्ब फुटणार?
आरबीआय महागाईचा बॉम्बImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 23, 2026 | 9:22 AM
Share

RBI Warning of Inflation: इस्त्रायल- इराण आणि नंतर अमेरिका – इराण यु्द्ध हे फेब्रुवारीपासून सुरू झाले आहे. अजूनही तणाव निवाळलेला नाही. दिवसागणिक मोठ्या युद्धाचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या युद्धामुळे जगावर ऊर्जा संकट कोसळले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम दिसला. महागाई वाढली आहे. त्याचवेळी RBI ने मोठा इशारा दिला आहे. युद्धाची स्थिती कायम राहिल्यास भारतात महागाईची दुसरी लाट येईल असा इशाराच केंद्रीय रिझर्व्ह बँकेने दिला आहे.

पेट्रोल- डिझेल महागणार?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मध्य-पूर्वेतील ताण-तणावावर मोठे भाष्य केले. जर युद्ध अजून लांबले तर ऊर्जा क्षेत्रात उलथापालथ होईल. इंधन किंमती वाढतील, व्यापारी तोटा होईल आणि रुपयावर मोठा दबाव येईल असे आरबीआयने स्पष्ट केले. युद्धामुळे जागतिक बाजारात कच्चे तेल आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमती वधारल्या आहेत. त्या अजून वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. देशात ऊर्जा संकटाचे संकेत मिळत आहेत. आरबीआयच्या इशाऱ्यानुसार, पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी, एलपीजीच्या किंमतीत मोठी वाढ होऊ शकते.

महागाईचा बॉम्ब फुटणार?

RBI ने महागाईविषयीही भाकीत केले आहे. जर युद्ध लांबले तर देशात महागाईची दुसरी लाट येईल असे केंद्रीय बँकेने स्पष्ट केले आहे. इंधन दरवाढीने दळणवळण आणि मालवाहतूक महागेल आणि परिणामी महागाईचा स्फोट होईल. सर्वच वस्तू महागतील असा इशारा बँकेने दिला आहे. यामुळे वाहतूक व्यवस्था आणि पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होईल. आयात-निर्यात महाग होईल. त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल.

परदेशी गुंतवणूकदार गाशा गुंडाळतील

काही तज्ज्ञांच्या मते, महागाईचा स्फोट झाल्यास परदेशी गुंतवणूकदार देशातून गाशा गुंडाळतील. ते शेअर बाजारासह इतर ठिकाणची गुंतवणूक काढून घेतील. शेअर बाजारात मोठ्या चढउताराचे सत्र येईल. वर्ष 2021-25 मध्ये भारताची सरासरी वाढ 8.2% होती. RBI ने 2026-27 साठी जवळपास 6.9% वाढीचे संकेत दिले आहे. सध्या भारतातील महागाई 4 टक्क्यांच्या जवळपास आहे आणि नियंत्रणात आहे. पण जर इंधन संकट वाढले तर मात्र मोठा धोका निर्माण होण्याची भीती वर्तवली जात आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ